Skip to main content

जे तनाला पाहिजे ते...

लेखक केशवसुमार यांनी शनिवार, 04/04/2009 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा अजब यांची रचना जे मनाला पाहिजे ते... जे तनाला पाहिजे ते गिळत नाही जे नको गिळण्यास पण ते टळत नाही... एवढा सदर्‍यात ह्या मी तंग बसतो; हाय मापाचा कुठेही मिळत नाही... देह हा इतका भयंकर, वाढला पण काय खातो 'अजब' मी ते कळत नाही... रोज प्यालो, मद्य आणिक स्लिम टी ही मेद माझे त्यांतही विरघळत नाही... चालणेही खूप असते गावभर पण वजन माझे हे कसे मग ढळत नाही...? मान ही फिरते कुठे ह्या "केशवा"ची वळत असतो हा तरी ही वळत नाही... स्वप्न, आशा, ध्येय माझे वजन घटणे मी उगाचच जीम मध्ये पळत नाही...
लेखनविषय:

वाचने 1832
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

वजनदार विडंबन गुरुजी चेतन

भारी! जबरदस्त! १०० नंबरी विडम्बन! >:D क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

चालणेही खूप असते गावभर पण वजन माझे हे कसे मग ढळत नाही...? हा हा हा ! ओळी मनातल्या टंकल्या आहेत. :) -दिलीप बिरुटे

धम्माल. सुधीर कांदळकर.

वा केशवशेठ, भारी विडंबन. एकदम झकास.

धमाल ,वजनी विडंबन! आवडले. स्वाती