Skip to main content

ग्रहण

Published on 01/08/2008 - 18:53 प्रकाशित मुखपृष्ठ
ग्रहणात का खाऊ नये याची शास्त्रीय माहिती कुठे मिळेल ? मुळात त्याला तसा शास्त्रीय आधार आहे का ? आज एकाने मला ग्रहण आणि आपल्या रूढींबद्द्ल विचारलं.. मी जमेल तसं पाळतोय , माझा विश्वास आहे पण माझ्याकडे ठोस असं उत्तरच नाहिये. काही वर्षांपूर्वी मी एका धार्मिक पुस्तकात वाचलेलं पण आत्ता माझ्याकडे ते पुस्तकही नाही आणि मला तशी माहिती जालावर मिळतही नाहिये. याबद्द्ल अधिक माहिती कोणी देऊ शकेल का ? ( link वगैरे असेल तर जरूर द्या.). आणि हो, तुम्हाला काय वाटतं ? नावाउलट वागणारा - पार्टनर

याद्या 6429

ऒलिम्पिक आणि भारत : अपेक्षा क्षमता आणि तारतम्य...

Published on 01/08/2008 - 18:10 प्रकाशित मुखपृष्ठ
ऒलिंपिक जवळ आलं की वर्तमानपत्रांतून आणि टी व्ही वरून एक विचित्र प्रकारचं मार्केटिंग सुरू होतं, अपेक्षा वाढवणारं बाजारीकरण..आपल्या संघाच्या खेळाडूंना शुभेच्छा देणं, त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा करणं मी समजू शकतो, पण पदकांची अपेक्षा / पदकांची अपेक्षा असं किती म्हणत राहणार ?

याद्या 10661

सहजीवन

Published on 01/08/2008 - 17:29 प्रकाशित मुखपृष्ठ
सहजीवनाच्या मैदानात तुझ्यासाठी हरूनही तुला, मला जिंकता आले नाही. डाव तुझ्या हाती दिला तरी, तुला खेळता आला नाही. रडुन जिंकता येत नाही आणि चिडुन डाव उधळायचा नसतो, कधी समजणार हे तुला , प्रेमाने कोणालाही जिंकंता येते. सहजीवनाच्या प्रवासात तुझ्यासाठी राजमार्ग सोडुन पाऊल वाट स्विकारली होती अरूंद, अवघड, वळणे पाऊलवाटेची जरी गंमत त्यातली तुला कधी कळ्लीच नाही. कधी कळणार हे तुला , सोबत असली प्रेमाची की प्रवास हा जाणवतही नाही.
लेखनविषय:

याद्या 4294
Taxonomy upgrade extras

सूर्यग्रहणाचे थेट प्रक्षेपण (नासाचे संस्थळ)

Published on 01/08/2008 - 16:34 प्रकाशित मुखपृष्ठ
नमस्कार मंडळी ! आज सूर्यग्रहण आहे हे आपणाला माहितच आहे. नासाच्या या संकेतस्थळावर (http://www.nasa.gov/multimedia/nasatv) चीन मधून दिसणारे ग्रहण थेट दाखवत आहेत. या स्थळाची माहिती मला आताच समजली. नासाचे हे स्थळ जागातल्या अश्या काही घडामोडी नेहमीच थेट दाखवते असे दिसते आहे. म्हणजे पुढील वेळेस सुद्धा या स्थळाकडे लक्ष ठेवल्यास काही चांगले बघायला, ऐकायला मिळेल. या स्थळावर अजून काही स्वारस्यपूर्ण सापडल्यास कृपया प्रतिसादात लिहावे. अवांतर : या सारख्या तत्कालिन महत्वाच्या सूचना, सुचवण्या करण्यासाठीच खरेतर खरडफळा आहे असे वाटते.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 2926

ब्रेडची भजी

Published on 01/08/2008 - 16:28 प्रकाशित मुखपृष्ठ
ब्रेडचे स्लाईस त्रिकोणी, डाळिचे पीथ, थोडी तांदुळाची पिटी, तिखट, चवीप्रमाणे मीट, जिरे पावडर, हिंग, हळ्द ,ओवा आणि वाट्ल्यास थोडा इनो कुरकुरित होयला. किंवा गरम तेल थोडेसे अगदि.., पाणी डाळीच्या पिटात वरि ल सर्व घालुन कालवा.. खुप पातळ नको ..ब्रेडचे स्लाईस त्यात बुडवुन खमंग तळा.. आणी मस्त खिडकितुन पाऊस बघत सॉस बरोबर हापसा...

याद्या 5150

कोकोच्या वड्या

Published on 01/08/2008 - 15:09 प्रकाशित मुखपृष्ठ
साहित्य- १०० ग्राम मिल्क पावडर, १/२ वाटी कोको पावडर, १/२ वाटी लोणी, सव्वा वाटी साखर, बदाम तुकडे (ऐच्छिक) कृती - मिल्क पावडर+कोकोपावडर एकत्र करून चाळून घेणे‌. साखरेचा पक्का गोळीबंद पाक करणे. लोणी पाकात घालणे. गॅस मंद करून हलवणे. आता गॅस बंद करून भांडे खाली घेऊन त्यात कोको पावडर+मिल्क पावडर घालणे व गुठळी होऊ न देता ढवळणे.हवे असल्यास बदामाचे तुकडे घालणे.एका ताटाला तूप लावून घेणे.मिश्रण घट्ट झाल्यावर वड्या थापणे.

याद्या 11432

पकाऊ जोक्स ... (लोकग्रहास्तव नवा धागा)

Published on 01/08/2008 - 15:04 प्रकाशित मुखपृष्ठ
नमस्कार लोक्स ... प्राजू तैंनी सुरू केलेला धागा अंमळ तुंबलाय आणि त्यामुळे विनोबा आपले डोक्यावरचे केस ऊपटून राहिलेत .. त्यांच्या साठी .. नविन धागा सुरू करत आहे होओओओओओओओओओ तर ज्याला कोणाला आपले पाचकळ , पुचाट , फालतू , भंगार, केस ऊपटायला लावणारे विनोद खरडायचे असतिल तर फळा मोकळा आहे ... हाही फळा तुंबेल अशी आशा करतो .. केस ऊपटायला लावणारा एक विनोद (खन्ना नाही .. मेहरा .... तोपण केस ऊपटायला लावत असे) माझ्या कडुन .... राजे शिकारीला चाललेत ..
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 35333

लो.टिळक पुण्यतिथी

Published on 01/08/2008 - 13:40 प्रकाशित मुखपृष्ठ
आज लोकमान्य टिळक पुण्यतिथी.त्यांचे पुण्यस्मरण करुन मि.पा.करांतर्फे प्रार्थना लहानपणी शिकलेल्या ह्या श्लोकाने करते. तव स्मरण संतत स्फुरणदायी आम्हा घडो त्वदीय गुणकीर्तनध्वनिसुरम्य कर्णी पडो , स्वदेशहितचिंतनाविण दुजी कथा नावडो तुझ्यासमही आमुची तनुही देशकार्यी पडो.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 8461

मी कशी आहे ते मलाच सांगता येत नाही...

Published on 01/08/2008 - 12:30 प्रकाशित मुखपृष्ठ
मी कशी आहे ते मलाच सांगता येत नाही... कधी मी वारयाची झुलूक असते तर कधी बेफाम वारा असते कधी मी पावसाची हलकी सर असते तर कधी समुद्रची लाट असते कधी मी डोलनारे कणिस असते तर कधी खम्बिर तरु असते कधी मी शांत नदी असते तर कधी भिरभिर्नारे फूलपाखरू असते मी तो सुर आहे जो मनाला दिलासा देतो, तर कधी हुरहुर लावतो बस आणि काय सांगू सगलच लिहिता येत नाही म्हनून म्हणते मी कशी आहे ते मलाच सांगता येत नाही...
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 3511