वाटेवर मी तुझ्या लावले
दोन फटके गालावरले
ह्रदयातून मग लक्ष लागले
फटके खाऊनी गाल सुजले?
जोरात ठेवला हात तिथे मी
तुझ्या चुकीला शिक्षा किती ?
धोत्र्याची फूले द्यावी तू मला?
हाणायला मग कसली भिती?
लुब्रा मेला टोमणे मारतो
समजतो मला खुळी
शीळ घालीत प्रीत मागतो
विसरतो की मी न भोळी ?
मोका मिळता मग उचलली
पादत्राणे दोन हलकी
गंध देउनी क्रोधभराने
वाजवूनच ठेवीली खाली
तू मेल्या तरीही तसाच
हलकट आणि बाईल वेडा
छळीसी कितीकां तसाच
वाटे हाणाव्या दोन फडाफडा.
मैत्रीणी टपल्या असती किती
त्रस्त होऊनी तुला मारण्या
रे बावळ्या वेश कावळ्या
पैजार शस्त्रे घेऊनी हाती
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2692
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
हम्म
नायक
In reply to हम्म by विनायक प्रभू
बरोबर तेच आहेत
In reply to नायक by नितिन थत्ते
उत्तर
+१
In reply to उत्तर by पुष्कराज
आवडले ... माझा पण एक प्रयत्न