मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मनःशांती

ॐकार · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
मनःशांतीचा शोध घेत होतो खूप दिवसांपासून याहूवर शोधले, रेडीफवर आलो जाऊन विकिपिडिया पाहिले नेट काढले गूगलून भाषा पाहिली बदलून चित्रेही शोधत राहिलो शब्द झाले फिरवून ब्लॉग्जही वाचत फिरलो निवांत क्षणी एका उघडले डोळे, उजळली कांती लॅपटॉप बंद झाला सापडली मनःशांती भारनियमनाचा मला कळलेला हा एकमेव फायदा बाकी तीच महागाई, तेच राजकारण आणि तोच कायदा -ॐकार

वाचने 4795 वाचनखूण प्रतिक्रिया 12

विकास Sun, 07/20/2008 - 20:31
भारनियमनाचा मला कळलेला हा एकमेव फायदा बाकी तीच महागाई, तेच राजकारण आणि तोच कायदा एकदम आवडली! हरी ॐ :-)

In reply to by नंदन

धनंजय Mon, 07/21/2008 - 01:10
याही प्रकारात ॐकार यांच्या लेखणीतली सफाई जाणवते. (पण त्यांच्या नेहमीच्या आशयगर्भ रहस्यपूर्ण कवितांपेक्षा ही थोडी उघड-उघड आहे.)

In reply to by प्रियाली

सहज Mon, 07/21/2008 - 06:17
पुर्ण सहमत. ॐकार कविता आवडली. जरा मनःशांती मिळवायचा प्रयत्न केला तर "काय शेठ, आज नाराज दिसताय!" अश्या खरडी येतात. : - (

विसोबा खेचर Mon, 07/21/2008 - 08:24
वा! अचानक एक छान वळण घेणारी परंतु भारनियमासारख्या डोकेदुखीवाल्या विषयावर भाष्य करणारी कविता..! तात्या.

अमोल केळकर Mon, 07/21/2008 - 09:21
कविता आवडली अमोल -------------------------------------------------- गुरुने दिला ज्ञानरुपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा !! भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

वरदा Mon, 07/21/2008 - 20:25
कविता आवडली... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

प्राजु Mon, 07/21/2008 - 22:06
भारनियमन सारख्या बोरिंग विषयावर चांगला दृष्टी कोन देणारी कविता... अभिनंदन. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/