Skip to main content

सकाळ वृत्तपत्राचे अनेक आभार..

लेखक विसोबा खेचर यांनी शनिवार, 18/07/2009 07:59 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मायबाप मिपाकरहो, आजच्या सकाळ वृत्तपत्रातील कवडसा या सदरात मेधा कुलकर्णी यांचा आपल्या मिपाबद्दल विस्तृत माहिती देणारा लेख आला आहे. सकाळसारख्या आघाडीच्या वृत्तपत्राने मिपाची आवर्जून दखल घेतली, त्याकरता पत्रकार मेधा कुलकर्णींचे आणि सकाळ वृत्तपत्राचे मी व्यक्तिश: तसेच समस्त मिपा परिवारातर्फे आभार मानतो.. तात्या.

दोन वाटा

लेखक प्रशांत उदय मनोहर यांनी शनिवार, 18/07/2009 00:05 या दिवशी प्रकाशित केले.
वळणदार ही रम्य वाट, घनदाट तरू चहुकडे; दुभंगे जाता इथुनी पुढे वाट एक त्यांतली ही, हिच्या दोबाजूंना लांब; पसरले पहा दिव्याचे खांब दुसर्‍या वाटेवरी न पथिक न गाड्याही धावल्या; परि तिथे काटे आणिक कळ्या दोन्ही वाटा अखेर मिळती एका रस्त्याला; जाई जो माझ्या गावाला दुवा दिव्यांचा, ह्या वाटेवर पांथिक बहु चालले; धरावी ही हे मी ठरविले प्रवास इथला सुलभ, फक्त चालणे अखंडितपणे; आणि निजधामाला पोचणे धरली त्याने वाट, जी न वहिवाट, चालला पुढे; फुलांचे जेथे पडले सडे पाचोळा अन् काटेही पण वाटेवर त्याच्या; आणि ना दिशा ओळखीच्या गावी मी पोचलो, जणू मिळवले सर्व सर्व; मला जाहला असा गर्व स्वतःभोवती फिरत राहिलो, विसरलो जगाल

हे पुस्तक कोणाकडे मिळेल का??

लेखक नानबा यांनी शुक्रवार, 17/07/2009 23:03 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. फार फार वर्षांपूर्वी जी. ए. कुलकर्णींनी लिहीलेलं "बखर बिम्मची" हे पुस्तक माझ्याकडे होतं. एकदा कुणीतरी सहज म्हणून वाचायला नेलं ते परत आणून दिलंच नाही. अतिशय अप्रतिम आणि मनःस्पर्शी पुस्तक आहे. आणि दुर्दैवाने सध्या कोणत्याही विक्रेत्याकडे ते उपलब्ध नाही. कोणाकडे ते आहे का? मी छायांकित करून घ्यायला तयार आहे. अथवा मला pratham.phadnis@gmail.com वर आपली माहिती पुरवल्यास मी संपर्क करेन.

दुर्गा भागवतांचे 'वॉल्डनकाठी विचारविहार' ह्या पुस्तकाविषयी चौकशी

लेखक राकेश वेंदे यांनी शुक्रवार, 17/07/2009 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. मला दुर्गा भागवतांचे 'वॉल्डनकाठी विचारविहार' हे पुस्तक वाचायचे आहे. हे पुस्तक कुठल्या ग्रंथालयात किंवा दुकानात मिळेल? ह्या विषयी माहिती हवी आहे. धन्यवाद.

वाहन पार्श्चभाग लिखाण अर्थात बंपर स्टिकर

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 17/07/2009 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
आता बहूतेक जण म्हणतील की यावर बरेच धागे लिहून झाले, हा फूटकळ धागा आहे, मी आपणाला ओळखत नाही त्यामुळे (निगेटिव्ह का होईना पण) प्रतिक्रीया देणार नाही वैग्रे वैग्रे. तरी पण वाचा आणि आनंद घ्या. असो. रत्याने जातांना वाहनांच्या पार्श्चभागी लिखाण अर्थात बंपर (तसेच) नेम प्लेट, ट्रकचे फाळके, मागील काच, मडगार्ड रबर वर अनेक (महाभागांनी) अनेक तर्‍हेचे लिखाण केलेले असते. अजाणतेपणी आपण त्या कडे बघतो किंवा बघत नाही. काही काही लिखाण मनास भिडते तर काही वेळा मनोरंजन होते. रहदारीच्या वैतागात आपल्याला ते लिखाण नकळत सुखावून जाते. मी खाली काही तसले बघीतलेले लिखाण टाकलेले आहे.

'निवृत्ती'

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 17/07/2009 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्याच्या वळणावरचा.. अन्तिम टप्पा सार्थकतेचा! पुर्णतेचा, परिपुर्णतेचा.. शुचितेचा, सुख-प्राप्तीचा.. उन्नतीचा...निवृत्तीचा ! आयुष्याच्या वाटेवरची... सर्वोच्च पावती तृप्ततेची! सुखाची, समाधानाची.. गोडी आगळी कर्तव्यपुर्तीची.. जाणीव सुखाची...निवृत्तीची! मार्ग जिवनाचा, तृप्त मनाचा.. ऐहिकतेच्या विलोपनाचा! भौतिकाच्या निरोपाचा.. पारमार्थिक प्रारंभाचा.. वेध तो अद्वैताचा..अनंताचा! ज्ञानराज माऊली म्हणतसे.. मी वेडा 'सोपान' 'मुक्तीचा'.. हरीने कथिला मज.. मार्ग सुखाचा.. तो एकमेव ...निवृत्तिचा !! विशाल.

माझे आगामी पुस्तक!!

लेखक नाटक्या यांनी शुक्रवार, 17/07/2009 05:19 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, धाग्याचे शीर्षक बघून कदाचित तुम्ही विचार केला असेल की नाटक्याने नेहमीचा 'साकीया..." अस नेहमीचा विषय न निवडता असा गंभीर विषय का निवडला? आणि जरी तो तसा असला तरी आत स्वत:च्या पुस्तकाबद्दल लिहीले असेल तर ते कॉकटेल संबधीचेच असावे. खरं तर मला त्या विषयावर पण पुस्तक लिहायची ऑफर आपल्याचा एका मिपाकरांनी दिली होती. तर ते असो.. मी सध्या एका इंग्रजी पुस्तकाचा मराठीत अनुवाद करायला घेतला आहे.