Skip to main content

बदलाबदली !

लेखक भोचक यांनी गुरुवार, 27/08/2009 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
बदल हा माणसाचा स्थायीभाव आहे. बदलतो तो माणूस. बदलला म्हणून माणूस इथवर पोहोचला. असली बदलाबदलीची वाक्ये ऐकून, वाचून कान आता किटले नि डोळे विटले आहेत. अस्मादिक 'ठेविले अनंते तैसेचि रहावे' या तुकारामी प्रवृत्तीचे. त्यामुळे बदलाचं वारं काही झेपत नाही. मग तो बदल वैयक्तिक असो की सार्वजनिक. वैयक्तिक बाबतीत लिहायचं तर, अगदी हाफिसमधली जागा असो, खुर्ची असो, कम्प्युटर असो की आणखी काही. यातलं काही काही बदललेलं चालत नाही. मालकाने पैसे मोजून ठेवून घेतलं असलं तरी या 'ठेविले अनंते' वृत्तीचा माज मात्र त्याला सहन करावाच लागतो. कारण माझ्याकडून होणार्‍या कामातूनच त्याला 'चित्ती समाधान' लाभत असतं.

बाप्पा , असे ही...

लेखक हृषीकेश पतकी यांनी गुरुवार, 27/08/2009 15:10 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या वर्षी अनंत चतुर्दशीच्या दुसर्‍या दिवशी संध्याकाळी विसर्जीत होणार्‍या एका गणेशमूर्ती कडे पाहून सुचलेली ही कविता....

भेटी

लेखक क्रान्ति यांनी गुरुवार, 27/08/2009 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
उजळती दीप स्वप्नांचे अलवार क्षणांच्या भेटी बहरात गंध प्रणयाचा, त्या बकुळफुलांच्या भेटी भिरभिरता अवखळ वारा, सरसरत्या श्रावणधारा नखशिखांत भिजल्या हिरव्या पाऊसखुणांच्या भेटी उलगडली कितिक रहस्ये, गीतांत भाव अवतरले शरदात चांदण्या रात्री हळुवार सुरांच्या भेटी सुकलेल्या गजर्‍यामधल्या गंधाचा अत्तरफाया रुसव्याचे फसवे नखरे, हसर्‍या अधरांच्या भेटी तळव्यावरच्या मेंदीच्या नक्षीत रंगली प्रीती सुकुमार कंठि गुंफियल्या रेशमी करांच्या भेटी विसरून भान काळाचे रंगल्या किती गुजगोष्टी जणु पुस्तकात दडलेल्या मृदु मोरपिसाच्या भेटी अलगद टिपले तार्‍यांनी हृदयाशी मधुर क्षणांना अन् चंद्रानेही जपल्या अंतरी मनांच्या भे
काव्यरस

..मोक्ष..

लेखक कानडाऊ योगेशु यांनी गुरुवार, 27/08/2009 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
..मोक्ष.. ------------------------------------- फुले वेचिली देवपूजेस जी तू तुझ्या कुंतलात जरा माळ काही नवा अर्थ दे तु बहरण्यास माझ्या कुणी देव काही म्हणणार नाही नको एकटी तु राहुस ऐसे नको होऊस माझ्या आठवणीत चूर तिथे तेज माझे वातीसम फडफडे कसा मंद राहु मी तारकांत दूर? भाळावरील तुझ्या मोहक ती बट अजुनि आहे तैसीच पण भासे उदास पुन्हा उमलु दे गालावरी खळ्या गं पुन्हा मुक्त उधळु दे मनी वसंतास जरा न्याय अप्सरे,दे तू तुझ्या यौवनाला दिसे मज सारे दुरुनि नभात अजुनि आहेस तु लावण्यखाणी स्वत:ला पाहा तु पुन्हा आरशात जरा मोकळे केस सोडुन..गं..तु सुकेशा होऊनि अल्लड ये पुन्हा अंगणात तिथे मी कधीचा बरसतोय इतु
काव्यरस

कोणी नोकरी देता का नोकरी ???

लेखक छोटा डॉन यांनी गुरुवार, 27/08/2009 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, कसे आहात ? काय चालु आहे ? ("रोजच्या गप्पाटप्पा करण्यासाठी,वाढदिवस, बातम्या आणि इतर अश्याच तात्कालीक चर्चांसाठी हा खरडायचा फळा आहे" हे आठवल्याने बाकीच्या गप्पा खरडफळ्यावर. असो.") तर आम्ही आज तुमच्यापुढे एक जटिल समस्या घेऊन आलो आहोत. त्याचे आहे की परवा तो विनायक पाचलगच्या धाग्यातली "दमलेल्या बापाची कहाणी" ऐकुन आम्ही ( बाप न होताच ) हळवे झालो व एका बेसावध क्षणी तशी प्रतिक्रिया देऊन बसलो.

पुनः सप्तपदी

लेखक युयुत्सु यांनी गुरुवार, 27/08/2009 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
मी सप्तपदीवर केलेल्या लिखाणावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या.

काही बातम्या कशा तयार होतात?

लेखक विकास यांनी गुरुवार, 27/08/2009 00:25 या दिवशी प्रकाशित केले.
जसवंतसिंगांमुळे तयार झालेल्या विविध बातम्या वाचताना एक प्रश्न डोक्यात आला: काही बातम्या कशा आणि का तयार होतात? हाच ह्या चर्चेचा विषय आहे. निव्वळ जसवंतसिंग आणि जीनांसाठी इतरत्र चालू असलेल्या धाग्याचा अधिक उपयोग होऊ शकेल पण येथे केवळ त्यावर चर्चा होऊ नये असे वाटते.

मन काहूर...

लेखक प्राजु यांनी बुधवार, 26/08/2009 22:40 या दिवशी प्रकाशित केले.
काहूरले मन सांजवेळ होता होता हूरहूर लागे जीवा रात गूढ होता क्षितिजास पहुडली कंटाळली वीज डोळ्यातून परतूनी गेली आज नीज तळपता रवी थकलेला संध्याकाळी जळताना दिन सारा साचली काजळी रेखले या काजळास अवनीच्या डोळा सोनसळी आसमंत झाला गं सावळा सावळ्या नभाची चढे चांदव्याला धुंदी दूर दाट सावलीने थरारली फ़ांदी इवल्याशा घरट्यात इवलासा श्वास चोचीतल्या दाण्यालाही कोटराचा ध्यास दूरदूर डोंगराचे शिखरही नीजे काळ्या कागदास नक्षी चांदण्याची सजे काळोखाचा आवाजही किर्रर्र दाटे असा रात्रीवर उमटतो खोल खोल ठसा नटलेली निशा पण मन हे काहूर उदासच वाटे आज पावरीचा सूर खोल अंतरात जसा अडकला स्पंद गळा दाटलेला तरी फ़ुटेना का बांध??
काव्यरस