Skip to main content

आमचे डि.डि. जोशी सर,

Published on 31/07/2008 - 19:38 प्रकाशित मुखपृष्ठ
ज्येष्ठ कलाशिक्षक दि. दा. जोशी यांचे निधन पुणे, ता. २२ - न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोडचे माजी कलाशिक्षक दि. दा. जोशी (वय ७४) यांचे आज निधन झाले. ........ शिवसेनेचे माजी आमदार (कै.) मो. दा. जोशी यांचे ते बंधू होत. दि. दा. जोशी प्रारंभी रसायनी (जि. रायगड) येथे शिक्षक होते. नंतर टिळक रोड येथील शाळेत त्यांनी चित्रकला व इतिहासाचे अध्यापन केले. पुणे माध्यमिक शिक्षक संघ आणि भारतीय शिक्षण मंडळ यांच्या उभारणीत त्यांचा मोठा सहभाग होता.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 1515

स्व.मह॑मद रफी या॑ना आदरा॑जली

Published on 31/07/2008 - 18:35 प्रकाशित मुखपृष्ठ
आज ३१ जुलै! माझ्या अत्य॑त लाडक्या गायकाचा, रफीसाहेबा॑चा स्मृतिदिन! त्या॑च्या पवित्र स्मृती॑ना माझे लाख लाख प्रणाम.. अल्पचरित्र - २४ डिसेम्बर १९२४ रोजी, अमृतसर जवळच्या कोटला सुलतानपूर ह्या छोट्याश्या गावात हाजी अली मह॑मद या॑ना सहावे पुत्ररत्न झाले. त्यावेळेस कोणीच ही कल्पना करू शकले नसेल की हेच मूल अखिल विश्वात महान गायक म्हणून नाव गाजविणार आहे.. मह॑मद रफी!! लहानपणापासूनच रफीसाहेबा॑ना गाण्याची आवड होती. त्या॑चा गोड गळा त्या॑च्या मेव्हण्याने, मह॑मद हमीदने हेरला व त्या॑ना स॑गीत-शिक्षेसाठी प्रोत्साहन दिले.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 7561

प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर

Published on 31/07/2008 - 17:38 प्रकाशित मुखपृष्ठ
आशिया खंडाचे नोबेल म्हणून ओळखला जाणारा रॅमन मॅगसेसे पुरस्कार डॉ. प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांना आज जाहीर झाला. बाबा आमटेंनाही हा पुरस्कार २३ वर्षांपूर्वी मिळाला होता. त्यांच्या कामाचा वारसा त्यांचा मुलगा आणि सून पुढे नेत आहेत, याचीच ही प्रतीकात्मक पावती म्हणावी लागेल. मॅगसेसे पुरस्काराच्या संकेतस्थळावरील आमटे दांपत्याचा परिचय येथे वाचता येईल. यानिमित्ताने आनंदवन आणि तिथल्या कामाबद्दल श्री. मिलिंद भांडारकर (सर्किट) यांनी अधिक लिहिले, तर मिपाकरांना वाचायला नक्कीच आवडेल.
लेखनविषय:

याद्या 9658

रव्याच्या वड्या

Published on 31/07/2008 - 17:09 प्रकाशित मुखपृष्ठ
साहित्य- १ वाटी बारीक रवा,१ वाटी साजूक तूप,३ वाट्या दूध,३. ५ ते ४ वाट्या साखर,वेलचीपूड, केशर,१/२ वाटी बदाम किवा काजूपूड (ऐच्छिक) कृती- रवा थोडा भाजून घेणे. थंड झाला की बाकी सर्व जिन्नस त्यात मिसळणे. एका कढईत सर्व मिश्रण आटवत ठेवणे. मिश्रण उडते, त्यामुळे ढवळताना काळजी घेणे. घट्ट झाले की लाटून किवा थापून वड्या पाडणे.

याद्या 7759

भारत सरकारचा तक्रारींसंदर्भात ऑनलाइन फोरम

Published on 31/07/2008 - 15:53 प्रकाशित मुखपृष्ठ
भारत सरकारचा तक्रारींसंदर्भात ऑनलाइन फोरम भारत सरकारच्या http://pgportal.gov.in/ या पोर्टलला जरूर भेट द्या. बहुदा तुमच्या तक्रारींची येथे दखल घेतली जाइल (?)

याद्या 1551

सफर---काम्पुंग तेपी सुंगाइची (आता फोटोसह बघता येईल!)

Published on 31/07/2008 - 14:27 प्रकाशित मुखपृष्ठ
मलेशिया हा नैसर्गिक सौंदर्याचा वरदहस्त लाभलेला एक देश! जगभरातले लोक येथे पर्यटनस्थ्ळ म्हणून येतात. हा सर्व भाग सदाहरित वृक्षराजीने नटलेला.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 6987

जगणे (मजकूर काढून टाकण्यात आला आहे!)

Published on 31/07/2008 - 13:10 प्रकाशित मुखपृष्ठ
मजकूर काढून टाकण्यात आलेला आहे. बिपिनशी सहमत! -- आणिबाणीचा शासनकर्ता.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 1575

दिल्लीच्या दरबारामधली राजा आणिक राणी.

Published on 31/07/2008 - 12:51 प्रकाशित मुखपृष्ठ
दिल्लीच्या दरबारामधली राजा आणिक राणी. हरता हरता डाव जिंकला बनली एक कहाणी..! राजा वदला कशी बिनसली "न्युक्लिअर डील" ची भाषा. माझ्या नशीबासवे खेळती या "पंज्याच्या रेषा. त्या राणीच्या डोळा पण ना दाटून आले पाणी ..! ..१ तिला विचारी राजा खासदार कसे फोडावे ? का डाव्यांनी पाठिंब्याचे हात असे सोडावे ? या प्रश्नाला उत्तर नव्हते राणी केविलवाणी..! ..२ राणी वदली बघत एकटक युपीकडच्या वाटा. उद्या पहाटे अमरसिंग अन मुलायमाला गाठा. अन राजाला लगेच पटली "मायाजाल" निशाणी..! ..३ त्या राणीने मिटळे डोळे "क्रॉस व्होटिंग" होताना. त्या राजाचा भाव वाढला गीत तिचे गाताना. विरोधकांच्या मुखात उरली "सिंग इज किंग" विराणी..!
लेखनविषय:

याद्या 3114
Taxonomy upgrade extras

(दूर आहे डेडलाईन अजूनि)

Published on 31/07/2008 - 02:15 प्रकाशित मुखपृष्ठ
मिपावर एक से एक विडंबने वाचून काही महिन्यांपूर्वी लिहिलेले एक विडंबन इथे पोस्ट करावे असे वाटले :) ----------------------- ('तरूण आहे रात्र अजूनि' हे गाणं एक सॉफ्टवेअर प्रोग्रॅमरच्या नजरेतूनि ...) दूर आहे डेडलाईन अजूनि, साहेबा पेटलास का रे.... एवढ्यातच मानगुटीवर, तू असा बसलास का रे.... अजूनही सुकल्या न कागदी, रिक्वायरमेंटच्या ओळी अजून मी लिहले कुठे रे, हाय तू रूसलास का रे .... सांग या शेजारच्या चटक चांदणीला काय सांगू तिला पहाया जमती सारे, आणि तू बसलास का रे .... बघ तुला मिळतोच आहे, पश्चिमेचा मार गोरा रूपया नि डॉलरमधला फरक तू लुटलास का रे .... उसळती पीसीवर ह्या, क्रिकेटच्या स्कोअर लाटा तू भ
लेखनविषय:

याद्या 2376
Taxonomy upgrade extras

दीर्घ ते लघु(कथा) चित्रपट

Published on 31/07/2008 - 01:17 प्रकाशित मुखपृष्ठ
मी आतापर्यंत ऐकलेल्या हिंदी सिनेमाच्या नावांत ’मां’ हे सर्वांत लहान व ’जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ हे सर्वांत मोठे नाव आहे. यात ’मां’ नावाचे ३ सिनेमे येऊन गेले. ’जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ एकच( ह्या नावाचा सिनेमा पुन्हा बनविणार कोण आणि पाहणार कोण आज काल ;) ) नंतरही मोठ्या नावाचे सिनेमे येऊन गेले उदा. ’पाप को जलाकर राख कर दूंगा’, ’जुल्म को जला दुंगा’ वगैरे. ते काही जास्त चालले नाहीत. पण नंतर ’हम आपके हैं कौन’, ’दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हे जरा मोठ्या नावाचे सिनेमे आले जे भरपूर चालले. त्यामुळे तेव्हाही जरा मोठ्या नावाचे सिनेमे काढायची लाट आली.

याद्या 6247