दिवस असे की ढोणी खेळत नाही, अन अनिल चालत नाही..!
लेखनविषय:
दिवस असे की ढोणी खेळत नाही, अन अनिल चालत नाही.
कांगारुंशी त्यांच्या देशी लढतो.
कधी केनिया बांगलादेशही नडतो.
या हरण्याचे कारण उमगत नाही.
या हरणे म्हणवत नाही.
कसोटी, वनडे, २०-२० चे तुकडे.
त्यावर नाचे बीसीसीआयचे घोडे.
या घोड्याला लगाम शोधीत आहे,
आयसीसीला गवसत नाही.
तेंडल्या अनफ़िट फ़ॉर्मात नाही युवी.
पाटा पीचवर झहीर भज्जी हेवी.
पराभवाला हजार कारणे देतो.
पण कबूल करवत नाही.
फ़ायनल मॅचला आता हसतो थोडे.
मिटून घेतो वस्तुस्थितीचे डोळे.
या खेळाला विजयाचाही आता.
मेघ पालवत नाही.
-- अभिजीत दाते
मूळ गीत - दिवस असे की कोणी माझा नाही
कवी - संदिप खरे
वाचने
2848
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
मस्त
सुन्दर
मजेशीर विडंबन
मस्त च
गुड वन ...
मस्त
In reply to मस्त by पावसाची परी
कोण ?
In reply to कोण ? by टारझन
टार्या..
छान...
In reply to छान... by अविनाश ओगले
टार्याला जे म्हणायचे होते