सुक्या बोंबलाच्या चटणीचे सुके
साहित्य :
५-६ सुके बोंबिल
४-५ सुक्या मिरच्या किंवा १ ते १/२ चमचा मिरची पावडर
१ मोठा कांदा
५-६ लसुण पाकळ्या
हिंग पाव चमचा
हळद १/२ चमचा
लिंबा एवढी चिंच
कोथिंबिर चिरुन
चवि पुरते मिठ
२ चमचे तेल
कृती :
चटणी :
पहिला सुक्या बोंबलाचे १/२ इंचाइतके तुकडे करुन ते तव्यावर भाजुन घ्यावेत. नंतर त्याच तव्यात सुक्या मिरच्या थोड्या गरम करुन घ्याव्यात. बोंबिल आणि मिरच्या थंड झाल्या की त्यात लसुण टाकुन ते एकत्र मिस्कर मध्ये जरा जाडसरच भरडावे. हीच जर चटणी खायची असेल तर ह्यात मिठ टाकावे.
सुके :
कढईत तेल टाकुन त्यावर कांदा परतवावा. कांदा शिजला की त्यात हिंग हळद घालुन त्यावर वरील बोंबलाची भरड घालायची.
मिसळपाव
