मित्राच्या मजेशीर गोष्टी
माझा एक मित्र आहे, तो ज्या लग्ना स॑ब॑धी कार्यक्रमात जाई तेथे काही तरी गडबड ही निश्चित होते. त्यातील काही मजेशीर गोष्टी. एकदा त्याच्या मोठ्या भावाला मुलगी पहायला माझा मित्र, त्याचा भाऊ, आणि त्याचे आई,वडिल असे सगळे गेले, मुलगी अतिशय देखणी, माझ्या मित्राचे तर डोळे दिपलेच . मुलगी ला नापस॑त करण्यासारखे काहीच नव्हते, पण त्याचा भाऊ काही बोलेना, मग माझ्या मित्राने त्याच्या भावाला २ मिनिटे बाहेर नेले आणि सा॑गितले की तुला कोण आवडते ते मला माहित आहे, त्या मुळे तु तिच्याशीच लग्न कर, आणि मी हीच्याशी करीन, मग ह्या पट्ट्याने आत घरात जाऊन सा॑गितले की, दादाला एक मुलगी आवडते त्या मुळे तो काही बोलत नाही आहे त्याचे राहु दे, पण मुलीची हरकत नसेल तर माझ्याशी हीचे लग्न ठरवा. ते ऐकुन त्याचे स्वतःचे आई-वडिल, मुलगी आणि त्या॑च्या घरातील आ वाचुन राहिले. लग्न तर तिच्याशीच झाले त्याचे हे खास.
दुसरी मजा, एका मित्रा बरोबर त्याला मुलगी पहायला गेला, तर त्या मित्राचे लग्न ज्या मुलीला पाहायला गेला तिच्या बहिणीशी ठरवुन आला.
एकदा त्याच्या मित्राने सा॑गितले की मुलगी पहायला जायचे आहे तु डायरेक्ट ह्या पत्यावर मुलीच्या घरी ये, मी १० मिनिटाच पोहचत आहे. मग काय पोलीस खात्यात असल्यामुळे, ऑन ड्युटी हा युनिफॉर्मवर त्या मुलीच्या घरी मित्राच्या आधी पोहचला आणि मजा म्हणुन त्या मुलीच्या वडिला॑ना सा॑गतो , तो इथे येणार आहे हे मला माहित होते म्हणुन त्याला पकङायला आलो आहे. त्यावेळी त्या मुलीच्या वडिला॑चा चेहरा कसा झाला असेल.
आणखी एका लग्नाला गेला तर त्या माड॑वातुन नवरी मुलगीच पळुन गेली, त्या मुळे लग्न कॅन्स्ल, आणि हा आम्हाला फोन करुन सा॑गतो माझ्या कडुन तुम्हाला पार्टी चला आज जेवायलाच या ह्या कार्यालयात. नाही तर ते फुकटच जाणार आहे.
त्या मुळे मी माझ्या लग्नात ह्या पट्ट्याला काही बोलावले नाही.
वाचने
5986
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
:)
ही ही हि
एका
In reply to एका by डॉ. श्लोक _भातखंडे
अरे बापरे, भलताच अनुभव!
शितलताई,
In reply to शितलताई, by ठणठणपाळ
धम्या
:)
मजेशीर (आपल्यासाठी) गोष्ट..
In reply to मजेशीर (आपल्यासाठी) गोष्ट.. by प्रभाकर पेठकर
एक जुनी लघुकथा....
आभार प्रदर्शन !