Skip to main content

गणेश माझा........

लेखक अनिरुद्धशेटे यांनी मंगळवार, 25/08/2009 14:08 या दिवशी प्रकाशित केले.
गणेश माझा........ गणेश माझा आहे सुन्दर कटी तयाच्या शुभ्र पीतांबर प्रभा तयाची दशदिशांवरी नभी उगवला वाटे दिनकर ! कटी मेखला नागांची ही डोक्यावर्ती जुडी दुर्वांची आहे गणेश मोहक माझा हाती मोदक त्याच्या शंभर! दुखे हरतो भक्ताची हा आहे गणेश माझा सुखकर पुजिती त्याला देवही सगळे आणी मराठी हा जनसागर ! आणी मराठी हा जनसागर ! -अनिरुद्ध-
काव्यरस

चांदण्यातले जेवण

लेखक नाना बेरके यांनी मंगळवार, 25/08/2009 14:06 या दिवशी प्रकाशित केले.
अवांतराला ख.फ.मध्ये मानाचे स्थान मिळाले वाटवेगळ्या सदस्याला स्वैंपाकघरात पान मिळाले (तरीही जेवण जात नाही सदस्य जातो अवघडून) अळणी खाणे जमत नाही कुचंबणा होते फार रस्सा इथला गोड वाटतो भाकरही लागते गार गार कसे जमायचे जेवण इथले फार मोठा प्रॉब्लेम झाला चवीने खाण्याच्या लालसेला मर्यादेचा लगाम लागला तोच भात, तोच रस्सा वाटे खावा सगळ्यांबरोबर चांदण्यांमध्ये घ्यावे जेवण द्यावे प्रतिसादाचे ढेकर
काव्यरस

गणपतीची सजावट !! (छायाचित्रासह)

लेखक पाऊसवेडी यांनी मंगळवार, 25/08/2009 14:03 या दिवशी प्रकाशित केले.
गणपती दोन दिवसांवर आले होते आणि माझ्या घरी मात्र कसलीच तयारी झालेली नव्हती.आईनेही दहा वेळा सांगून झाले कि विकतच तरी मखर घेऊन ये म्हणून पण कोणाच आईएकेल तर काय :) (त्यातून आईचे ;) ) तसेही शनिवार असल्यामुळे मला सुट्टीच होती वेळ पण खूप होता मग मी ठरवले कि आपणच घरी तय्यार करूयात :? त्यात बहिणच कलाकार(commercial artist) असल्यामुळे ती दिवसभर हेच काम करायची ;) हे गेले दोन तीन वर्ष पाहिलेही होते त्यामुळे काही खास पुर्वाताय्यारी वगेरे करयची नव्हतीच कारण अनेक प्रकारचे रुंग आणि ब्रश घरीच होते म्हणून मग पक्का ठरवले .

माहिती हवी आहे. NCD (Non convertible Debentures)

लेखक योगी९०० यांनी मंगळवार, 25/08/2009 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
आपणापैकी कोणाला NCD (Non Convertible Debentures) या विषयी माहिती आहे का? हल्लीच मला कळले की L&T Finance असे NCDs बाजारात आणत आहे. आधिक माहिती साठी या कंपनीच्या वेब साईट वर जास्त माहिती मिळेल. खालिल प्रश्न .. १) NCD मध्ये आपला पैसा कितपत सुरक्षित आहे? २) ही कंपनी कितपत विश्वासार्थ..? ३) coupan rate म्हणजे काय? ४) coupan rate आणि yeild on redemption असे वेगळे का असतात? ५) सर्वात शेवटी म्हणजे जेव्हा ह्या NCD ची मुदत संपते, तेव्हा आपल्याला मिळालेल्या व्याजावर आयकर भरावा लागतो का? तसेच गुंतवलेल्या रक्कमेवर आयकर सुट मिळते का? खादाडमाऊ

(सारे कसे सुने सुने वाटते)

लेखक दशानन यांनी मंगळवार, 25/08/2009 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा सारे कसे सुने सुने वाटते तुझ्या कात्रीने मुंडण धाग्याचे होते || ध्रु || प्रतिसाद येता, अन वाढता वाचने कुरघोडी लेखन बहरतसे || १ || नकोत गप्पा अवांतर, खव कशास प्रयोजन बोल खरडीत माझ्या गूंजते || २ || खरड माझी घे उत्तर खरडीत दे बोलत जावू टाळुनी धाग्याचे रस्ते || ३ ||
काव्यरस

लहानग्यांच्या नजरेतुन !

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 25/08/2009 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
काल एक अशीच फॉरवर्डेड मेल मिळाली. काही लहानग्यांनी परमेश्वराशी पत्रातुन साधलेला संवाद होता तो. बालपण किती स्वच्छ, शुद्ध आणि निरागस असतं याचं सुरेख चित्रण या पत्रांतुन घडतं.

बिल्डर कडून पुर्णत्वाची कागदपत्रे

लेखक अनुप कोहळे यांनी मंगळवार, 25/08/2009 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो. माझा फ्लॅट तयार झाला आणि बिल्डर कडून चाव्या घेण्याची वेळ आली :) :P आता फायनली बिल्डरकडून कोणती कागद पत्रे घ्यावी ह्याबद्दल कोणी जाणकार मंडळींकडून मार्गदर्शन मिळाले तर बरे होईल. मी पझेशन सर्टीफिकेट घेणारच आहे. त्याव्यतिरिक्त काय मागायचे ते सांगा. धन्यवाद, अनूप.

घरीच गणपतीची मुर्ती केली

लेखक चिंतामणराव यांनी मंगळवार, 25/08/2009 11:02 या दिवशी प्रकाशित केले.
या वेळी आम्ही घरीच मुर्ती बनवली. माझे मित्र श्री मुकुंद जहागिरदार ह्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न केला आहे. छोटासा स्लाइड शो बनवला आहे. http://picasaweb.google.com/lh/sredir?uname=pathak333&target=ALBUM&id=5… आस्वाद घ्यावा धन्यवाद चिंतामणराव

गणपती बाप्पा मोरया ! (भक्तिरस)

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 25/08/2009 10:49 या दिवशी प्रकाशित केले.
अवनिशा.., अलंपता बुद्धीनाथा तू बुद्धीदाता धार्मिका गौरीसुता बुद्धी दे विनायका ! गजवक्त्रा.., एकदंता चतुर्भुजा तू देवव्रता सिद्धीपती विघ्नहर्त्या सौख्य दे गणनायका ! धुम्रवर्णा.., एकद्रिष्टा मंगलमुर्ति गजानना महाबळा मुक्तिदात्या सन्मति दे सिद्धीनाथा ! शुभगुणांकना सिद्धीप्रिया शुभानना तू वक्रतुंडा स्कंदपुर्वजा सिद्धीदायका सामर्थ्य दे तू विघ्नेश्वरा ! अल्पमति मी भक्त तुझा तु समृद्धी दे गणराया विघ्न हरो चराचराचे दे पसायदान वरदेश्वरा ! विशाल.
काव्यरस