Skip to main content

"मैने प्यार किंया" वाली "भाग्यश्री पटवर्धन" आता 'झक मारली अन बायको केली' या मराठी चित्रपटात भरत जाधवची हिरॉईन आहे.

प्रकाशित मुखपृष्ठ

याद्या 1480
प्रतिक्रिया 18

"who cares?" असा किंवा अश्या अर्थाचा पर्याय का नाही?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अगदी, हू केअर्स आणि वॉटेव्हर असे पर्याय हवे होते. आणि मुद्दा तिसरा बदलून भरत आणि हिमालयची तुलना करा! :)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अरेरेरे काय ग नयने .. काय पण हे .. आगं भरत्या लैच बोर करतो ,..... मला तर त्याचीच किव येते .. एका नाटका वर एवढा चालला की बास रे बाबा ते रडनं ... तो लक्षा पण लै बोर हाणायचा ... आणि काय ग ? ही भाग्यश्री कोण एवढी निकोल किडमन का अँजेलिना जोली लागुन चालली ? आमच्या तर खिजगीनतीतही नाही ती ... हा महेश मांजरेकराच्या 'प्राण जाये पर शान ना जाये' या चाळपटात तर भाग्यश्री पेक्षा १० पट बरी 'रवाना* टंडेल' पण काम केलं होतं की ? त्या मुळे आमचं मत यम्मी आज्जींप्रमाणे नॉन-एग्झिस्टींग ऑप्शन "व्हू केअर्स" ला .... वैश्विक आज्जींचा वैश्विक नातू -- ( टारुबाळ ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

माझं मत ५ व्या पर्यायाला. बिचार्‍या भाग्यश्रीची कीव करावी तितकी कमीच! असो, कुणी कुणासोबत काम करावं हा ज्याचा-त्याचा/जिचा-तिचा वैयक्तिक मामला आहे. अहो शेवटी दोन टायमाची रोजीरोटी प्रत्येकाला मिळवायची आहे, भाग्यश्रीही त्याला अपवाद नाही. काय करेल बापडी, भरत तर भरत! की भाग्यश्रीला इतके वाईट दिवस आलेत.. की हिंदी सोडून ती मराठी कडे वळली.. हा पर्यायही पटण्याजोगा वाटला! आपला, (हिंदीसिनेमांचा प्रेमी) तात्या.

तीन उत्तरांवरून सांख्यिकी (statistics)! मुली/बायका भाग्यश्रीकडे दुर्लक्ष करतात आणि मुलं/पुरुषांना तिची कीव येते! ;-) (स्वतःच्या सांख्यिकीबद्दल साशंक) यमी

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

एकेकाळी ही माझी अतिशय लाडकी हिरोईन होती. नशिब बिचारीच! पण यमी म्हणते त्याप्रमाणे "हू केअर्स??" असेच मी म्हणते. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

भरत लक्ष्याच्या वळणावर चालला आहे किंवा गेला आहे... त्याची तुलना मैंने प्यार कियाच्या चॉकलेट हिरो सलमानशी करण्यात अर्थ नाही... आज काहीही असला तरी तेव्हा सलमान आजच्या भरत पेक्षा फार बरा होता.. इथे मराठी चित्रपट काही चांगले दिवस पाहून परत जुन्या साच्याच्या वळणावर जात आहेत असा पर्याय पाहिजे...

who cares?" असा किंवा अश्या अर्थाचा पर्याय का नाही? "व्हाय टु केअर" असाही एक पर्याय द्यावा काय फरक पडतो. किंवा हा कौल ती वाचणार आहे का? तसाच ते वाचुन तीला किंवा आपल्याला काय फरक पडणार आहे पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

आपल्याला तर काही फरक पडत नाही. सिनेमात काम आवडले तर ठीक नाहीतर तिला विसरलोच होतो :) तरीही मैने प्यार किया, कैद में है बुलबुल, त्यागी, पायल, जननी आणि नुकतेच एक दोन चित्रपट येऊन गेले. म्हणजे एकंदरीत तिचे चित्रपटांत काम सुरूच होते. त्यामुळे मराठी सिनेमांत येणे काही खास गोष्ट नाही. असो, तिला मराठी सिनेमाकरीता शुभेच्छा :)

काय राव माझ्या नावाला इतक्या शिव्या घालताय सगळे !! :) हेहे.. कौलाच्या बाबतीत, हू केअर्सच!

In reply to by भाग्यश्री

मी विचारणारच होतो की सिनेमा सोडून इकडे कुठे :)

वरील प्रतिसाद वाचून, या कौलातील प्रश्नाचे गांभिर्य कुणाच्या लक्षात आले नाही हे पाहून खेद वाटला. ही बातमी वाचल्यापासून काही सुचेनासे झाले आहे. काय करावेते कळत नाही. छ्छ्या! देश कुणीकडे चाललाय काही समजत नाही.... काळजीचे कारण आहे. ;) महागाई समजू शकतो, गरीब-श्रीमंतीतील दरी समजू शकतो, इतकेच काय अगदी संकेतस्थळांच्या इतिहासावरील लेखपण समजू शकतो... पण भाग्यश्रीने 'झक मारली अन बायको केली' या मराठी चित्रपटात भरत जाधवची हिरॉईन म्हणून काम करावे? काही खरे नाही... 8|

'झक मारली अन बायको केली' हा चित्रपट जेव्हा केव्हा प्रदर्शित होईल , तेव्हा.. कदाचित 'भाग्यश्री' च्या नावावर थोडीफार गर्दी खेचेल, असा दूरदर्शीपणा कदाचित निर्मात्याला अवगत झाला असेल..... परंतु.. मैने प्यार... मधली 'सुमन' काही केल्या नजरेसमोरून जात नाही. सांगलीच्या राजघराण्यातली म्हणजेच पटवर्धनांची राजकन्या असलेली भाग्यश्री, आता भरत जाधव बरोबर 'झक मारताना' कशी दिसेल बरं? पद्मिनि कोल्हापुरेच्या पावलावर पाऊल टाकून भाग्यश्री मराठीत येतेय खरी, पण सध्या तरी तिचा हा निर्णय तिला नक्की घाट्यात घालणार असेच वाटतेय. सारी मे सारी 'प्रफुल्ल' सारी... भाग्यश्री आता भरत बरोबर 'झक मारी'..... ;)

In reply to by मृगनयनी

आगं नयने ... त्या थर्डक्लास टीव्ही सिरीयल पेक्षा मराठी शिनुमा बरा की ग ? मी ऐकलं होतं कोण्या बेसहारा चॅनेल च्या ३र्ड क्लास सिरीयल मधे काम करते म्हणे ती .. मराठीत काम केलं तर वाईट नाही.. टोनाली बंद्री ने पण अमुल बटरकरच्या पिक्चरात काम केलंय .. हा आता माझ्या सारखा देखणा(नसलो तरी मेकअप केरुन) आणि तगडा हिरो असता तर वादच वेगळा झाला असता... सेम लाईक अमिताभ-जिया (निशब्द) ...... इथे थोड उलट .. टार्‍या-पटवर्धन आज्जी =)) स्वता:वर (उगाच) गर्व असलेला -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

भाग्यश्री एव्हाना थ्री टायर आंटी झाली असेल. भरत पाठमोरा अशोक सराफ.भाग्य्श्री च्या ऐवजी शोमा आनंद पण चालली असती. क्या फर्क पडता है?

भाग्यश्रीची कीव करावी तेवढी थोडीच !! हा हा हा हा !!!! भरत नको येउस परत... भाग्यश्री गेली झक मारत.....