समर्पणाची आस उराशी, आतुर सरिता आली धावत
ऐकशील का कधी सागरा अंतरिचा हा नाद अनाहत?
लाटांचे हे तांडव आवर, या बेभान मनाला सावर
व्यापुन राही कणाकणाला, तुझ्या भेटिची ओढ अनावर
पर्वतरांगा, कडेकपारी, डोंगर, कुरणे, दरिखो-यांतुन
उसळत आले आवर्तातुन, कधि बांधांच्या चाको-यातुन
कधी सोशिली ग्रीष्म काहिली, कधि शरदाची कौमुदि शीतल
स्वातीचे कधि झेलित मोती, बहर वसंताचा कधि चंचल
एकरूप होईन तुझ्याशी, नको दुरावा, नकोच अंतर
सामावुन घे अंतरात मज, वाहुन थकले मीहि निरंतर
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2740
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
कहर आहे..
+१
In reply to कहर आहे.. by प्राजु
सुंदर
वा वा
सुरेख...! (फ्
मला
या कवितेच्या
In reply to मला by पाषाणभेद
खरंच कौतुकाला शब्द नाहीत!
खूपच छान.
फार सुंदर कविता.
सुंदर!!
एकदम सुं द