Skip to main content

(गंड)

लेखक केशवसुमार यांनी शुक्रवार, 17/07/2009 00:42 या दिवशी प्रकाशित केले.
कार्यबाहुल्या मुळे गेले काही महिने जालावर फारसा वावर करता आला नाही.. आज थोडा निवांत वेळ मिळाला आणि आमच्या गुरुजींना केलेले खोडसाळ गंड काव्य आमच्या वाचनात आले . ते वाचून आम्हाला ही गंड झाला ..

मी कवी आहे, मला ही कंड आहे
फक्त वृत्ता चा मला हा गंड आहे

'र' पुढे 'ट' ठेवुनी मी रोज लिहितो
पाडला नाही कधी मी खंड आहे!

वाचले तर पाहिजे हे काव्य कोणी
दोनशे कडव्यात लिहिला खंड आहे

चांगल्या मिळती न आता जमीनी
ह्या मुळे धंदा विडंबन थंड आहे

मुक्तछंदालाच आम्ही काव्य म्हणतो

अलिप्त

लेखक क्रान्ति यांनी गुरुवार, 16/07/2009 23:09 या दिवशी प्रकाशित केले.
का अलिप्त जगणे माझे? मी प्रवाहात का नाही? परिचित वा आप्त कुणीही या जमावात का नाही ? दु:खाचे फक्त मुखवटे, अन् मोल दिलेले रडणे आर्तता, शोक, व्याकुळता या विलापात का नाही ? पातकी, पतित, पथभ्रष्ट, मूर्तिमंत पाप जरी मी, कोसळताना पहिल्यांदा तू दिला हात का नाही ? रुतणा-या कंटकवाटा, जखमी पायांनी फिरणे एकही सुगंधित थांबा या प्रवासात का नाही ? का उलटे पडती फासे ? का जिंकुनही मी हरते ? हा डाव रडीचा इथला संपून जात का नाही ?

फणसाचे सांदण

लेखक कपिल काळे यांनी गुरुवार, 16/07/2009 22:35 या दिवशी प्रकाशित केले.
जून जुलै महिन्यात घरी फणस पिकून दरवळू लागतात.बाहेरुन काटेरी पण आतून गोड, बरका गरा असा बचक्यात मावत नाही. तो अलगद ओठाशी धरायचा आणि आत ओढून घ्यायचा. शेजारीच ठेवलेल्या खोबरेल तेलाच्या वाटीत हाताला लागलेला चीक पुसत पुसत , एका मागोमाग एक किती गरे फस्त झाले त्याचा हिशेबच उरत नाही. गरे खाउन मंडळी कंटाळली की घरी सांदणांचा घाट घातला जातोच. तांदूळ भिजवून कोरडे केले जातात. जात्यावर त्याच्या कण्या निघतात. बरक्या गर्‍यांचा रस काढण्यासाठी बाल गोपाळ चाळण्या घेउन बसतात. बाहेर पावसाच्या सरी कोसळताना गरमागरम सांदणे खाण्याची मजा औरच !! कोकणात केली जाणारी ही पाककृती.तशी अनवट.

पारध झालेला तो पारधी - २

लेखक श्रावण मोडक यांनी गुरुवार, 16/07/2009 18:19 या दिवशी प्रकाशित केले.
सहजकाकांनी व्य. नि. मलाही केला होता. तो धागा खूप पुढं गेल्यानं हा नवा धागा काढतोय. मूळ धागा
---
सहजरावांचे म्हणणे - सक्तीने पुनर्वसन, दारुधंदे बंद करुन उपजीवीकेचे इतर प्रकल्प, लहान मुलांचे सक्तीचे शिक्षण, तरुणांचे संघटन, दीर्घकाल प्रबोधन, विविध योजना यांचा पाठपुरावा केल्याशिवाय त्यांचे गुन्हेगारी विश्व इतक्यात सुटेल असे वाटत नाही. पोलीस व पारधी समाजातील दोन्ही बाजुने पारध्यांना योग्य न्याय देण्याकरता जिल्हे/प्रांतवार संघटना करुन प्रयत्न.

कोल्हा, कावळा आणि करकोचा

लेखक सुबक ठेंगणी यांनी गुरुवार, 16/07/2009 12:18 या दिवशी प्रकाशित केले.
इसापाच्या गोष्टीत असतं तसं प्राण्यांचं एक आटपाट नगर होतं. तिथे अनेक प्रकारचे प्राणी अगदी गुण्यागोविंदाने रहात होते. प्रत्येक प्राण्याची आपली अशी वेगळी संस्कृती होती. “उतायचं नाही, मातायचं नाही आणि माणसांसारखं भांडायचं नाही” हे मुळी त्या नगराचं ब्रीदवाक्यच होतं. ह्या ब्रीदवाक्याला जागून होता होईल तेवढी सांस्कृतिक देवाणघेवाण करायची ह्यावर तिकडचे सगळेच नागरिक एकमत होते. ह्या नगरातल्या एका भागाचा हा क्रॉससेक्शन!
*****
ह्या वस्तीत तीन शेजारी रहात होते; कोल्हा, करकोचा आणि कावळा. करकोचा दिसायला दौलदार आणि सडपातळ शरीरयष्टीचा होता.

(प्रपोजल्)

लेखक चेतन यांनी गुरुवार, 16/07/2009 11:49 या दिवशी प्रकाशित केले.
बेसनलाडूची सुंदर कविता प्रपोजल् वाचुन आणी ब्रिटीश भाऊंचा सुख म्हंजे नक्की काय आसत वाचुन थोडीशी आत्मशांती करावीशी वाटली. अर्थात सगल मानन्यावर हाय की.... आणला कविकल्पनांचा घोळ तुझ्यासाठी, पण मुजोर्‍या पुस्तकी शब्दांचा थर मारलाय समिक्षकाने आधिच तुझ्या गळ्यात भोळ्या कवीच्या कल्पनांची घातलेय मंदासारखी पैरण तुझे तुच पायात पुस्तकात बघुन लिहीन म्हटलं, डोके खाजवुन सांगेन म्हटलं, सार्‍यांना गुदगुल्या करून जागवेन म्हटलं, तर शब्दांच्या नुसत्या फिरक्या घेत डोळे चिंब मिटून ते प्रतिसादांच्या मिठीत आणि माझे श

परबुभाई

लेखक विनायक प्रभू यांनी गुरुवार, 16/07/2009 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
काही युद्धे शस्त्र न वापरता शब्दाने जिंकता येतात. " मामाजी, या ऑफिसवर. 'माणसे' येउन पोचलीत. शेठ नंबर १ चा फोन आला. शेठ नंबर दोन ना फोन द्या. काही सुचना देउन मी शेठ्च्या ऑफिसवर पोचलो. अंगावर खास झब्बा आणि लेंगा घालुन मी ऑफिसवर पोचलो. मला बघताच दोन्ही शेठ उठुन उभे राहीले आणि मुख्य खुर्ची माझ्या साठी रिकामी केली. "आवो, प्रभुभाई", शेठ नंबर म्हणाले.(सुचने प्रमाणे) पोल्ट्री इंडस्ट्री मधे सर्वे सर्वा असलेल्या शेठ ना ही कृती करताना मरणोपरान्त वेदना झाल्या असतील ह्याची मला कल्पना होती. पण काय करणार प्रसंगच तसा होता. टेबलवर पुढे ३ माणसे होती. एक पांढरी पँट, पांढरा शर्ट, पांढरे बुट.

प्रपोजल्

लेखक बेसनलाडू यांनी गुरुवार, 16/07/2009 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
आणला इंद्रधनुचा गोफ तुझ्यासाठी, पण टपोर्‍या आषाढी थेंबांचा सर घातलाय पावसाने आधीच तुझ्या गळ्यात ओल्या मातीच्या ठिपक्यांचे घातलेस मेंदीसारखे पैंजण तुझे तूच पायात डोळ्यांत बघून विचारेन म्हटलं, ढग वाजवून सांगेन म्हटलं, वार्‍याने गुदगुल्या करून ऐकवेन म्हटलं, तर स्वत:भवतीच गिरक्या घेत डोळे चिंब मिटून तू पावसाच्या मिठीत आणि माझे शब्द, सूर सगळे चुरगळलेत त्याच्या झिम्मडसरीत या भिजल्या-थिजल्या कवितेचं प्रपोजल् व्हायची वाट बघत
काव्यरस