Skip to main content

इथे सुद्धा मराठी द्वेष

लेखक योगी९०० यांनी रविवार, 30/11/2008 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
हि बातमी वाचा.. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3774786.cms आज दहशतवादा विरुद्ध एकत्र येण्याची गरज असताना आपले चतूर(?) राजकारणी आणि मिडिया "राज" कारण करत आहेत. अर्थात जखमी लोकांना मदत करायला मनसे आणि शिवसेनाच पुढे होती हि गोष्ट विसरलीच गेली आहे. हा एस एम एस वाचा.. दहशतवादी हल्ला होत असताना राज ठाकरे व त्यांची शूर सेना कुठे होती?... भूमिपुत्रांना, मनसेच्या गुंडांना बरोबर घेऊन जा आणि आमची मुंबई वाचवा... आर्मी किंवा कमांडो मराठी नव्हते, मग त्यांनी मुंबईसाठी का प्राण गमावले? दहशतवाद्यांशी मुकाबला करण्यासाठी एनएसजीचे कमांडो दिल्लीहून आले म्हणूनच मनसेचे नेते रात्रभर शांत झोपू शकले. कमांडो उत्तर आणि दक्षिण भारतीय होते, मुंबईकरांनो जागे व्हा' हे घ्या... म्हणजे मनसे कडुन गोळीबार करायची अपेक्षा...आणि समजा आम्ही मराठी लोकांनी दहशतवाद्यांशी जर त्यांच्याच भाषेत मुकाबला केला तर हेच लोक आम्हाला मानवधिकाराच्या नावाखाली अडकवतील.. आमच्या सत्ताधारी लोकांना अश्या कमांडो सेनेची गरज आत्ता भासते आहे..आधी अशी जर सेना असती तर आम्हाला दिल्लीहुन काय..कोठुनच सेना मागवावी लागली नसती...बोलणार तरी कोणाला..आपलेच दात आणि आपलेच ओठ.. शेवटी त्या शिवराज पाटलांनी दिलाच राजिनामा..पण येथेही राजकारण दिसत आहे. खादाडमाऊ

वाचने 2326
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

या मराठीद्वेषाला आपण किती महत्त्व द्यायचं हे ज्याचं त्यानी ठरवायचं नाही का? माझ्या मते असल्या लोकांना दुर्लक्ष करुन मारणंच उत्तम.

मला सुध्दा असाच एक एसएमएस काल आला होता,,पाठवणार्‍याला नादान समजुन सरळ डिलीट करुन टाकला. मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर

डिलिट करण्यापेक्षा रिपोर्ट करा ना. कलीग कडून आला असेल तर टॉप बॉसेस कडे. क्लासमेटकडून आला असेल तर प्रिन्सिपॉलकडे. इतरांकडून आला असेल तर सरळ पोलिस स्टेशनमधे. त्याशिवाय हे थांबणार नाही. खरंच. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

अज्जुका यांचे म्हणणे बरोबर आहे.. मला हि एकदा अशी मेल आली होती (फार पुर्वी..) उगाचच मराठीवर गरळ ओकली होती.. मी ती मेल फक्त वरच्या लोकांना पाठवली ...आणि ज्याने मला पाठवली त्याला चांगलाच धडा शिकवला.. खादाडमाऊ