Skip to main content

लोकसभा निवडणुका: २००९. पश्चिम भारतातील परिस्थितीविषयी माझा अंदाज

लेखक क्लिंटन यांनी मंगळवार, 03/03/2009 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, माझ्या निवडणुक अंदाजाच्या पुढील भागात आता वळू या पश्चिम भारताकडे. (डिस्क्लेमरः हे अंदाज राजकिय परिस्थितीचे थोडेफार निरिक्षण करून मी बांधलेले अंदाज आहेत. ते किती बरोबर किंवा चुकीचे आहेत यासाठी १६ मे पर्यंत थांबावे लागेल) १) गुजरात: (एकूण जागा: २६) गुजरातमध्ये मार्च १९९८ पासून भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. ऑक्टोबर २००१ पर्यंत केशुभाई पटेल मुख्यमंत्री होते. त्यांच्या काळात भाजपाची नाव बुडती झाल्यावर पक्षाने संघप्रचारक नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्री म्हणून पाठवले.

रंग मेन्दीचा

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 03/03/2009 21:41 या दिवशी प्रकाशित केले.
रंग मेन्दीचा रंग मेन्दीचा हातावरती अजून खुलतो कधी कधी शारदरात्री तोल मनाचा अजून ढळतो कधी कधी हिरमुसलेली रातराणी ही कधी अचानक मोहरते निशिगंधाचा धुंद ताटवा अजून फुलतो कधी कधी खिन्न मनाच्या मैफलीत या आर्त विराणी गाताना आनंदाचा सूर अचानक अजून जुळतो कधी कधी वठलेल्या निष्पर्ण मनाच्या थरथरत्या फांदीवरती आशेचा हलका हिंदोळा अजून झुलतो कधी कधी कधी अचानक हसता हसता डोळे भरती अन झरती फुले वेचता चुकार काटा अजून सलतो कधी कधी तृप्त मनाच्या नभी अचानक दाटून येई मळभ कसे? अवचित हळ्वा भास तुझा का अजून छळतो कधी कधी? क्रान्ति

जय गणेश जय गणेश जय गणेश देवा!!

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 03/03/2009 21:16 या दिवशी प्रकाशित केले.
परवा संध्याकाळपासून इथे बर्फवृष्टी सुरु होती काल संध्याकाळी संपली! मिसळपावावरही अशीच धमाल हास्यवृष्टी घडवून आणण्यात कमालीचा उ(हु)च्च सहभाग असलेल्या सगळ्या बिनीच्या कलावंतांना ही आरती समर्पित!

<<गुत्ता>>

लेखक ब्रिटिश यांनी मंगळवार, 03/03/2009 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
ह्ये आमच पन बॅकग्रांवड: सगला जलम खारपाड्यान राऊन आमच्या सरवांच्ये गूडग्यावर जरा जादाच परनाम जाला. घरसूदा येवड यकट क सगल्यान जवलचा शेट्टी आन्नाचे गुत्याव सूदा ४५ मीन्ट चालाला लागाच. सनक http://www.misalpav.com/node/6396 आंदारलेल्या गूत्याजवलच चीप जीपड न बाजुचे गटारान बेवड्यांच वकनं वॉक वॉक आतड जालनारी दारू पन ती न चडनं सकाली सा वाजताच घरापाटी तरास देनारा आजासचा आवाज खॉक खॉक खॉक दुपारच्या येलेत तारेतच उटणं न अन भुकेल्या पोटी गावटी कुत्र्यांच भुकनं भॉक भॉक भॉक भॉक भॉक
Taxonomy upgrade extras

<ते>

लेखक ब्रिटिश टिंग्या यांनी मंगळवार, 03/03/2009 19:51 या दिवशी प्रकाशित केले.
टिंग डिंग, टिंग्डिंग टिंग डिंग, टिंग्डिंग टिंग डिंग, टिंग्डिंग डिंग डिंग डिंग....... संपला एकदाचा कॉल. आमच्या टीममध्ये दररोज ३:३०ला स्टँडअप कॉल असतो. चहा-बिडी झाल्यानंतर नेहमीप्रमाणे आम्ही सगळेजण म्हणजे मी, डीजे, अमित जोशी, सीपी आणि प्रभाकर सौमिनारायणन (ज्यांची नावे व्यवस्थीत लिहली आहेत ते सगळेजण कॉल चालु असताना क्लायंटकडुन अन् कॉल संपल्यावर पीएमकडुन मजबुत शिव्या खातात) आणि इतर फ्रेशर पब्लिक (जी आमच्या ग्रुप मधे येण्यास तयार , पण आम्ही न समावीष्ट केलेली.) असा सगळा ताफा आमच्या कँटिनच्या टेबलावर गप्पा मारत बसलो होतो.

बालजगत

लेखक अनिल सोनुने यांनी मंगळवार, 03/03/2009 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मी अनिल प्राथमिक शिक्षणासाठी मराठी माध्यमाच्या मुलांसाठी मी संकेतस्थळ सुरु केले आहे. आपल्या सर्वांच्या प्रतिसादामुळे नविन स्वरुपात बालजगत सुरु केले आहे.

<तो>

लेखक विनायक प्रभू यांनी मंगळवार, 03/03/2009 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
टन टना टन टना टन टना टन टना टन टना टन टना टन टन्ना टन्न टन्न्न टन्न्ना टन............ (आमच्या ऑफीस मधील बेल अशीच वाजते त्याला मी काय करु) असो. आमच्या ऑफीसला १.४० ला मधली सुट्टी होते. मी,प्रो. फमुक, प्रो. फामुक, प्रो. फागे, प्रो. फोंडे (जे इंग्रजी आणि गणिताच्या तासाला मजबुत मार देतात) असा सगळा ताफा ऑफीसच्या केबीन कडे निघाला होता...........आणि विषय होत 'तो' सकाळ पासुन झालेल्या ४ वेगवेगळ्या तासांनी आलेला कंटाळा घालवण्यासाठी एकच इलाज होता.

(मूल)

लेखक लिखाळ यांनी मंगळवार, 03/03/2009 18:35 या दिवशी प्रकाशित केले.
नदीवरल्या पुलाखालचे 'मुके' उसासे अन यौवनाच्या पखाली वाहणारे मुक्त कण्हसूर उह आह गजबजलेल्या दवाखान्यातली बेभान लगबग अन फत्तरासारख्या काळजातले गोठलेले काहूर होणार मूल होणार मूल असतोच दडलेला काहिंच्या मनात बाजेवर उफाळणारा गुलाबी प्रणयपूर भरपूर भरपूर --लिखाळ. (प्रेरणा-शरदिनी यांची कविता पूल )
Taxonomy upgrade extras

<पब>

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी मंगळवार, 03/03/2009 17:43 या दिवशी प्रकाशित केले.
पार्श्वभूमी: तीन महिन्यातच इंग्लंडमधल्या एका निर्जन खेड्यात राहून आमच्या सगळ्यांच्या डोक्यावर अंंमळ जास्तच परिणाम झाला. घरसुद्धा एवढं एकाकी की सगळ्यात जवळचा पबसुद्धा ४० मिनीटं चालत गेल्यावर लागायचा. प्रेरणा हलत्या रस्त्यावरची शांत ट्रेन आणि रात्रीच्या अंधारात काळोख्या रस्त्यांवर मित्रांचं ओरडणं क्वॉक क्वॉक हाडं गोठवणारी थंडी पण ती न टोचणं सकाळी सहा वाजता घरामागे होणारा त्रास देणारा बदकांचा आवाज क्वॉक क्वॉक क्वॉक दुपारच्या वेळेत तारेतच उठणं अन अन भुकेल्या पोटी अजय-अतुलचं गाणं ऐकणं क्वॉक क्वॉक क्वॉक क्वॉक
Taxonomy upgrade extras