मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आहे आणि नाही असा!

स्वाती फडणीस · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
आहे आणि नाही असा! . संतत पडणारा पाऊस.. आहे आणि नाही असा! पाना पानावर ओलावा.. आहे आणि नाही असा! एकच थेंब खरा.. इथे तिथे विखुरलेला.. भुरभूर वारा; बोचरा, कापरा! थरथरती फांदी; झटकत पानांना..? टिप्प... एक थेंब; थेंबांना जोडणारा.. एक थेंब; थेंबांनी जोडलेला... आहे आणि नाही असा!!! =================== स्वाती फडणीस......... ०४-०८-२००८

वाचने 2340 वाचनखूण प्रतिक्रिया 5

अनिल हटेला Mon, 08/18/2008 - 12:52
एक थेंब; थेंबांना जोडणारा.. एक थेंब; थेंबांनी जोडलेला... आहे आणि नाही असा!!! छान !! येउ द्यात अजुन ..... आपलाच बैलोबा !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

राघव१ Tue, 08/19/2008 - 11:34
थरथरती फांदी; झटकत पानांना..? सुंदर कविता! खूप छान मुक्तक लिहिता आपण. शुभेच्छा! राघव