Skip to main content

धा धिन धिन धा

लेखक कौतुक शिरोडकर यांनी सोमवार, 31/08/2009 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
मेघांचा डफ, तडीतेची थाप गगनाच्या अधरी, मल्हारराग लय.. जलतरंग, भुई छेडीता तालास येई, लयबद्ध जाग पवनाने धरिला सुर अन नाचे गणेश धा धिन धिन धा .... धा धिन धिन धा शुभसुंदर .. अरूपाचे रूप गौरीतनय .. तो गण नृप लोभस मुर्त .. मुखगजस्वरूप आल्हादघन, सांबनंदन नाचे गणेश धा धिन धिन धा ... धा धिन धिन धा पदी पैंजणे .. झंकारती रसभाव मुखी .. साकारती तुंदील तन .. मोही मती अंगांग मीन, मुद्रेत लीन नाचे गणेश धा धिन धिन धा ... धा धिन धिन धा आकाशगंगा .. तेजाळली नक्षत्रे नभी .. उल्हासली चैतन्यगंधी .. हर्षावली विश्वाचा मंच, अपुरे अनंत नाचे गणेश धा धिन धिन धा ... धा धिन धिन धा
काव्यरस

मौनभंग केल्याने इरादा असत्यभासाचा आहे असं वाटेल.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 31/08/2009 10:09 या दिवशी प्रकाशित केले.
आज प्रो.देसाई जरा गंभीर दिसले. "तळ्यावर फिरायला आल्यावर सर्व विवंचना घरी ठेवून यावं" असं सांगणारे स्वतः भाऊसाहेब आज कसली विवंचना घेऊन आले आहेत ह्या विवंचनेत मी पडलो.मी भित भितच त्यांना विचारलं, "घरी सर्व ठिक आहेना?" "ठिक नसायला काय झालं?.जो तो आपली जबाबदारी संभाळत आहे.नातवंड शाळा कॉलेजात दंग आहेत.मुलं आपल्या काम धंद्यात बिझी आहेत.कामावर तरी निदान बिझी असल्यासारखं दाखवावं लागतं.सध्या जॉब टिकण्याची काही खात्री नाही.राहाता राहिलो आम्ही म्हातारी कोतारी माणसं.सकाळी उठल्यावर गुडघे दुखत नाही हे समजल्यावर समजावं आपण ठिक आहो.ह्यावरून कळलं ना तुम्हाला की सर्व ठिक आहे ते.?" प्रो.देसायानी एव्हडं सविस्तर

उरणचे काही गणपती...

लेखक विमुक्त यांनी सोमवार, 31/08/2009 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या घरचा गणपती आमच्या घरचा गणपती सार्वजनीक गणपती (माझा आवडता) खूपच सुंदर मुर्ती आहे (एकदम जीवंत) सार्वजनीक गणपती

ती व तो - लफडा अनलिमिटेड -भाग -३

लेखक दशानन यांनी रविवार, 30/08/2009 20:11 या दिवशी प्रकाशित केले.
मागील भाग.. २ हम्म्म... थोडे थोडे कळाले आहे.. तुला काय सांगायचे आहे ते... पण जरा क्लियरली सगळे पुन्हा सांगशील का मला ? ही एवड्या स्पीड मध्ये बोलते.. की काही मुद्दे कळतच नाहीत... खरं तर मला कळतं.. पण तिचा आवाज पुन्हा पुन्हा माझ्या कानावर पडू दे म्हणून मी जवळ जवळ प्रत्येक गोष्ट.. रिपीट करायला लावतो.. मी.. हे तीला कसे कळणार. मला वाटतं ती मला अजून पण मंदच समजते... व विसराळूपण.... विसराळू आहे.. पण मंद.. ह्मम्म मी नाही... आता राहिली तीची अडचण... मोठी अडचण आहे... काय करु शकतो हे बघावे लागेल.. हिला संध्याकाळी फोन करायला सांगतो..

विजय मल्या - खरे भारतीय !

लेखक सचीन जी यांनी रविवार, 30/08/2009 19:32 या दिवशी प्रकाशित केले.
स्टार न्युज वर आत्ताच पाहीलेली बातमी - फोर्स इंडिया टीमच्या फिशीकेलाने पोल पोझिशनने सुरवात करत बेल्जियम फॉर्म्युला वन ग्रां प्रीत दुसरे स्थान मिळवले. फोर्स इंडिया ही किंग फिशरचे किंग विजय मल्या यांची फॉर्म्युला वन टीम आहे. फॉर्म्युला वनमधे हे भारतीयांचे पहिले यश आहे. फॉर्म्युला वन सारख्या महागडया खेळात स्व:ताची टीम तयार करुन, परदेशी ड्रायव्हर पदरी ठेउन यश मिळवत या खेळात भारताचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल विजय मल्या यांचे अभिनंदन! फोर्स इंडियाच्या गाडीबरती, फिशिकेलाच्या पोशाखावरती इतकेच नाही तर विजय मल्या यांच्या हेडफोनवरही तिरंगा विराजमान आहे.

पुढे काय झालं असेल?/कोण कुठे असेल? :)

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 30/08/2009 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, आपण नेहमीच शिणेमे पाहतो, त्याचा बरावाईट काय असेल तो शेवट पाहतो आणि घरी येतो.. त्यानंतर त्या कथेचं पुढे काय झालं असेल याचा विचार सहसा करत नाही. माझ्या मात्र मनात पुढील कथेबद्दल, त्यातील पात्रांबद्दल पुढे काय झालं असेल या बद्दल उत्सुकता असते. आता शोलेचंच उदाहरण घ्या आणि द्या पाहू आपापल्या कल्पनाविलासाप्रमाणे खालील प्रश्नांची उत्तरे - :) १) गब्बरला पोलिसांनी पकडल्यावर, जय मेल्यावर पुढे वीरू आणि बसंती कुठे स्थायिक झाले असतील? २) वीरूने चोर्‍यामार्‍या सोडल्या असतील का?

एक कोडे

लेखक युयुत्सु यांनी रविवार, 30/08/2009 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
एक कोडे आधुनिक मानवाच्या काही श्रद्धा मला नेहेमी कोड्यात टाकतात. याचे मला कधी हसू येते तर कधी त्यांची कीव करावीशी वाटते. उदाहरणच सांगायचे झाले तर मानवाची इतर प्राणी जगतापासून स्वत:ला वेगळे ठेवण्याची धडपड... आधुनिक मनुष्यप्राणी स्वत:ला इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ समजतो. या श्रेष्ठत्वाचे तो अनेक त‍र्हांनी समर्थन करतो. हे श्रेष्ठत्व टिकवण्यासाठी अनेक भल्याबु‍र्‍या मार्गांचा अवलंब आजवर त्याने केला आहे. माणसाचा 'विकास' पावलेला मेंदू हा या समर्थनाचा मुख्य आधार आहे. या विकास पावलेल्या मेंदूने प्रश्न सोडवले किती आणि निर्माण केले किती?

|| धर्मांतर ||

लेखक युयुत्सु यांनी रविवार, 30/08/2009 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
धर्मांतर हा माझ्या कुतुहलाचा विषय आहे. त्यात हिंदूचे धर्मांतर हा तर विशेष कुतुहलाचा विषय. हिदूंना वाटत असलेल्या धर्मांतराच्या चिंतेची मला नेहमीच गम्मत वाटत आली आहे. काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ते गणेशोत्सवाचे दिवस होते. पुण्यातील एका मानाच्या गणपतीतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात एका विद्वानाचे "धर्मांतराची समस्या" या विषयावर प्रवचन होते. वर म्हटल्याप्रमाणे, हा कुतुहलाचा विषय असल्यामुळे मी या कार्यक्रमास उपस्थित राहिलो होतो. शुभ्र वेष, शुभ्र दाढी आणि तुळतुळीत टक्कल असलेले प्रमुख वक्ते पूर्वाश्रमीचे अमेरीकेत एमेस केलेले संगणक अभियंते होते.

स्पर्श - (कथा)

लेखक सागर यांनी रविवार, 30/08/2009 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
अलिकडेच मी शनिवारवाड्याचे रहस्य ही रहस्यकथा आणि सूड ही कथा लिहीली होती... नकारात्मक भूमिका असलेल्या नायकाच्या (खरेतर खल-नायकाच्या) सूड या कथे नंतर वाचकांना कदाचित ही वेगळ्या प्रकारची हलकीफुलकी कथा आवडेल अशी आशा आहे... ही कथा माझ्या ब्लॉगवर असल्यामुळे काही जणांनी अगोदरच वाचली असण्याची शक्यता आहे... पण मिसळपाव वर ही माझी कथा प्रथमच देताना आनंद होतो आहे.