मन
मन गवताचे पाते ,मन मेघ पावसाचे
मन पहाटवार्याचे , दव होउन बोलते..
मन नाजूक सतार ,मन अबोल गंधार
मन सांजावल्या रानी, कृष्ण बासरीचा स्वर...
मन रात्र शांततेची ,मन नक्षी चांदण्यांची
मन लाट सागराची, वाट आडवळणाची
मन तेज भास्कराचे,मन वार्याच्या वेगाचे
मन अलवार सूर नभी एकटे गुंजते
मन श्वास या देहात, मन पाखरु रानात
मन ज्योत राउळात कधी वीज आकाशात
मन पावसाचे थेंब ,मन जणु प्रतिबिंब
मन सुकल्या रानात, एक नाजुकसा कोंब..
काव्यरस
मिसळपाव


गंगाद्वार च्या पायर्या चढतांना दिसणारा ब्रम्हगीरी चा पर्वत. याच पर्वतावर गोदावरी नदी उगम पावली आहे. श्रावणातील तिसर्या सोमवारी या पर्वताला सुमारे ३० ते ६० किमी ची फेरी मारतात.
छाया.१
छाया.२