Skip to main content

हैननीज चिकन राईस

लेखक चौकस२१२ यांनी रविवार, 23/02/2020 या दिवशी प्रकाशित केले.
सिगापोर चा राष्ट्रीय खाद्यपदार्थ म्हणून जो मानला जातो तो म्हणजे "चिकन राईस " साहित्य - अख्खी कोंबडी , देशी असेल तर उत्तम - आल्याचे मोट्ठे काप - लसूणीच्या पाकळ्या - गाजर - पातीचा कांदा - लाला मिरची ठेचा + लसूण / सॉस - बर्फ - जस्मिन तांदूळ -कोंबडी ला साधारण कोलीत तापमान आल्यावर ( रम टेम्प ) मीठ लावून त्यास मालिश करावे (थोडीशी चरबी वेगळी काढून ठेवावी ) - त्यात लसूण आले पातीचा कांदा, गाजर मधल्या जागेत भरावा - मोठया पातेल्यात थोड्या तेलावर चरबी आणि लसूण आणि आले परतावे त्यात मग पाणी घेऊन ते गरम होऊ दयावे - पाणी गरम झाल्यावर त्यात अलगद हि मालिश केलेली कोंबडी सोडावी व शिजू दवयवी .. शिजताना वर येणार घाण झाऱ्याने काढून टाकावी ... मीठ घालावे - कोंबडी काढून ती बर्फाच्या पाण्यात बुडवावी - रूम टेम्प ला आलयावर ती काढून बाजूला ठेवावी - कोंबडी शिजवलेले पाणी टाकून देऊ नये - जस्मिन तांदूळ थोडासा परतून या पाण्यात शिजवावा ( गचः गोळा होऊ देऊ नये आणि फार फडफडीत हि नको ) मिळत असेल तर "pandan " नावाचे पण पण यात घालतात. - चटणी म्हणून , सिराचा नावाचं थाई सॉस किंवा ओली तांबडी मिरची लसूण मीठ अशी चटणी बरोबर + तेल मीठ आणि लसूणाची पंडहरी चटणी आणि काकडी चे काप "आधी छोट्या प्रमाणात करून बघावा मग आक्खी कोंबडी ! हा पदार्थ खाताना कोमट खातात त्यामुळे सर्वसाधारण भारतीय पद्धतीत "हे काय गारढोण" असे वाटू शकते.. ! जपून पाऊल टाकणे" IMG_6247[1] IMG_6250[1] IMG_6249[1] IMG_6253[1]

वाचने 2810
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया