Skip to main content

दोन दिवसांचा चांगला ट्रेक - वा़की -शेवत्या घाट - केळद - मढेघाट

लेखक दत्ता काळे यांनी बुधवार, 22/07/2009 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
दोस्तहो, हर्षद आनंदी ह्यांनी कलादालनमध्ये टाकलेले मढेघाटातले अप्रतिम फोटो बघून आणि त्या अनुषंगाने त्यांनी लिहिलेली माहिती आणि त्याला मिळालेले प्रतिसादातील प्रश्न वाचून मला मढेघाटाविषयी ल्याहावेसे वाटले, ते असे, एक म्हणजे शेवत्या घाट आणि मढे घाट हे दोन्हीही घाट वेगळे आहेत. केळदमधून को़कणात उतरायला तीन घाटवाटा आहेत. १. उपांड्याची नाळ, २. शेवत्या घाट आणि तिसरी ३. मढेघाट, पैकी मढेघाटाची वाट इतर दोन्ही घाटवाटांपेक्षा जास्त बरी आहे. उर्वरीत दोन वाटा त्यामानाने जरा अवघड आहेत. पण दोन्हीही घाटातला एक ऊत्तम ट्रेक होऊ शकतो.

पुणे - शिवथरघळ - पुणे

लेखक सातारकर यांनी बुधवार, 22/07/2009 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
रविवार रिकामाच होता म्हणून शिवथरघळीला जाउन यायच ठरवल. आमच्या रीतीप्रमाणे ऐनवेळेला लढाईच्या आधीच दोन मावळे गारद. शेवटी पाचाच्या तिथ तिघच निघालो आणि स्वर्गात जाउन आलो. पाउस फार नव्हता पण तरीही जे काही समोर आल त्यांन डोळ्याच पारण फेडल.

सुर्यग्रहण २००९ - ताजी छायाचित्रे

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 22/07/2009 06:45 या दिवशी प्रकाशित केले.
खग्रास (पुर्ण) सुर्यग्रहण फक्त ३.४० मिनीट चालले. यानंतर सुमार १५० वर्षांनंतरच खग्रास (पुर्ण) सुर्यग्रहण भारतात होणार आहे. (चु.भू.दे.घे.) डिस्के. खालील छाया. बघतांना गॉगल वैग्रे लावावा. डोळ्यांना ईजा झाल्यास धागालेखक जबाबदार नाही. :B छाया. १ सुर्यग्रहण सुरु होतांना छाया. २ छाया.

ये जो देस है तेरा.. स्वदेस है तेरा!

लेखक भाग्यश्री यांनी बुधवार, 22/07/2009 02:21 या दिवशी प्रकाशित केले.
"श्या.. हाईट झाली ही.. गेल्या काही दिवसात किती वेळा आले हे फिलिंग? असं काय होतंय.. ओह नो.. मला उचला इथून कोणीतरी ! चिडचिडचिडचिड होतीय........................." मी पाय आपटत होते अक्षरश:.. "अगं हो.. शांत हो जरा! काय होतंय़? कंटाळा आला का परत?? " इती नवरा "हो मग काय.. दुसरं काय होतं मला.. कंटाळा कंटाळा कंटाळा.. कंटाळ्याचाही कंटाळा आला या कोटीचा सुद्धा कंटाळा आलाय!! .. :(" "ह्म्म.." "ह्म्म काय!! कर काहीतरी या कंटाळ्याचे.. मी दमले आता.. रोज आपलं सोल्युशन शोधायचे आजचा कंटाळा कसा घालवू मी...." "असं काय करतेस.. मान्य आहे बोर होतं इथे कधी कधी.. आईबाबा,मित्र मैत्रिणी,आपण जिथे वाढलो ते शहर..

आणखी एक पुणेरी पाटी...

लेखक ओंकार देशमुख यांनी मंगळवार, 21/07/2009 22:37 या दिवशी प्रकाशित केले.
पुणेकरांच्या सूपिक डोक्यातून नेहमीच नवीन काहीतरी उगवत असतं... पुणेरी पाट्या म्हणजे तर बारमाही पीक... आता खालची पाटी बघून कोणी या मेस मधे जेवायला जाइल का असा प्रश्ण नक्कीच पडेल... पण ह्या पाटीवरून पुणेकर मंडळी नियमांची किती पक्की असतात हे लक्षात येतं !! गिहाईक गेलं तरी चालेल ,पण नियम हे पाळलेच गेले पाहीजेत....

कर्नाळा - जैत रे जैत

लेखक विमुक्त यांनी मंगळवार, 21/07/2009 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
गो.नी.दां. च्या दुर्ग भ्रमण गाथेत कर्नाळ्या बद्दल वाचल्या पासुन मला तीथं जायच होतं. नंतर जैत रे जैत बघीतल्या पासुन तर कधी एकदा लिंगोबाला (कर्नाळा) जातोय असं झालं होतं. अलीबाग हून पनवेल ला जाताना S.T. च्या खिडकीतून कर्नाळा बऱ्याचदा बघीतला होता, पण जाणं काही जमलं नव्हतं. एका weekend ला यशदीप आमच्या घरी आला होता. तेंव्हा आम्हां तिघांचा (मी, मझा भाऊ प्रसाद आणि यशदीप ) कर्नाळ्याला जायचा प्लान ठरला. पनवेल पर्यंत बस आणि मग पनवेल हून कर्नाळ्याला जायला टम-टम मधे बसलो. पनवेल हून पेणच्या दिशेने ५-६ km पुढे गेलो की रस्ता कर्नाळ्याच्या जंगलातूनच जातो आणि झाडीतून लिंगोबा डोकावताना दिसतो.

बोलली जाते मराठी, मान ते घर आपुले

लेखक धोंडोपंत यांनी मंगळवार, 21/07/2009 22:08 या दिवशी प्रकाशित केले.
माजले परके.... मराठी चेहरा उरला कुठे? भूमिपुत्रांना स्वदेशी आसरा उरला कुठे? भ्रष्ट नेत्यांच्यामुळे ही वाळवी आली घरी एकही शाबूत ऐसा कोपरा उरला कुठे? टॉवरांचे रान झाले चाळ माझी पाडली आपुलेपण सांगणारा उंबरा उरला कुठे? दारची जास्वंद गेली कार पार्किंगच्यामुळे परसदारी बहरणारा मोगरा उरला कुठे? बोलली जाते मराठी, मान ते घर आपुले मग 'अगस्ती' सांग तुजला, पिंजरा उरला कुठे? ---- धोंडोपंत

समर्पण

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 21/07/2009 21:15 या दिवशी प्रकाशित केले.
समर्पणाची आस उराशी, आतुर सरिता आली धावत ऐकशील का कधी सागरा अंतरिचा हा नाद अनाहत? लाटांचे हे तांडव आवर, या बेभान मनाला सावर व्यापुन राही कणाकणाला, तुझ्या भेटिची ओढ अनावर पर्वतरांगा, कडेकपारी, डोंगर, कुरणे, दरिखो-यांतुन उसळत आले आवर्तातुन, कधि बांधांच्या चाको-यातुन कधी सोशिली ग्रीष्म काहिली, कधि शरदाची कौमुदि शीतल स्वातीचे कधि झेलित मोती, बहर वसंताचा कधि चंचल एकरूप होईन तुझ्याशी, नको दुरावा, नकोच अंतर सामावुन घे अंतरात मज, वाहुन थकले मीहि निरंतर

(वाटेवर मी तुझ्या लावले--)

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 21/07/2009 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
वाटेवर मी तुझ्या लावले दोन फटके गालावरले ह्रदयातून मग लक्ष लागले फटके खाऊनी गाल सुजले? जोरात ठेवला हात तिथे मी तुझ्या चुकीला शिक्षा किती ? धोत्र्याची फूले द्यावी तू मला? हाणायला मग कसली भिती? लुब्रा मेला टोमणे मारतो समजतो मला खुळी शीळ घालीत प्रीत मागतो विसरतो की मी न भोळी ? मोका मिळता मग उचलली पादत्राणे दोन हलकी गंध देउनी क्रोधभराने वाजवूनच ठेवीली खाली तू मेल्या तरीही तसाच हलकट आणि बाईल वेडा छळीसी कितीकां तसाच वाटे हाणाव्या दोन फडाफडा. मैत्रीणी टपल्या असती किती त्रस्त होऊनी तुला मारण्या रे बावळ्या वेश कावळ्या पैजार शस्त्रे घेऊनी हाती
काव्यरस