मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आपणच........!

उमेश__ · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
आपणच आपल्याला लिहलेली पत्रं वाचता वाचता ओले होणारे डोळे पुसून फडफडू द्यावित वा~यावर पानं.... थोडसं हसून आपणच आपल्याला सांगावी कधीतरी एखादी गोष्ट आपणच गावं आपल्यासाठी रिमझिमत्या स्वरांच एखादं गाणं....... आपणच जपावेत मनात; वा~यावर झुलणारे गवताचे तुरे एखादी धावणारी पायवाट, अन् जपावेत काही नसलेले भास्...... जिथं आपल्यासाठी फुलं उमलतील अशी जागा सगळ्यानाच सापडत नाही मनाच्या कडेनं लावलेल्या झाडांना आपणच द्यावेत थोडेसे श्वास........

वाचने 1730 वाचनखूण प्रतिक्रिया 5

प्राजु 03/04/2009 - 21:04
मनाच्या कडेनं लावलेल्या झाडांना आपणच द्यावेत थोडेसे श्वास........ ही ओळ जास्ती आवडली. कल्पना छान आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

क्रान्ति 04/04/2009 - 17:34
सुरेख कविता. "जपावेत काही नसलेले भास" अप्रतिम! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

लवंगी 04/04/2009 - 22:49
विषय आवडला. मनाच्या कडेनं लावलेल्या झाडांना आपणच द्यावेत थोडेसे श्वास........ अतिशय सुरेख..

सुधीर कांदळकर 05/04/2009 - 16:09
मात्र माझ्यासाठीं मस्त फूल उमललें आहे. छान कविता. सुधीर कांदळकर.