तिन्ही त्रिकाळ
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
तिन्ही त्रिकाळ घरामधे ह्यांचीच सारखी घाई
काही करायचे म्हटलं, तर माझ्यासाठी वेळ नाही
सकाळी आरामात उठणे कसले आमच्या नशीबात
ब्रेकफास्ट खाऊन लवकर, ह्यांना जायचे ऑफीसात
आज सुट्टीचा रविवार, उठावे आरामात, सुचवता
रोमॅन्टीक मूड ह्यांचा म्हणे पाहू सूर्य उगवता
सुर्य तरी कसला अरसीक, तिन्ही काळ करतो काम
उशीरा का उगवत नाही घ्यायला एक दिवस आराम?
दुपारी हे ऑफीसात, मैत्रीणीशी फोनवर बोलते खूपवेळ
मधूनच ह्यांना आठवण येते, एन्गेज मिळताच घालमेल
संध्याकाळी घरी लवकर, एक दिवस तर बायकोसाठी
पण कसले काय, उशीरा पर्यंत रोज मरमर कामासाठी
रात्र तरी आपली असावी? ह्यांची टेली कॉन्फरन्स उपटते
अमेरीकेत सकाळ असेल हो, पण आमची मात्र झोप उडते.
वाचने
2572
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
हाहाहा...!
'तिन्ही त्रिकाळ'?
In reply to 'तिन्ही त्रिकाळ'? by ऐका दाजीबा
पुनरोक्ती
In reply to पुनरोक्ती by अरुण मनोहर
देजा वू
दुपारी हे