सहावा वेतन आयोग लागू; २००६ पासूनचा फरक मिळणार
नवी दिल्ली - सहाव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखविला असून जानेवारी २००६ पासून या आयोगाच्या शिफारशी लागू होणार आहेत. त्यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरासरी २१ टक्के वेतनवाढ मिळणार असून जानेवारी २००६ पासूनचा वेतनातील फरकही देण्यात येणार आहे.
कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची अंमलबजावणी येत्या सप्टेंबर महिन्यापासून होणार असून वेतनातील फरकाची रक्कम दोन टप्प्यात देण्यात येणार आहे. त्यापैकी ४० टक्के रक्कम चालू आर्थिक वर्षात तर उर्वरित ६० टक्के रक्कम २००९-१० या आर्थिक वर्षात देण्यात येईल.
मिसळपाव

मस्त आहे ना?
तुम्हल काय वाटत?