Skip to main content

मूर्छना

लेखक शुभान्कर यांनी बुधवार, 26/08/2009 19:03 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या भारतीय संगीतात मूर्छना ही एक खुपच सुंदर कल्पना आहे. मूर्छना म्हणजे एका रागाच्या एका स्वरावरुन दुसरा राग तयार होणे. उदा. मालकंस या रागाच्या सर्व पाचही स्वरावरुन भुप्,दुर्गा,मेघ,धानी असे राग मिळतात. उदा. दाखल धुंद मधुमति रात रे हे गाणे मालकंस आणि भुप या दोन्हि रागात सुन्दर बसते. फक्त त्याचा सा बदलतो. तीच गोष्ट पन्ख होति तो उड आती रे ह्या गाण्याची. मला ह्या मुर्छना पद्धती वर एखादे चांगले पुस्तक हवे आहे. कुणी सांगु शकेल काय? धन्यवाद.

मी पाहिलेले प्रायोगिक नाटक.

लेखक भडकमकर मास्तर यांनी बुधवार, 26/08/2009 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
माझं नाव ‍र्‍होअन तोंड्वळकर... मी नरवीर कोंडाजी शिरुडे विद्यालयात पाचवीत शिकतो. आमच्या शाळेला काहीजण नकोशि शाळा असे म्हणतात. ते खरेही आहे. मला नाटक पहायला फ़ार आवडते. भरत जाधव आणि प्रशांत दामले मला आवडतात. सही रे सही आणि एका लग्नाची गोष्ट मी ४ वेळा पाहिलं आहे. मला अनुभव घ्यायला फ़ार आवडतं. आणि ते लिहून काढायला.... मी एक सामान्य छोटा लेखक आहे हे मला माहित आहे पण कधीतरी तर सुरुवात करायला हवीच ना? माझे निबंध खूप छान होतात, असं सगळे म्हणतात. मी खूप वाचन करतो. सकाळ म.टा. लोकसत्ता पुढारी लोकमत संध्यानंद केसरी तरूण भारत इतके पेपर वाचतो.

र्निमाल्यातिल दोन फुले--

लेखक पुष्कराज यांनी बुधवार, 26/08/2009 16:28 या दिवशी प्रकाशित केले.
सहज ऐकले बोलत होती र्निमाल्यातिल दोन फुले कालच आपण फुललो होतो कसे विसरले लोक खुळे जाउ दे रे सोडून दे तू काय मनाला घेसी लावून काय आपुले ह्यांचे नाते जिथे सख्यांची नाही आठवण सखे- संगती सोडून दे तू आइ-बापही आडचण होती नीच इतका झाला माणूस स्वार्थास्तव रे शिवतो नाती पाहिलास का व्रुद्धाश्रम तो मालवणारे दिवे इथे प्रकाशवाटा ज्यांनी आखल्या त्या वाटांचा अंत तिथे
काव्यरस

तांदुळाच्या पीठाची थालिपीठे

लेखक शाल्मली यांनी बुधवार, 26/08/2009 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
परवा गणपतीसाठी मोदक केल्यानंतर थोडी पीठी उरली होती. त्याचे काय करावे असा विचार केल्यानंतर सुचले की याची थालिपीठे करुन पहावीत. तशीही इथे आल्यापासून थालिपीठे खाल्लीच नव्हती आणि अशी कशी आपण थालिपीठ भाजणी आणायची विसरलो हा विचार करणंही एव्हाना सोडून दिलेलं होतं. त्यामुळे आता या उरलेल्या पीठाची थालिपीठे करण्याचं पक्कं केलं. हा पदार्थ खूपच छान चविष्ट लागला.

चिंतातुराणां न सौख्यं, न मज्जा.

लेखक दत्ता काळे यांनी बुधवार, 26/08/2009 14:08 या दिवशी प्रकाशित केले.
दिवसभराचं पाट्या टाकणं झालं आणि मी ऑफिस बंद करत होतो. तेवढ्यात फोन वाजला. "दत्ता. . मी मंदार. तू ऑफिसमध्येच आहे कां ?" मी म्हणालो " हे काय बंद करून निघतोच आहे. कां रे ?" तुझ्याकडे तासभर वेळ आहे कां ? हो आहे. कुठे जायचंय कां ? हो. जरा गप्पा मारंत बसू. कुठे ? भोलाकडे. वडा-पाव बर्‍याच दिवसांत खाल्ला नाही. च्यायला, नुसता वडापाव ? आणि वडापाव खायला तास कशाला लागतो? मला वाटलं तू 'कवी'मध्ये बसायचं म्हणतोयस. लेका . . . श्रावण चालू आहे. नेहमी पिणार्‍यांना श्रावण. मला नाही. तरीसुध्दा नको. तू भोलाकडे ये. मी निघतोय लगेच. मी भोला वडेवाला कडे पोहोचलो.

अशीच एक गोष्ट...

लेखक विमुक्त यांनी बुधवार, 26/08/2009 13:16 या दिवशी प्रकाशित केले.
भाल्या आपल्याच तंद्रीत बिडी ओढत बांधावरुन घराकडं चालला होता. वेळेची आणि आजुबाजूला काय चाल्लयं ह्याची त्याला अजीबात जाणीव नव्हती. तितक्यात मागून आवाज आला... "अरे ये भाल्या! थांब जरा... मी पण येतो". मग दोघे सोबतच चालू लागले... "बिडी दे रे" सोबतचा म्हणाला... भाल्यानं त्याला बिडी दिली... सोबतचा "झकास... ३० नबंर!!!... हीच ओढतो मी रोज..." इकडच्या्-तिकडच्या गप्पा मारत दोघे चालत होते... तितक्यात..."बिडी दे रे" सोबतचा परत म्हणाला... ती पण संपली... परत सोबतच्यानं बिडी मागीतली... भाल्या मात्र अजून पहिलीच बिडी ओढत होता... त्याला बिडी दिली आणि भाल्या जरा दचकलाच...

भोपळ्याची (दुधी) कोफ्ता करी

लेखक चटोरी वैशू यांनी बुधवार, 26/08/2009 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
भोपळ्याची (दुधी) कोफ्ता करी ज्याला भोपळा आवडतो/ नाही आवडत त्यांनासुद्धा आवडेल.... (असे मला वाटते) साहित्य : १ मध्यम आकाराचा भोपळा(दुधी), १/२ वाटी बेसन, २ कांदे, २ टोमॅटो , ६-७ पाकळ्या लसून, १ वाटी तेल, १ चमचा तिखट, मिठ , हळद, जीरे इ. कृती : प्रथम भोपळा सोलून घ्या, नंतर त्याला किसनीने किसुन घ्या. त्याला पाणी सुटले असेल ते सगळे पिळुन काढुन घेणे. मग त्यात बेसन, थोडीशी चविपुरती तिखट, मीठ , हळ्द आणि हे सगळे नीट मिक्स करुन त्याचे पाहिजे त्या आकाराचे गोळे करुन घेणे.

आयुर्वृद्धितीतली सुंदरता

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 25/08/2009 23:07 या दिवशी प्रकाशित केले.
गिरगावातल्या कुडाळदेशकर निवासातल्या सहा नंबरच्या चाळीत माझा मित्र भाली(भालचंद्र) रेडकर राहायचा.अलीकडेच तो गेला.त्याची मोठी बहिण अर्थू रेडकर त्याच्याच घरी राहायची.तिने लग्न केलं नव्हतं.वयस्करपणाचा परिणाम तिच्या चेहर्य़ावर उठून दिसत होता.मी अर्थूला ओळखलंच नाही.मला तिने ओळखलं.तिला पाहून माझा चेहरा तिला काही तरी सांगून गेला हे केव्हाच माझ्या लक्षात आलं. मला म्हणाली, "तू मला ओळखणार नाहीस.कित्येक वर्षानी आपण भेटतोय.तू मात्र आहेस तसाच आहेस." "पण तू इतकी खराब कशी झालीस?. असं मी म्हणता म्हणता मला अर्थू म्हणाली, "अरे हे सर्व प्रश्न दारातच विचारणार की आत येणार?" मी आत गेल्यावर प्रथम सहाजीकच इकडच्या तिकडच

(( ती - सहा ओळीत ))

लेखक दशानन यांनी मंगळवार, 25/08/2009 20:20 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा
मी आल्यावर तु पळतो का रे? वासाने व्याकूळ होउन सांग तू गुदमरतो का रे ? टनांने वाढला देह काय करावे. वजन कसे घटवावे कुणास पुसावे मी पडल्यावर उचलशील कसा रे ?

प्रेम - चार ओळीत

लेखक पुष्कराज यांनी मंगळवार, 25/08/2009 19:09 या दिवशी प्रकाशित केले.
मी गेल्यावर स्मरशील का रे? आठवणींनी व्याकूळ होउन सांग कधी तू रड्शील का रे ? या प्रश्नाला काय म्हणावे. आत्म्याने देहास पुसावे मी गेल्यावर जगशील का रे ?
काव्यरस