Skip to main content

जवळून अनुभवलेले क्वारंटाईन - COVID-19

लेखक मोदक यांनी शनिवार, 16/05/2020 00:56 या दिवशी प्रकाशित केले.
फारच निराशा वाटतेय आज आमच्या इथे नवग्रह मंदिरापाशी सापडले तसेच २ बिल्डिंग सोडून च्या बिल्डिंग मध्ये सापडले आत्ता किराणा आणि दूध वाल्यांचा पण संशय यायला लागलाय चांगली गोष्ट म्हणजे सगळे बंद आहे सामान संपत चालले आहे सामान कसे आणावे दूध तर जास्त साठवू शकत नाही ना ऑनलाईन आमच्या भागात उपलब्ध नाही अजूनही इथे औषध फवारणी झाली नाहीये आणि घरपोच देण्याची व्यवस्था पण नाही नुसतेच बंद करून ठेवलेय सदाशिव पेठेत पण मेडिकल दुकानात सापडले त्यामुळे मेडिकल पण ३ दिवस बंद आहेत काय होणार कळत नाही ****************************** प्राजक्ता २१ यांचा हा प्रतिसाद वाचून बरेच दिवस टंकाळा करत असलेला अनुभव शब्दबद्ध क

कुल्फीच्या बिस्किटचे पापलेट - २

लेखक स्टार्क यांनी शुक्रवार, 15/05/2020 22:25 या दिवशी प्रकाशित केले.
शाळा सुरू होऊन तब्बल तीन महिने झाले होते. कुल्फी आणि पापलेटबरोबर सगळेच दिवस एकदम हसी-खुषीत चालले होते. शिकवायचे तास सोडून ऊरलेला शाळेतला वेळ म्हणजे आमच्यासाठी 'ऊंट के मुंह में जीरा', कधी कधी म्हणून पुरा पडायचा नाही गुफ्तगू करायला. दिवसभर आम्ही तिघिंनी कितीही गपशप केली तरी संध्याकाळी घरी जातांना वाटे काहितरी आपल्या पोटात तसेच राहिले आहे जे सांगायचे राहूनच गेले. मग ते रात्रभर पोटात सांभाळतांना मला मोठी मुष्कील पडत असे.

कुल्फीच्या बिस्किटचे पापलेट - १

लेखक स्टार्क यांनी शुक्रवार, 15/05/2020 22:20 या दिवशी प्रकाशित केले.
जी आदाब! हम निलोफर है! अब आप पुछेंगे 'कुल्फीके बिस्किटकी पापलेट' येह क्या अजीब माजरा है भई? क्या येह कोई दिमागको गेहरा सदमा लगे हलके-वकुफवाले बावर्चीकी हिमाकतभरी तरकीब है? तो 'पापलेटके बिस्किटकी कुल्फी' क्यों नही? या फिर 'बिस्किटके क्लुल्फीका पापलेट' क्यों नही? तो जी हम आपसे कहेंगे, आप येह बात अपने जहनमें गाठ बांधकर रख ले, 'बिस्किट हमेशा बीचमें आती है, कुल्फी सबसे पहले आयी थी और भई पापलेट के तो क्या केहने'. तो हमारे मायने से 'कुल्फीके बिस्किटकी पापलेट' ही सही नुस्खा हुवा ना. या खुदा! हम तो भूलही गये! हमे यहां ऊर्दू नही मराठीमेही गुफ्तगुं करनीं है.

खासियत खेळियाची - पुल इट लाईक पंटर !

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी शुक्रवार, 15/05/2020 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
पुल हा खरंतर क्रिकेटमधला सर्वात उर्मट फटका. खेळाची कुठलीही स्टेज असो, बोलर कोणीही असो, पिच कसंही असो - बॅट्समननी जर कडकडीत पुलचा चौकार किंवा षटकार मारला तर बोलर खांदे पाडून मास्तरांनी मुस्कटात मारलेल्या विद्यार्थ्यासारखा आपल्या जागी परत जातो. कारण पुलच्या अदाकारीतच एक उद्दामपणा आहे.

देवा, थांबव हा कहर....

लेखक SwapnilB.0611 यांनी शुक्रवार, 15/05/2020 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
आता तरी फुटू देरे देवा तुला पाझर, खूप झाला आता हा कोरोना चा कहर... कोण करतो कोण भरतो,अशी येथे गत आहे, श्रीमंतांनी आणला आजार,गरीब आता भोगत आहे... मुठभर लोकांच्या नालायक पना मुळे, हा आजार पसरतो आहे, त्यांच्या सोबतच मरणाऱ्या गरिबांना, तू का विसरतो आहे... मान्य करतो चूक आमची, माजलो होतो जास्त, कळली चूक आम्हाला, अजून किती करशील त्रस्त... तुझ्या नियमांना आव्हान देऊन, करत होतो मनमानी, पिंजऱ्यात केले कैद आम्हाला, मोकाट केलें सारे प्राणी... पुरे झाली देवा शिक्षा, कर तूच आता रक्षा, वाचव साऱ्या जगाला, मागतो येवढीच आता भिक्षा....

गणित

लेखक अनुस्वार यांनी शुक्रवार, 15/05/2020 19:21 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याची स्वत:ची अशी काही गणिते ठरलेली असतात. पण या गणितांत ऐनवेळी अनोळखी अ, ब, क... च्या रूपात येणाऱ्या नव्या स्थिरांकांचा [(constants)/व्यक्तींचा] समावेश सुद्धा कसा चपखल होतो. जणू त्या समीकरणात त्यांची एक विशिष्ट जागा मुद्दामहून मोकळी ठेवली होती. खरेतर हे सुद्धा गणितच! पण अशी कमालीची, अनाकलनीय लवचिकता फक्त या जीवनाच्या गणितातच असते. काही व्यक्तींच्या प्रवेशाने आजवर न सुटलेली क्लिष्ट कोडी चुटकीसरशी सुटतात. तर काही तोंडी गणिते आता गणकयंत्राला सुद्धा अवघड वाटू लागतात. ही सगळी जादू फक्त व्यक्तींची.

भैरवगड (शेरपुंजे) ते रतनगड ट्रेक २८-२९ डिसेंबर २०१९ (B2R Trek)

लेखक Vivek Phatak यांनी शुक्रवार, 15/05/2020 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
मागचा ७५ किमीचा लोणावळा-भीमाशंकर रेंज ट्रेक करून तीन महिने झाले. त्यामुळे परत एक रेंज ट्रेक करण्याची इच्छा होती. रेंज ट्रेक ची मजा काही औरच असते. एक तर अशा ट्रेक ला येणाऱ्यांची संख्या कमी असते त्यामुळे एकमेकांची ओळख पटकन होते आणि ती टिकून राहते. तर ह्या वेळचा ट्रेक होता अकोले तालुक्यातला भैरवगड (शिरपुंजे) ते रतनगड असा जवळपास ५५ किमी चा. ह्या ट्रेक चा मार्ग होता, शिरपुंजे गाव- भैरवगड-घनचक्कर टॉप-गवलदेव टॉप-मुडा टॉप-कुमशेत गाव-कात्राबाई टॉप- रतनगड. ट्रेक साठी एकूण १२ शिलेदार जमले. २७ डिसेंबर ला रात्री साधारण १२ वाजता शिवाजीनगर पुणे येथून खाजगी बस ने प्रस्थान केले.

मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस चौथा) २८.१०.२०१९ संकेश्वर ते धारवाड

लेखक सतीश विष्णू जाधव यांनी शुक्रवार, 15/05/2020 16:03 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस चौथा) संकेश्वर ते धारवाड संकेश्वरमधील राजधानी हॉटेलच्या टेरेसवरून सायकल खाली घेऊन सामानाची बांधाबांध करून सायकलिंग सुरू करायला सकाळचे सहा वाजले. प्रभातीच्या सुवर्णछटांनी आसमंत दरवळून निघाला होता. . तुरळक काळे मेघ क्षितिजावरील सुवर्णप्रभांमध्ये गहिरे रंग भरत होते.

डाग

लेखक कौस्तुभ भोसले यांनी शुक्रवार, 15/05/2020 13:57 या दिवशी प्रकाशित केले.
त्या रात्री त्याला चंद्रावरचा डाग स्पष्ट दिसला. आणि मग त्यानं घट्ट मिटून घेतली खिडक्यांची दार... सताड उघडी ठेवली भयाण काळोखात नयनांची कवाडं... त्या स्मशान शांततेत निर्दयीपणे ओढल्या त्याने रक्ताळलेल्या रेघा आपल्याच हातावर आणि मग पुन्हा पहाटच झाली नाही... -कौस्तुभ

‘मी गोष्टीत मावत नाही’: नवा प्रयोग

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी शुक्रवार, 15/05/2020 13:55 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे ‘मी गोष्टीत मावत नाही’ हा आगळा आविष्कार अस्तित्वात येण्याची पार्श्वभूमी म्हणजेच निर्मिती प्रक्रिया सांगण्याचा हा प्रयत्न. १९८२ पासून मी वहीत काही मजकूर लिहीत आलो. पण मी नक्की काय लिहितोय याचं मला थेट आकलन होत नव्हतं. यात केव्हा एखादा प्रचलित नसलेला विचार असायचा. मनात नवीन तयार झालेलं एखादं सुभाषित असायचं. नंतर लिहून पूर्ण होईल या आशेने काही अचानक सुचलेल्या कवितेच्या ओळी असायच्या. काही वेळा नाटकाचे संवाद वाटावीत अशी काही सुचलेली वाक्य असायची. (निसटून किती गेलं ते मोजता येणार नाही.) या समग्र लिखाणाच्या आविष्काराला पुढे नक्की काय वळण मिळेल मला त्यावेळी माहीत नव्हतं.