"श्या.. हाईट झाली ही.. गेल्या काही दिवसात किती वेळा आले हे फिलिंग? असं काय होतंय.. ओह नो.. मला उचला इथून कोणीतरी ! चिडचिडचिडचिड होतीय........................." मी पाय आपटत होते अक्षरश:..
"अगं हो.. शांत हो जरा! काय होतंय़? कंटाळा आला का परत?? " इती नवरा
"हो मग काय.. दुसरं काय होतं मला.. कंटाळा कंटाळा कंटाळा.. कंटाळ्याचाही कंटाळा आला या कोटीचा सुद्धा कंटाळा आलाय!! .. :("
"ह्म्म.."
"ह्म्म काय!! कर काहीतरी या कंटाळ्याचे.. मी दमले आता.. रोज आपलं सोल्युशन शोधायचे आजचा कंटाळा कसा घालवू मी...."
"असं काय करतेस.. मान्य आहे बोर होतं इथे कधी कधी.. आईबाबा,मित्र मैत्रिणी,आपण जिथे वाढलो ते शहर.. आठवणी तर येतातच! तुला हवं तेव्हा उठून भारतात नाही जाता येणार.. पण किती वैतागशील? आई बाबा होते ना इथे सहा महीने.. तुझ्याच बरोबर ६ महिने नव्हते ते.. पण एकाच देशात, एकाच टाईमझोन मधे असण्याचा फायदा झालाच ना! फोनबिलावरुन कळलेच मला ते!! ;) "
"हो रे.. काय मजा यायची.. दिवसातून ३दा तरी फोन व्हायचे आमचे! त्यातून भाच्याच्या गमती जमती! वाह काय मस्त दिवस होते.. पण ते भारतात परतल्यापासून जास्तच वाटतंय मला असं.. :( "
"ही ना अमेरिका भंगार..भंगार.. भंगारेस्ट आहे !! मला आत्ताच्या क्षणाला काहीही आवडत नाहीये इथलं.. एकतर आपल्या गावात आपली लोकं कमी.. त्यातून अमेरिकन्स जास्त.. त्यान्ना हाय हॅलो सोडून काही बोलता येतं की नाही कोण जाणे! मला ना असं कोणीतरी पाहीजे.. अपॉइन्टमेन्ट, फॉर्मॅलिटी सगळं सोडून फोन न करता छान पैकी आरामात घरी येऊन कॉफी पीत गप्पा हाणणारी मैत्रीण हवीय़! श्या किती आम्ही मारायचो गप्पा अशा.. मिथु,मनी.. sigh.. ... इथे आहेत ना लोकं, मैत्रीणी.. पण किती ते अंतर? अमेरिकेच्या एका टोकावरून दुसरीकडे जायचे म्हटले तरी विमानाने ८-१० तास लागतात!! सगळंच अवघड! साधी कोथिंबीर आणायला गाडी काढून १५-२० मैल तरी गाडी हाकावीच लागते!! "
" घरं पण कसली पुठ्ठ्याची! मला इथल्या भिंती पण आवडत नाहीत.. पांढरे पुठ्ठे सगळे! रात्री अंगावर येतात अंधारात! सुरवातीला आठवते ना कसे झाले.. २-३ आठवडे नुसती वाईट स्वप्नं मला! म्हणजे आधीच तो वाईट्ट जेटलॅग लागला होता.. वेड्यासारखी कधीही झोपायचे.. रात्री टक्क जागी.. कधीतरी झोप लागली तर वाईट स्वप्नांची रांग.. कधी मी पडतीय, कधी कोणीतरी माझा पाठलाग करतंय, कधी कोणी मारतंय.. अर्रे काय्ये हे ?? :(( "
"अगं नवीन जागा.. त्यातून तू कधी पुणे सोडून राहीली नाहीयेस.. येणारच ना त्या अशा (भितीदायक) जुन्या आठवणी..!! " (माझा नवरा पुण्याचा नाही, त्यामुळे तो पुण्यावरून टॉन्ट्स मारणे सोडत नाही!! )
"गप हा.. पुण्याला नावं नकोयेत.. मी आधीच इतकी मिस करतीय.. आणी तू असं बोलतोस.. काही वाटतं का तुला?? तुझी गरीब बिचारी बायको इतकी वैतागलीय.. आणि तुला जोक्स सुचतायत.. व्हेरी फन्नि!!! :(( ते काही नाही.. तू काहीतरी कर.. कळलं का? मला पुण्याला जायचेय..सगळ्या मैत्रिणींना भेटायचेय.. पुण्याला भेटायचेय माझ्या! आई बाबांबरोबर राहायचंय.. आईला स्वयपाक करून तिच्या आवडीचे खायला करून द्यायचंय(एकदातरी!! :D ), त्यांच्याबरोबर कॅरम,रमी खेळायचीय! खूप काही! तेही आत्ताच्या आत्ता !!?? "
"आय नो, आय नो... डोन्ट वरी.. जाशील तू लवकरच.. ओके? नॉऊ चिअर अप! काय कंटाळा कंटाळा करतीयस.. विकेंडला कुठे जायचे ते कर बरं प्लॅन.. मी काही पाहणार नाही.. लोकेशन, रस्ते, हॉटेल्स सगळं ठरव.. जाईल वेळ जरा.. तसंही तू काही सोडणार नाहीस प्लॅनिंग नीट करायला.. नंतर ऑर्कुटवर फोटो टाकून शायनिंग मारायचे असते ना! हेहे"
"हो म्हणजे काय! :)) अरे ते शायनिंग मारणे नसते रे ! मी काय करतीय सद्ध्या, कुठे भटकंती, किती खादाडी केली ते सगळं एका क्लीक मधे कळतं ना माझ्या मित्र-मैत्रिणी,घरच्यांना.. ते सगळं शेअर करणं हा उदात्त(!) हेतू असतो बरका! लोल.. :) "
"ह्म्म नशीब हसलीस.. आता जा काहीतरी मस्त खायला कर! वरणफळं नाहीतर साबुदाण्याची खिचडी कर! "
"ह्म्म, आला मूळपदावर! सा.खि. काय अरे.. जमेल का अशी इन्स्टंट! करते काहीतरी !! मलाही भूक लागली वैताग करून!"
-------------------------------------------------------------------------------------------
नेहेमीचे डायलॉग्स हे..
( घरची मंडळी : घाबरू नका! टेन्शन घेऊ नका! मी एकदम मजेत आहे! :) )
सगळे तोंडावर आले नसतील संवाद.. पण मनात सतत वाजत असतात..
किती मिस करते मी इंडिया, पुणे, सगळंच,सारखंच..
वरचा संवाद वाचून असे वाटेल की मी अगदीच दिवसभर फ्रस्ट्रेट होऊन बसलेली असीन.. तसं काही नाही! मस्त आराम फर्मावतीय़.. भरपूर हिंडतीय.. खूप नवीन पदार्थ करायला शिकतीय, ते खात सुद्धा आहे! इथेही मैत्रिणींशी फोनवर का होईना गप्पा हाणतीय.. चॅट तर काय असतंच.. इथेही मंडळाचे कार्यक्रम असतात, भरपूर मराठी पब्लिक साधारण ४०-५० मैलांवर असतेच! बरेच नातेवाईक राहतात जवळच..
सगळं बेस्ट आहे हो! पण म्हणून इंडीयाची आठवण येणारच रोज! नाही जाऊ शकत मी हवं तेव्हा, मनात येइल तेव्हा.. अंतर,नोकरीतून सुट्ट्या,व्हीजाच्या कटकटी असतातच, त्या सगळ्या जंजाळातून जाणे म्हणजे कुठे सोप्पंय!
आत्ता लिहीता लिहीता अजुन एक जाणवलं.. भारताबद्दल आपल्या मायभूबद्दल इतकं, इतकं आतून वाटत असतं सारखं.. जीव तीळ तीळ तुटतो कधी कधी! आई कधीतरी सांगते शक्य तितक्या नॉर्मल आवाजात, की चिऊड्या आत्ताच तुझी इतकी आठवण आली, असला सही पाऊस पडातोय़!.... अशा परिस्थितीत धड उठून जाताही येत नाही.. समजूत काढूनही उपयोग नसतो, आणि काय काढणार? कसंनुसं हसून विषय बदलायचा अन काय!
असं आणि इतकं वाटत असताना जेव्हा कोणी भारतातले भारतीय, भारतात नसलेल्या भारतीयांवर सरळ जिभेचे आसूड ओढतात ना तेव्हा खरंच कळत नाही.. आजकाल नेटने जग फार जवळ आलंय.. लिखित मिडिअम असल्यामुळे कोणी काहीही बोलले तरी फारसा फरक नाहीच पड्त! पडून घेऊ नये! पण मग असं पदोपदी दिसत असेल तर आपण नक्की काय करावं?(अगदी कॉमन उदाहरण घ्या, इसकाळमधे येणारे वाचकांच्या कमेंट्स!! ) आमची काही आकांक्षा आहे, एक ठराविक ध्येय आहे आयुष्यात, काही नवीन गोष्टी साध्य करायच्या, नवनवे प्रदेश पाहायला मिळ्तात, काही शिकायचे असते.. हे सर्वं चूकच का?? आपलं, आपल्या आई बाबांचे, कुटुंबाचे आयुष्य जमेल तितके सोपे करायचे.. या विचाराने आम्ही इथे येतो.. त्यांच्याबद्दल प्रेम जाऊदे, पण द्वेष का वाटावा इतका? इतका.. की त्या लोकांनी भारताबद्दल आपुलकीनी बोलायचेही नाही, काही सुधारणा दिसल्या परदेशात, तर त्यांबद्दल बोलले की तुम्ही बादच! आमचा देश आम्ही पाहून घेऊ.... अरे?? आमचा देश?? तो आपला देश आहे ना? देश सोडला ’फिजिकली’ की संपलं का? मग खेडेगावातून पुणे मुंबईत येणार्याचा का अपवाद? त्यानेही त्याचा गाव सोडला म्हणायचा का?? नाही ना! मग तीच संकल्पना ग्लोबली का ताणता येत नाही आपल्याला? :( इट हर्ट्स.. पण जाऊदे.. जशी परदेशात आहे म्हणून बळंचच भारावून जाणारी लोकं असतात तस्साच पण उलटा प्रकार!
आम्हालाही अभिमान वाटतो ना देशाचा, तिरंगा दिसला की ऊर भरून येतो, छ. शिवाजी महाराजांच्या कथा ऐकून स्फुरण चढते, १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला जमेल तसे कार्यक्रम होतात इथे, कार्यक्रमापेक्षाही ती देशभक्तीची भावना आमच्याही मनात तेव्हढीच असते, मुंबईवर जेव्हा हल्ला झाला तेव्हा माझ्याच काळजाची जखम असल्यासारखे सैरभैर झाले होते मन... अजुनही ए.आरचे "ये जो देस है तेरा..." ऐकताना न चुकता पाणी येतं!! आम्ही भारतीयच आहोत शेवटी... जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी! आणि मायभूला स्वत:च्या ’माय’ इतकंच मिस करत राहणार.. म्हणून तर हे सगळं मराठी साईट्स शोधणे, मराठीतून ब्लॉग लिहीणे, पुस्तकं शोधणे वगैरे करत असतो आपण.. जमेल तसं भारतीय,महाराष्ट्रीय लोकं शोधून गणगोत जमवतोच ना आपण? इंडियन रेस्टॉरंट दिसलं की पावलं वळतातच ना तिथे? शेवटी आयुष्याची कमीत कमी २४-२५ वर्षं जिथे काढली ती पुसून थोडीच जाणारेत?? कसं शक्य आहे..!
------------------------------------------------------------------------------------------------
हे अन असं सारखं येतच असतं डोक्यात.. बर्याच दिवसांपासून काहीतरी लिहायचे होते असे.. अर्थात मनातले विचार परफेक्ट नक्कीच उतरले नाहीयेत.. नाहीतर मी प्रथितयश लेखिका नसते का झाले! :) नेहेमीप्रमाणेच मनात आले तसे उतरवले..
आवडले तर नक्की कळवा.. नाही आवडले तरी कळवा चालेल! :)
वाचने
17191
प्रतिक्रिया
74
मिसळपाव
प्रतिक्रिया
हम्म खरे
भाग्यश्री....
In reply to हम्म खरे by llपुण्याचे पेशवेll
मस्त
In reply to भाग्यश्री.... by बिपिन कार्यकर्ते
बिपिनचा
In reply to भाग्यश्री.... by बिपिन कार्यकर्ते
पर्फेक्ट प्रतिसाद बिपिनभौ
In reply to भाग्यश्री.... by बिपिन कार्यकर्ते
तलवारी तयार ठेवा
हेहे.. येस,
In reply to तलवारी तयार ठेवा by हवालदार
भाग्यश्री,
छान लिहीलंय
असेच म्हणतो
In reply to छान लिहीलंय by नीलकांत
अगदी
प्रमेय
In reply to अगदी by प्रमेय
मनमोकळं
पसंद अपनी अपनी
एकदम सहमत..
In reply to पसंद अपनी अपनी by बेसनलाडू
भाग्यश्री,
भारतात या
उत्तम लेख ...
चांगला लेख
अतिशय संयत प्रतिसाद.
In reply to चांगला लेख by विकास
>>अनिवासी
In reply to चांगला लेख by विकास
सोपे आहे
In reply to >>अनिवासी by शाहरुख
अगं
ठ्ठ्यॉ!!!!
In reply to अगं by रेवती
ठ्ठ्यॉ!!!!
In reply to ठ्ठ्यॉ!!!! by प्राजु
एका दगडात...
In reply to ठ्ठ्यॉ!!!! by अडाणि
भो विकास राव...
In reply to एका दगडात... by विकास
रिकामं मन, सैतानाच घर
पण पुढे
In reply to रिकामं मन, सैतानाच घर by नंदा
छान मनोगत
मुन्गी
सांस्कृतिक धक्का
आम्हालाही
तुर्त
) चुचु
In reply to तुर्त by विनायक प्रभू
सही...
मुन्गी
देश सोडणे,
नाइस
१००% सहमत
उदात्तीकरण
बर्याच
In reply to उदात्तीकरण by चिरोटा
प्रतिसाद
In reply to बर्याच by Nile
हा झाला
In reply to प्रतिसाद by चिरोटा
बरोबर आहे
In reply to बर्याच by Nile
बराचसा सहमत
In reply to उदात्तीकरण by चिरोटा
जबरी मुद्दा....
In reply to बराचसा सहमत by विकास
परदेशी
छान लिहिलं
<<<<<<<<<<<<<<<हा
भावपूर्ण मनोगत.
सहमत
In reply to भावपूर्ण मनोगत. by रामदास
तेव्हा
In reply to भावपूर्ण मनोगत. by रामदास
प्रकटन चांगलं आहे
चला वादावादी खेळू या! ;-)
In reply to प्रकटन चांगलं आहे by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
'सब घोडे
In reply to चला वादावादी खेळू या! ;-) by ३_१४ विक्षिप्त अदिती
ह्म्म्म्म
In reply to चला वादावादी खेळू या! ;-) by ३_१४ विक्षिप्त अदिती
पण बरीच
In reply to प्रकटन चांगलं आहे by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
.
In reply to पण बरीच by Nile
एकदम चपखल
In reply to . by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
+१ चूका
In reply to एकदम चपखल by मराठी_माणूस
तेच म्हणतो...
In reply to +१ चूका by llपुण्याचे पेशवेll
ओके.. मला
मस्त
In reply to ओके.. मला by भाग्यश्री
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
असेच म्हणतो...
In reply to मस्त by नंदन
सही झालाय
+१ समहत, असेच म्हणतो...वगैरे वगैरे!!!
In reply to सही झालाय by मेघना भुस्कुटे
+१
मस्त !
>>ही ना