ती पहाट
ती देखणी पहाट
हासुनी हळूच गाली
फुलवीत पाकळ्यांना
वार्यासवे निघाली
दंवबिंदूचे तुषार
उधळीत आसमंती
थरकून पैंजणाना
जणू चालते रति ती
रक्तिम ओठ हसरे
दिसताच पाखरांना
घुमवीत शीळ निघती
नादावूनी स्वरांना
लयदार चाल बघुनी
तिजला फुले म्हणाली
घेऊनी गंध वारा
कोठे गडे निघाली ?
लाजूनी ती पहाट
त्यांना हळूच सांगे
दिवसाशी घेत असते
जुळवून प्रेम धागे
Taxonomy upgrade extras
मिसळपाव