Skip to main content

गडकर्‍यांचे किस्से.

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 22/01/2008 23:02 या दिवशी प्रकाशित केले.
नाटककार राम गणेश गडकरी हे एक हजरजबाबी व्यक्तिमत्व होते त्यांचे काही किस्से. अत्रे गडकर्‍यांना गुरुस्थानी मानत. आपला पहिला काव्यसंग्रह 'फुलबाग' लिहून झाल्यावर, त्याची वही घेऊन अत्रे राम गणेशांकडे अभिप्रायासाठी गेले. काही दिवसांनी अत्रे वही आणायला गेले. त्यांनी विचारलं "कशी काय वाटली फुलबाग?" वहीच्या फाटलेल्या आवरणाकडे बोट दाखवत गडकरी म्हणाले "फुलबाग चांगली आहे, कुंपण तेवढं नीट घाला!" ---------------------------------------------------------- नाटक रंगभूमीवर येण्यापूर्वी गडकर्‍यांच्या घरी नाट्यवाचनाचे प्रयोग होत.

अंदाज बायकोचा वाटे खरा असावा

लेखक अविनाश ओगले यांनी मंगळवार, 22/01/2008 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
अंदाज आरशाचा वाटे खरा असावा... या गज़लेचे विडंबन. सिच्युएशन अशी.. जिचे माझ्यावर नितांत प्रेम आहे, अशा त्या माझ्या भार्येची रीतसर परवानगी घेऊन, `...पण नऊच्या आत परत या' ही अशक्यप्राय अट मान्य करुन अस्मादिक मित्रांच्या बरोबर मद्यमैफलीला गेले. मित्रांनी आग्रहाने खूप पाजली. `काही काळजी करु नकोस. आम्ही आहोत. वहिनीनी तुला दार उघडून आत घेतल्यावरच आम्ही जाऊ...' अशी आश्वासने दिली. मैफल रात्री बारा वाजता संपन्न झाली. मित्रांनी दगा दिला. कडाक्याच्या थंडीत, निर्मनुष्य रस्त्यावर... मला माझ्या दारासमोर उभे केले. दार वाजवले.
Taxonomy upgrade extras

भारतरत्न, सर, नाईटहूड किताबांबद्दल काही ..........

लेखक छोटा डॉन यांनी मंगळवार, 22/01/2008 17:21 या दिवशी प्रकाशित केले.
नव्या वर्षाच्या प्रारंभाबरोबरच काही नव्या गोष्टींची चर्चा सूरू होते. पण आज मला एका वेगळ्या गोष्टींबद्दल चर्चा करू वाटते ती म्हणजे वेगवेगळे पूरस्कार, ते मिळवणार्‍या व्यक्ती, त्यांचे निकष, समाजावर त्यांचा प्रभाव व समाजाला त्यांच्यापासून मिळणारी प्रेरणा व होणारा फायदा......... गेल्या २-४ दिवसापासून "सचिन तेंडूलकरला" भविष्यात दिल्या जाणार्‍या "सर किंवा नाईटहूड" सन्मानाबद्दल मिडियात चर्चा चालू झाली आहे .... मग यात हा पूरस्कार मिळवणार्‍या ईतिहासातिल व्यक्ती, त्यांचे कर्तूत्व, समाजावर त्यांचा प्रभाव यासारख्या अनेक गोष्टींवर काथ्याकूट झाला.

तुकयाची अवली.. .. अवलोकन

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 22/01/2008 03:29 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, १५ दिवसांपूर्वी पुण्यांत "तुकयाची आवली" या प्रा. सौ. मंजुश्री गोखले यांच्या मेहता प्रकाशन ने छापलेल्या कादंबरीचे औपचारिक प्रकाशन झाले. हि कादंबरी नुकतीच मला वाचायला मिळाली. आवलीवर आजपर्यन्त जे वाचले ऐकले होते त्यापेक्षा काय वेगळे आहे हे पाहण्यासाठि ही कादंबरी वाचायला घेतली. आणि खरं सांगते, ती वाचायला सुरूवात केल्यानंतर पूर्ण करूनच खाली ठेवली. झपाटल्या सारखी मी ती वाचली. त्याबद्दल थोडेसे.. लेखिकेची भूमिका : आवली , संत तुकाराम महाराजांची द्वितीय पत्नी, एवढि आणि फक्त एवढीच ओळख आहे आवलीची.

सॄष्टीची युक्ती

लेखक मीनल गद्रे. यांनी मंगळवार, 22/01/2008 01:40 या दिवशी प्रकाशित केले.
मेघानी केली अवनीची पूजा कधी थेंबांनी आला पाऊस राजा हिमपाकळ्या अलगदल्या ताज्या अंगणी माझ्या तृणावरी विसावल्या. नवरस ,नव आल्हाद ताजा वाटे पूजेची मज मौजमजा मेघाची काय वर्णावी भक्ती कळेना अशी ही सॄष्टीची युक्ती.

आनंदयात्री..

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 22/01/2008 00:59 या दिवशी प्रकाशित केले.
ही कविता माझी नाही. कोणाची आहे ते ही नाही माहिति. मला आवडली म्हणून इथे देत आहे. अफाट आकाश हिरवी धरती पुनवेची रात सागर-भरती पाचूंची लकेर कुरणाच्या ओठी प्रकाशाचा गर्भ जलवंती-पोटी अखंड नूतन मला ही धरित्री आनंदयात्री मी आनंदयात्री मेघांच्या उत्सवीं जाहलों उन्मन दवांत तीर्थांचे घेतलें दर्शन दूर क्षितिजाची निळी भुलावण पाशांविण मला ठेवी खिळवून अक्षयवीणाच घुमे माझ्या गात्री आनंदयात्री मी आनंदयात्री हलके कढून कंटक पायींचे स्वरांत विणिले सर मीं स्वप्नांचे हासत दु:खाचा केला मी स्वीकार वर्षिलें चादंणें पिऊन अंधार प्रकाशाचें गाणें अवसेच्या रात्रीं आनंदयात्री मी आनंदयात्री

प्राजक्त..

लेखक प्राजु यांनी सोमवार, 21/01/2008 23:44 या दिवशी प्रकाशित केले.
माझी मैत्रिण मीनल गद्रे हिने पाठवलेली ही माहीती. आवडली म्हणून इथे देत आहे. शेफ़ालिका म्हणजे प्राजक्त. प्राजक्ताला आधी खूप दिवस फ़ुलं येत नव्हती. रंगरुपाने सामान्य असलेलं ते झाड बिचारं अबोल होऊन गुमसुम उभं असायचं. पानं काळवंडलेली उदास. वनातले इतर वॄक्ष फ़ुलांनी बहरुन गेलेले. देवानेच दया वाटून सांगितलं की, "बहरशील तु ही. पण फ़ुलांच हे लेणं मिळवायला तुला तपश्चर्या मात्र करावी लागेल. " प्राजक्ताने ती केली. दिवस-महिने-वर्ष उलटले. तपात रमून गेल्यावर फ़ुलांची असोशीचं फ़िकट झाली मनात.

मिस्सळ मी चापतो, तर्रीची, मिस्सळ मी चापतो...

लेखक अविनाश ओगले यांनी सोमवार, 21/01/2008 21:46 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, कोल्हापूरी मिसळ हा आमचा फार `जिव्हा'ळ्याचा विषय. म्हणूनच आमचे परममित्र मा. धोंडोपंत यानी मिसळपाव या स्थळाची वाट दाखवताच आम्हाला विलक्षण आनंद झाला. कोल्हापूरातील विविध मिसळस्थळे आमच्या उत्तम परिचयाची. `येथे उत्तम मिसळ मिळेल' असा फलक असलेल्या हाटेलात मिसळ कधीच चांगली नसते... पण ज्या हाटेलावर नावाचा फलकसुद्धा नसतो, अशी उत्तम मिसळस्थळे केवळ वासावरून आम्ही हुडकत असतो.. परवा कधीतरी `राधा ही बावरी हरीची' हे गाणे मनात घोळत असताना आम्ही मिसळ चापत होतो... या दोन्हीची कधीतरी सरमिसळ झाली... आणि हे विडंबन जन्माला आले...
Taxonomy upgrade extras

आंतर्जालावर प्रत-अधिकाराची मालकी कशी ठरावी? मालकाची ओळख काय? चोराची काय?

लेखक धनंजय यांनी सोमवार, 21/01/2008 21:42 या दिवशी प्रकाशित केले.
हल्लीच मिसळपावावर काही सदस्यांच्या अशा लक्षात आले आहे की येथे प्रकाशित झालेले काही लेखन त्यांनी पूर्वी वाचलेले होते. (एक दुवा.) यावर सरपंचांनी धोरणाचे सूतोवाच केले. (सरपंचांचे धोरण) ते धोरण चोख असले, नैतिक असले, तरी त्याच्या अंमलबजावणीविषयी मनात प्रश्न उभा राहातो. मिसळपावकर क्षक्ष आणि मायबोलीकर यय दोघेही एकच असू शकतात ही कल्पना मनात चमकून गेली. आता त्यांच्या अन्य प्रतिसादांत दोघांची लेखनशैली एकच की वेगळी, वेगळी असल्यास तो प्रतिभेचा भाग आहे काय?