पहिलीच माझी कविता...
प्रेरणा: पोहे मात्र सुरेख झाले https://misalpav.com/node/46836
आहेत शब्द साधे, म्हणून काय झालं
कविता मात्र सुरेख झाली
उसने घेतले शब्द, म्हणून काय झालं
कविता मात्र सुरेख झाली
वाचले नाही कोणी, म्हणून काय झालं
कविता मात्र सुरेख झाली
नाही केली वाहवा, म्हणून काय झालं
कविता मात्र सुरेख झाली
असतील चार कडवे, म्हणून काय झालं
कविता मात्र सुरेख झाली
पहिलीच माझी कविता, म्हणून काय झालं
कविता मात्र सुरेख झाली
वासुकाका
वासुकाका
आमच्या आधीच्या अर्ध्या पिढीतले. . . आयुष्याच्या अर्ध्यावरच गेले. . .
किरकोळ बांधा व सरळ लांब केस.पण जात चाललेले केस मागे घेऊन तेल लावून ते चापून चोपून बसवण्याच्या वासू काकांचा नेहमीचाच खटाटोप. एक पांढरा सदरा व स्वच्छ लेंगा. आपल्या शरीराच्या रंगाशी असलेल कॉन्ट्रास्ट मॅचिंग त्यानी आयुष्यभर बाळगलं, अगदी पांढऱ्या समुद्रावरच्या भागोजी शेठ कीर वैकुंठ धामापर्यंत !
एकूणच वासु काकांचा नीटनेटके राहण्याकडे कल होता.त्यांनी ना कधी कसले व्यसन केले ना कसला शैाक केला.पण नाटके पहाण्याचा छंद मात्र त्यांनी जोपासला.
[शतशब्दकथा] Everything is fair in business and politics
तुम्हाला तर माहितीच आहे ... कथा खरंच पूर्णपणे काल्पनिकच आहे. वस्तुस्थितीशी ह्याचा अजिबात काहीही संबंध नाही ... आणि देव करो, आणि कधीच काही संबंध येऊ पण नये ... बाकी तुम्ही सगळे सूज्ञ आहातच ...
------------------
प्रोजेक्ट डेमो नंतर काही काळाने ...
"मानलं तुम्हाला डॉक्टर, खरंच जबरदस्त आहे तुमचं डिझाईन. तुमचा विशेष सन्मान केला जाईल ... गुप्तपणे ..."
"थँक्यू सर ..."
"तुमच्या औषधाने पण चोख काम केलं आहे."
"थँक्यू सर ... पण आपण ते औषध इतर देशांना का नाही विकत ?
मागे वळुन पाहताना..
मागे वळून पाहताना..
मागे वळुन पाहताना
एक निरागस चेहरा
दिसतो मज मनसोक्त
खळखळुन हसताना
मागे वळुन पाहताना
तोच चेहरा दिसतो मज
भेदरलेल्या डोळ्यांनी
आसपास पाहताना
मागे वळुन पाहताना
लोकांचे चेहेरे न्याहाळताना
तो चेहरा दिसे मज
ओंगळवाण्या नजरा सहन करताना
मागे वळुन पाहताना
ओळखीच्या चेहेऱ्यांवरचे
पाहिले मी मुखवटे
एकावर एक चढवताना
मागे वळुन पाहताना
स्वतःला आरशात बघताना
पाहिले आहे मी
स्वतःचीच किळस करताना
मागे वळुन पाहताना
ते स्पर्श सहन करताना
पाहिले आहे मी
स्वतःलाच तीळ तीळ तुटताना
मागे वळुन पाहताना
रोज रोज मरताना
पाहिले आहे मी स्वतःलाच
नैराश्याच्या खाईत झोकताना
मागे वळुन पाहताना
आज
काव्यरस
प्राक्तनवेळा
क्षितिजाच्या पुसती रेषा
अंधार जसा दरवळतो.
काळीज कुणाचे रडते
चंद्र कुणाचा विव्हळतो.
काळाकडे घ्याव्या मागून
त्या हळव्या प्राक्तनवेळा.
विस्मृतीस कराव्या अर्पण
सुगंधी दुःखांच्या माळा.
रंगीत करावे डोळे
श्वासांना यावी भरती.
उगवून पुन्हा जन्मावे
पाऊस पडल्यावरती.
-कौस्तुभ
काव्यरस
रत्नाकर मतकरी : अॅडम - नव्या आवृत्तीच्या निमित्ताने
रत्नाकर मतकरी : अॅडम - नव्या आवृत्तीच्या निमित्ताने
नुकतंच ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचं निधन झालं.
त्यांना श्रद्धांजली अर्पण करणारा धागा निघालेला आहे, आणि मिपाकरांनी त्यावर भावना व्यक्त केल्या आहेत !
मतकरींच्या कथा वाचताना अचानकपणे अक्षर दिवाळी अंकात त्यांच्या अॅडम या कादंबरीची भेट झाली !
त्यातील शृंगारिक वर्णने वाचून चळायला झालं. सुरुवातीच्या काही पानांनंतर कादंबरीचे मनाचा ताबाच घेतला.
दक्षिण भारताच्या पार्श्वभूमीवरील पात्रांनी मनात घर केले.
हसण्या उसंत नाही
हसण्या उसंत नाही
रडण्यास अंत नाही.
निळे सावळे जगणे
मजला पसंत नाही.
बहरली जरी झाडे
हा तो वसंत नाही.
दिले टाकुन जरी तू
मी नाशवंत नाही.
सांगुन थकलो मी, पण
दुनिया ज्वलंत नाही.
-कौस्तुभ
शुद्धसती मात्रावृत्त
काव्यरस
मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस सहावा) ३०.१०.२०१९ दावनगिरी ते सिरा
मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर
(दिवस सहावा) ३०.१०.२०१९
दावनगिरी ते सिरा
सकाळी सहा वाजता दावनगिरीच्या पोलीस गेस्ट हाऊस मधून राईड सुरू झाली.
रस्त्यावर वाहने तुरळक होती. सरळसोट क्षितीजाकडे जाणार रस्ता, शेवटी एका बिंदूपाशी संपत होता. जणूकाही पुढील वाट आसमंतातील असावी. त्या वाटेवर काळे निळे ढग आमच्या स्वागताची तयारी करत होते
१५ किमी वरच्या 'बिनधास्त' ढाब्यावर आलो.
रस्त्यावर वाहने तुरळक होती. सरळसोट क्षितीजाकडे जाणार रस्ता, शेवटी एका बिंदूपाशी संपत होता. जणूकाही पुढील वाट आसमंतातील असावी. त्या वाटेवर काळे निळे ढग आमच्या स्वागताची तयारी करत होते
१५ किमी वरच्या 'बिनधास्त' ढाब्यावर आलो.उप्पीट मात्र बरे झाले
प्रेरणा:
https://www.misalpav.com/node/46836
रवा होता खमंग भाजला
तरीही
उप्पीट मात्र बरे झाले
फोडणीत मोहरी तडतडली
तरीही
उप्पीट मात्र बरे झाले
उडीद डाळ त्यातच परतली
तरीही
उप्पीट मात्र बरे झाले
आधणातल्या रव्याला दणकून वाफ आणली
तरीही
उप्पीट मात्र बरे झाले
डिशमधल्या उप्पीटावर खोबरे-कोथिंबीर सजली
तरीही
उप्पीट मात्र बरे झाले
मीठ, साखर, लिंबू सगळी भट्टी पर्फेक्ट जमली
तरीही
उप्पीट मात्र बरे झाले
काय, कॉफी करू का? अर्थातच कर
तरीही
उप्पीट मात्र बरे झाले
बाकी स्वयंपाकात आहे निपुण, स्तुती करणार कशी
उप्पीट मात्र...
मिसळपाव