Skip to main content

बोआ काँस्ट्रिक्टर!

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 10/02/2009 07:37 या दिवशी प्रकाशित केले.
"ह्या मुलाला बुद्धीबळातले फारसे काही गम्य नाहीये. ह्याला पुढे ह्या खेळात काही भविष्य आहे असे मला वाटत नाही!" आपल्या बुद्धीबळ अकादामीमधे दाखल झालेल्या १२ वर्षाच्या मुलाबद्दल जगज्जेत्या मिखाईल बॉटविनिकने उद्गार काढले! नियतीची खेळी सुद्धा पहा कशी अगम्य असते, हाच मुलगा पुढे अतुलनील जगज्जेता झाला अनातोली कारपॉव आणि बॉटविनिकची भविष्यवाणी खोटी झाली! 'अनातोली' ह्या रशियन नावाचा अर्थ आहे 'सूर्योदय'! किती सार्थ ठरवले ना आपले नाव त्याने? १९५१ मधे पूर्वीच्या सोवियेत रशियामधल्या उराल प्रांतात जन्मलेल्या अनातोलीची बुद्धीबळाशी तोंडओळख झाली ती वयाच्या चौथ्या वर्षी.

मुगाची खीर (मद्रदेसीय पद्धत)

लेखक चित्रादेव यांनी मंगळवार, 10/02/2009 07:25 या दिवशी प्रकाशित केले.
पाव वाटी सालीशिवाय मूग डाळ पाण्यात २ तास भिजवलेली, एक वाटी आंबेमोहोर नाहीतर बासमती तांदूळ एक तास भिजवलेला, १ वाटी किसलेला गूळ , २ वाट्या दूध, २ चमचे किसलेले खोबरे आवडीनुसार, २ वाटी कढतं पाणी, चार चमचे देसी तूप, लवंग २ काड्या, एक मसाला वेलची, एखादं काडी दालचीनी, वेलची पूड, केसर, काजू, बेदाणे दूधात मूरवून. कृती: आधी मूगाचे आणि तांदूळाचे दोन्हींचे पाणी चांगले चाळणीत निथळून घ्यावे. पातेल्यात २ चमचे तूप घालून त्यात लवंग काड्या, थोडीसे केशर आणि मसाला वेलची घालून आता त्यात मूग आणि तांदूळ घालावे. आधी मस्त २ मिनीटे परतून झाले की त्यात कढतं पाणी घालावे(त्या आधी मसाला वेलची ,दालचीनी काढून टाकावी).

ईडीयट बॉक्स & बालिका बधु..

लेखक अज्ञात यांनी मंगळवार, 10/02/2009 05:29 या दिवशी प्रकाशित केले.
टिव्ही ला ईडीयट बॉक्स का म्हणतात? खरा तो नुस्ता बॉक्स आहे, आणि इडियट आपण समोर बसुन कुठलेही भंकस कार्यक्रम बघणारे. हिटलरने ब्रेन वॉश करण्यासाठी , एकच गोष्ट वारंवार सांगणे हेच साधन वापरले होते. टिव्ही मुळे पण नेमकं हेच होतं. बऱ्याच गोष्टी आपल्याला वारंवार दाखवल्या जातात आणि मग आपल्याला त्याच बरोबर आहे असं वाटायला लागतं. हल्ली एक कार्यक्रम सुरु झाला आहे बालिका बधु नावाचा कलर्स चॅनल वर.

(गंधांच्या उलाढाली)

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 09/02/2009 22:36 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा भूषण कटककर ह्यांची गजल 'गंधांच्या उलाढाली' जरा 'टाकून' बसलो तर बला कळवायला आली तिच्या पक्षातल्या आंबूस गंधांच्या उलाढाली! तिला जे पाहिजे नेले विदेशी ते तिने सारे मला बसवून 'देशीशी' तिला साली मजा आली! इथे येतात ते करण्यास गझला आणि कविताही चला मारून फाट्यावर निघावे खालच्याखाली! मिळावे रातच्याला हरितकी अन ऊन पाणीही तसा मी उगवता वदतो, चला झाली, चला झाली! गमन करण्या निघालो मी, हिच्यापाशी कसा आलो? बरे नाही मिळाले पद्य की मी वाकडा चाली! पुरेसे मोडके केव्हाच झाले गीत हे बाळा करावी वाटता, गझलेस 'रंग्या' मोडता घाली! चतुरंग

सिनेमा-पिंजरा

लेखक मी असाकसा वेगळा वेगळा यांनी सोमवार, 09/02/2009 20:19 या दिवशी प्रकाशित केले.
कुणी पिंजरा हा सिनेमा हिंदीमध्ये पाहिला आहे का? त्याच्या हिंदी आणि मराठी काय फरक होता? हिंदी आणि मराठी यापैकि उत्तम कोणता? मराठी http://www.imdb.com/title/tt0316406/ हिंदी http://www.imdb.com/title/tt0316407/

पॅपिलॉन - काही अनुत्तरीत प्रश्न

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 09/02/2009 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
पॅपिलॉन - हे हेनरी शॅरीयर (Henri Charrière नोव्हें. १६, १९०६ ते जुलै २९, १९७३) याचे टोपण नाव. पॅपिलॉन हे त्याने लिहीलेली आत्मकथा आहे. तो फ्रान्स मध्ये गुन्हेगारांचा 'डॉन' होता. वयाच्या २५ व्या वर्षी त्याला न केलेल्या खुनाबद्द्ल जन्मठेपेची शिक्षेसाठी त्याला फ्रेंन्च न्यू गियाना ला हलवीण्यात आले. त्याला आपल्या प्रेमळ बायको आणि वडीलांना सोडावे लागले. तो भक्कम शरीर असलेला आणि प्रबळ ईचछाशक्ती असणारा होता. न्यू गियाना ला त्याने सुटकेसाठी पळुन जाण्याचा प्रयत्न केले. काही दिवसांनी तो पकडला गेला. या सुटकेसाठी तो अनेक मैल समुद्र प्रवास केला.

एक शंका

लेखक माझी दुनिया यांनी सोमवार, 09/02/2009 16:37 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस चे भाव कमी केले. वाहतूकदारांनी देशव्यापी संप करून सरकारला हे करायला भाग पाडले. पेट्रोल , गॅस चे भाव कमी झाल्याकारणाने रिक्षा आणि टॅक्सीचे भाडे कमी केल्याची बातमीही वर्तमानपत्रात अलिकडेच वाचली. पण हे मुंबईच्या हद्दीबाहेर. मुंबईतल्या जनतेचे काय ? एरवी पेट्रोल-डिझेल महागले सांगून सगळ्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव तातडीने वाढवणार्^यांनी पेट्रोल-डिझेल सवस्त झाल्याकडे सोयीस्कर डोळेझाक का केली ?

कार्तिकीला आक्षेप का?

लेखक अन्वय यांनी सोमवार, 09/02/2009 14:32 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरील चर्चेत बहुतांशी सदस्यांना, कार्तिकी गायकवाड महाविजेती होणारच नाही. प्रथमेश किंवा आर्या या दोघांपैकी कुणीतरी एक होईल, असे वाटत होते. परंतु ऐनवेळी वेगळाच निकाल लागल्याने या सगळ्यांच्याच टोप्या उडाल्या. त्यामुळे यांचा तीळपापड होणे स्वाभाविक आहे. प्रत्येकाने आपापल्या प्रज्ञे(?)नुसार विचार करूनच मते नोंदविली आहेत. यातील बहुतेकांचा संगीताशी संबंध केवळ शाब्दिक असावा. तिचा आवाज, त्यातील लवचिकता, संगीतातील समज, स्वरफेक, स्वराला घट्ट पकडून ठेवण्याची हातोटी, याचा कुणीही विचार केलेला दिसत नाही. प्रथमेश आणि आर्या दोघेही समजदार आहेत.