Skip to main content

होळी स्पेशल - थंडाई

लेखक मिंटी यांनी शुक्रवार, 06/03/2009 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
होळी आली की आपोआप डोळ्यासमोर येतं ते म्हणजे पुरणपोळी, रंग, मौजमजा आणि थंडाई...... :) तसं बघायला गेलं तर थंडाई राजस्थानातला अतिशय लोकप्रिय पेयपदार्थ. महाशिवरात्रीला याचा महादेवाला नैवेद्य दाखवला जातो. उत्तर भारतात थंडाईचं खास महत्व असतं ते होळीच्या दिवशी.

चिकन बनवण्यासाठी सगळ्यात चांगला मसाला कोणता?

लेखक सालोमालो यांनी शुक्रवार, 06/03/2009 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
दोस्त हो, मी एक एन्ट्री लेवल कुक आहे. परवा मी चिकन पहील्यांदा बनवले होते. छान झालं होतं. पण काहीतरी मिसिंग होत. तो अरोमा, तो रंग आणि मुळात ती चव जी यायला पाहीजे होती. काहीच माहित नव्हतं म्हणून मी एवरेस्ट चा मीट मसाला वापरला होता. ठीक होता. पण अजून चांगला मसाला नक्कीच अस्तित्वात असेल. जरा मदत कराल का? सालो

कुणी मत देणार का मत ?

लेखक अमोल केळकर यांनी शुक्रवार, 06/03/2009 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
अरे याला कुणी मत देणार का मत ? ह्या तुमच्या लोकनायकाला दिल्लीत राहून सेवा करणार्‍या ह्या गरिबांच्या कैवार्‍याला कुणी मत देणार का मत ? खूप पक्ष सोडले खूप पैसे लाटले खूप काहीच्या काही केलं आणि सत्तेतल्या राक्षसाला सारखं भ्रष्टाचाराच व्यसन लागलं. बिच्चार्‍या ह्या राक्षसाला कुणी मत देणार का मत ? खातं गेलं, घर गेलं, रुबाब गेला,गाडी गेली आता मतदारसंघही बदलतोय पाच वर्षात न दिसलेल्या या भिकार्‍याला कुणी मत देणार का मत ? निष्ठेला टोपी घातली सुखी माणसाची वाट लावली मंदीतही उधारीच चालली कामांची तर वाट लावली स्वप्नातही खुर्ची पाहणार्‍या ह्या सत्तापिपासुला कुणी मत
Taxonomy upgrade extras

माझी खाद्ययात्रा..

लेखक भाग्यश्री यांनी शुक्रवार, 06/03/2009 01:04 या दिवशी प्रकाशित केले.
आपण देशाबाहेर, आपल्या गावाबाहेर पडलो की नेहेमीच तिथल्या खादाडीची आठवण काढत असतो! मलाही इथे राहून सतत वैशाली, श्रेयस, अभिषेक,गार्डन कोर्ट..... जाऊदे सगळी लिस्ट नाही लिहीत इथे.. पण या सगळ्यांची सतत आठवण होत असते.. पण इथेही काही खायला मिळत नाही असं थोडीच आहे? इथेही अशी अनेक ठीकाणं आहेत, काही स्पेशल डिशेस आहेत ज्या मला खूप आवडतात.. त्यांची ही कथा! (अमेरिकेत नसणार्‍यांना हा लेख असंबद्ध वाटेल, कारण सगळे इथले लोकल रेफरन्सेस आहेत या लेखात.. मात्र पक्क्या खवैय्यला या गोष्टिने काही फरक पडणार नाही असे वाटते.. आणि इथे नक्कीच खवैय्ये आहेत असं माझं मत असल्याने हा लंबाचौडा लेख तुमच्या भेटीला!! ...

बीस्ट ऑफ बाकू!

लेखक चतुरंग यांनी गुरुवार, 05/03/2009 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
४ नोवेंबर २०००. पश्चिम लंडनमधल्या हॅमरस्मिथ उपनगरातला रिवरसाईड टेलीविजन स्टुडियो. आत बसलेले काही भाग्यवान लोक श्वास रोखून पडद्याकडे बघत होते. आजच्याच डावात सारं काही संपणार की आणखी शेवटचा एक डाव खेळाला जाणार ह्याबद्दल उत्सुकता शिगेला पोचली होती. पंधराव्या डावात काळी मोहोरी घेऊन खेळणार्‍या क्रामनिकनं अडतिसाव्या चालीला आपला हत्ती पाचव्या पट्टीत नेला.

जग रहाटी

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी गुरुवार, 05/03/2009 22:33 या दिवशी प्रकाशित केले.
आईच्या गर्भातुन बाहेर येतांना मला खूप दु:ख झाले, शाश्वत वात्सल्याचच ठिकाण ते... कस सोडवणार......? मी खूप रडलो, अगदी टाहो फोडला.. पण व्यर्थ....! आश्चर्य म्हणजे.. मी इतका रडत होतो, पण माझी आई मात्र हसत होती..! आईच काय , सभोवतालची सारीच माणसे हसत होती..
Taxonomy upgrade extras

एखादा दिवस

लेखक क्रान्ति यांनी गुरुवार, 05/03/2009 21:15 या दिवशी प्रकाशित केले.
(|: एखादा दिवस एखादा दिवस असा रेंगाळतो, एकेक क्षण युगासारखा नुसते नगारे वाजवणा-या कोरड्या पोकळ ढगासारखा सकाळ सरता सरत नाही; विस्कटलेले किरण सांडून सुस्तावलेला सूर्यही दिसतो उनाड, हट्टी मुलासारखा कंटाळवाणी दुपार पसरते, कातावलेली नागीण जशी दिवस बिचारा वाट चुकलेल्या, भांबावलेल्या पिलासारखा संध्याकाळचा तोच पसारा; धूसर, धुरकट रंग उधळून भरकटलेला वारा फिरतो ओढाळ, नाठाळ गुरासारखा रात्रही तशीच मरगळलेली; पेंगुळलेल्या मंद चांदण्या धुक्यात गुरफटलेला चंद्र कोमेजलेल्या फुलासारखा पुन्हा उद्याची वाट पहाणारा एकेक क्षण युगासारखा परीकथेतील राजकन्येच्या स्वप्नामधल्या जगासारखा क्रान्ति
Taxonomy upgrade extras

मिश्र डाळींची भजी

लेखक शाल्मली यांनी गुरुवार, 05/03/2009 19:46 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आमच्या घरी कोणाला जेवायला बोलावले असेल, कोणाचे केळवण, सत्यनारायण वगैरे अश्या काही पूजा असतील तर जेवणात पाहिजेतच अशी ही मिश्र डाळींची भजी.
साहित्य :- १ वाटी उडीद डाळ १ वाटी मुगाची डाळ १ वाटी हरभर्‍याची डाळ ४-५ हिरव्या मिरच्या १ इंच आलं १ लहान चमचा धनेपूड १ लहान चमचा जिरेपूड चवीनुसार मीठ तळणीसाठी तेल कृती:- प्रथम उडीद डाळ, मुगाची डाळ आणि हरभर्‍याची डाळ एक

बरी नव्हे ही थट्टा!

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी गुरुवार, 05/03/2009 19:38 या दिवशी प्रकाशित केले.
समर्थानी म्हटल आहे 'टवाळा आवडे विनोद' म्हणुन काही लगेच समर्थांना विनोदाचे वावडे होतं असे म्हणता येणार नाही. थट्टा मस्करी, टिंगल, विनोद विडंबन वात्रटिका प्रहसन, खिल्ली, चेष्टा गंम्मत नसती तर जगण्यातला (जीवन शब्द नको रे बाबा ) आनंद घेता आला नसता. विनोदाला असलेली कारुण्याची झालर, वेदनेला असलेले विनोदाचे कवच, विनोदाच्या अंतरंगात खदखदणारे अपमानाचे निखारे, सुडापोटी जन्मणारे विनोद, असहाय्ये पोटी जन्मणारे विनोद, कोल्ह्याला द्राक्षे आंबट या मानसिकतेतुन जन्मणार प्रहसन, आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी इतरांना कमी लेखण्याची केलेली चेष्टा, इतरांना भानावर आणण्यासाठी उडवलेली खिल्ली.