||चंद्रवेळ||
1 आकाशातून खिडकीत, खिडकीतून फोटोत उतरलेला चंद्र,
तुला WhatsApp वर पाठवला की मग कुठे माझी पौर्णिमा सुरू होते.
अन तुझा त्यावर reply आला की ती शारदीय होते.
2माहीत असतं, "छान, ओके किंवा तूच माझा चंद्र"
याहून दुसरा तुझा reply येणार नाही.
पण तरी मी खूष असते कारण मला कळतं
याहून अधिक तुला खरंच काही सुचणार नाही.
3 आठवतं? एका रात्री एअरपोर्टवरवरून तू मला कॉल केला होतास.
तू घरी पोचेपर्यंत आपण बोलत होतो. .
तेव्हा चंद्रसुद्धा खिडकीपाशी थांबून राहिला होता.
4 एकदा मोकळ्या आभाळाखाली समुद्रकिनारी
तुझ्या कुशीत चांदणी रात्र घालवायचीय.
खाली चमचमणारी वाळू, समोर चमचमता समुद्र
पांघरायला चांदणं... प्लीज?
पिंजऱ्यातली अंबा
महाभारतातली अंबा! श्रीखंडीच्या शरीरातील स्त्रीमन अंबा! माझ्या कल्पनेतील तिच्या मनाची ही कथा.
पिंजऱ्यातली अंबा
हो! मी अडकले आहे या पिंजऱ्यात. तुम्हाला नाही कळणार ते... कारण तुम्हाला अंबा म्हणजे पितामह भीष्मांच्या मृत्यूचे कारण होणारी स्त्री! इतकेच माहीत आहे. अर्थात त्या अनुषंगाने माझ्याबद्दल महाभारतात जे सांगितलं आहे; ते देखील माहीत असेलच.
मी काशी राजाची ज्येष्ठ मुलगी. माझ्या दोन भगिनी अंबिका आणि अंबालिका. ज्यांनी काहीही न बोलता हस्तिनापूरचे महाराज विचित्रविर्य यांच्याशी विवाह केला. आम्हाला जिंकून आणलं होतं हस्तिनापुराचे रक्षणकर्ते पितामह भीष्मांनी...
श्री सो.डी.माहात्म्य
श्री सो.डी.माहात्म्य
अध्याय पहिला
कैलास पर्वतावर शंकर पार्वती बसलेले आहेत. मुलं सुद्धा त्यांच्या त्यांच्या उद्योगात . समोर नंदी नेहेमीप्रमाणे आळसावलेलाय . आज अचानक पार्वतीला प्रश्न पडलाय, म्हणाली " हे नाथ, हे मी काय बघतीये. गेले काही दिवस अचानक पृथ्वी वरचे मळभ हटलंय . सगळं कसं स्वच्छ , सुंदर , निर्मळ. हे अचानक असं कसं काय घडलं नाथ ? "
शंकरांच्या चेहऱ्यावर हलकेच स्मित उमटलं.
अंडा मसाला आणि गार्लिक नान
साहित्यः
- कांदा (२)
- खोबरं (अर्धी वाटी)
- काजू (१५/२०)
- गोडंबी (१५ /२०)
- अदरक ( दोन मोठे तुकडे)
- लसूण ( ७/८) पाकळ्या
- कोथिंबीर
- तिखट १ चमचा
- मीठ १ चमचा
- हळद १ चमचा
- गरम मसाला १ चमचा

मन्याचे लॉकडाऊन
जानेवारी-फेब्रुवारी महिन्यातच कोरोना व्हायरस जगभर पसरू लागल्याच्या बातम्या मन्याने पेपरमध्ये वाचल्या होत्या. ऑफिसमध्येही दबक्या आवाजात या विषयावर चर्चा सुरु झाली होती. मन्या तिकडे दुर्लक्ष करायचा. कारण ऑफिसमधल्या लोकांना चर्चेसाठी कायमच विषय हवा असतो. आणि एकंदरीत चर्चा,बातम्या वगैरे बघता, कोरोना हा श्रीमंतांचा रोग आहे अशी मन्याची समजूत झाली होती. साधारण परदेशवारी वगैरे केलेल्या लोकांना हा रोग होतोय अशी चर्चा होती. आता मन्याने उभ्या आयुष्यात विमानतळसुद्धा एकदा आणि तेही बाहेरून बघितलं होतं. त्यामुळे कोरोना काही आपल्यापर्यंत पोहोचत नाही असे म्हणून मन्या बऱ्यापैकी बिनधास्त होतं.
वणवा
असा पेटतो वणवा
उरी घर्षती झाडे,
आणि भणानून उठती
दु:खाचे धूसर वाडे.
रात्र वेशीला अडली
अंधारच इथे सजलेला,
अग्नीच्या तप्त तमांतून
मोगरा कसा भिजलेला?
कुणी हाक देऊनी स्वर्गी
वणवा असा रोखावा,
वनमेघ दाटूनी विवर्त
वळीवाचा पाऊस यावा.
-कौस्तुभ
काव्यरस
सुटकेस ५
सुटकेस ४
-----------------------
स्टेशनला गेलो आणि गाडी पार्क केली. मग तोबा गर्दीत सलीमची वाट बघत बसलो. तिकीट काऊंटरच्या आसपास भटकलो. साला नक्की कुठे असेल या विचारात असतानाच तो पुढे येऊन टपकला.
"चलो.." म्हणून मला सोबत येण्याची खूण केली. मी त्याच्या मागे मागे एका उड्डाणपूलाखाली अंधाऱ्या जागेत गेलो. तेथे एक भिकारी भीक मागत बसला होता. त्याच्याकडून कसलीशी पिशवी त्याने उचलली. आणि " ये ले" म्हणून माझ्याकडे दिली.
"क्या है इसमे..?" मी पिशवी चापचत विचारले. आतमध्ये तर जुने फाटके कपडे कोंबून बसवले होते.
"कोकेन.." तो शांतपणे म्हणाला.
आत्म दीपो भव
बुद्ध,,,,,
काय दिले तू मानवजातीला?,,,,
शांती,,,
ती तर केव्हाच कैद झाली आहे
रक्तपिपासू,साम्राज्यवादी,शोषित भांडवलशाहीच्या महत्वकांक्षेत,,,,
संयम,,,
नजर टाकून पहा कुचकरून टाकलेल्या कळ्यांकडे
अहंकारी पुरुषी वासनेने संयमाच्या कधीच चिंधड्या उडविल्या,,,,
हास्य,,,
पहा बर तुला सापडते का?
भुकेने तडफडणाऱ्या निरागस बालकांच्या चेहेऱ्याआड,,,
सत्य,,,
असत्यतेचा नंगानाच चालणाऱ्या स्वार्थी बाजारात
सत्य,,,,सत्य केव्हाच कवडीमोल ठरले,,,
ज्ञान,,,
मदमस्त सत्ता आणि मोह,लोभित मक्तेदार
उपभोगत आहे ज्ञानाला बनवून आपली दासी,,,
अहिंसा,,,
खोट्या अहंमसाठी एकमेकांच्या नरडीचे घोट घेणे
हेच वर्तमानात हिंसेचे तत्वज्ञान होऊ
shinchan :एक उत्तम स्ट्रेस बस्टर
सध्या लॉकडाऊनमुळे टीव्ही बघण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे घरून काम करून आणि बाकीची कामे, फोनाफोनी करून झाल्यावर तेवढाच विरंगुळा उरतो टीव्ही सोडून करण्यासारखे खूप आहे हे कळते तरी वळत नाही असो
पण सारख्या न्यूज चॅनेलवरच्या करोनाच्या घाबरवणाऱ्या बातम्या,सासू सुनांच्या कौटुंबिक भांडणाच्या अमरत्व लाभलेल्या सिरिअल्स ,त्यातच पौराणिक देवादिकांच्या अमरचित्रकथा ,तेच ते चित्रपट (उदा. सोनी -सूर्यवंशम ,झी-हम आपके है कौन ,हम साथ साथ हे आणि राजश्री production चे सिनेमे ,कलर्स -कारण जोहर चे सिनेमे ) ते संपले कि दक्षिण भारतीय डब केलेले अतर्क्य आणि अचाट सिनेमे ह्यातून बघायला काहीच उरत नाही.
मिसळपाव