लोकशाही २००९
लोकसंख्येने जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असलेल्या भारतात आज १४ व्या लोकसभेचे सूप वाजले आणि १५ व्या लोकसभेच्या आगमनाची तुतारी.
काँग्रेससह संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार येणार हा केवळ औपचारीकतेने होण्याचा विधी उरला आहे. सर्वप्रथम त्यानिमित्त काँग्रेस आणि सपुआचे अभिनंदन. वृत्तपत्रातील बातम्यांचा विचार केला तर, या वेळेस उत्तरप्रदेशात वेगळी चूल मांडून एका अर्थी धोका पत्करत, विशेष करून त्या निर्णयास काँग्रेसमधील ढुढ्ढाचार्यांचा विरोध असूनही यश मिळवून दाखवल्याबद्दल राहूल गांधींचे पण अभिनंदन. नो रिस्क नो गेन हे एका अर्थी खरे ठरले!
भाजपा आणि रालोआला नक्कीच सलग दुसर्यांदा (२००४ नंतर) अनपेक्षित निर्णय लागला. "अपयश पोरके असते", त्यामुळे ते कसे चुकले यावर "मेलेल्याला मारत" भरपूर विश्लेषण माध्यमे करतील. अंतर्गतपण रोगावर योग्यवेळेस इलाज करण्या ऐवजी मेल्यावर शवविच्छेदन करत हे असे का झाले याची चर्चा होईल... मग कोणी म्हणेल तरूण हवे होते, कोणी म्हणेल मोदींना प्रोजेक्ट करायला नको होते... वगैरे वगैरे.
या लेखात केवळ एक लोकशाही म्हणून काय अडले, नडले, घडले, आणि बिघडू शकते यावर थोडक्यात लिहीत आहे. तुम्हा सर्वांच्या माहीतीने भर पडेल ह्याची खात्री आहे.
काय अडले?
ह्या वेळेसपण नेहमी प्रमाणे मतदार अडले. सरासरी अंदाजे ५०+% मतदान होणे हे काही परीपक्व लोकशाहीचे लक्षण वाटत नाही. अर्थात ती एक लोकशाहीची मर्यादा देखील आहेच. मतदानावरून पुढे काय होणार ह्याचा अंदाज घेत अडवाणी म्हणाले होते की आता मतदान करणे सक्तीचे होणे महत्वाचे आहे. तसे होणे हे बरोबर की चू़क ते माहीत नाही. पण काहीतरी यावर उपाय होणे हे गरजेचे आहे.
काय नडले?
काय पेक्षा यात कोण जास्त आहेतः कम्युनिस्ट, राष्ट्रवादी, इतर चिल्लर आणि अर्थातच महाराष्ट्रापुरते बोलायचे तर मनसे. यात एक मनसे सोडल्यास इतर सर्वांनी मार खाल्ला. मनसेने विधानसभेची व्युहरचना आत्तामिळालेल्या मताधारे नक्की केली असे वाटते. त्या बाबतीत भाजपा-शिवसेनेने मार खाल्ला. आता भाजपने मनसेबरोबर चूल मांडली तर अजून मार खातील असे वाटते. भाजप आणि सेनेस अनुभवातून शहाणपण येणार का ते बघुया.
काय घडले?
आज निकाल लागल्यावर काय घडले ह्यावर बर्याच काही चांगल्या गोष्टी घडल्या असे वाटते:
- जरी पूर्ण बहुमत नसले तरी पुढील पाच वर्षे स्थिर सरकार मिळण्याची शक्यता ९०+% आहे. तसेच अशी शक्यता १००% नसल्याने काँग्रेसवर पण दबाव राहू शकतो. कारण उद्या शहाबानोसारखी घटना दुरूस्ती करायची असेल तर त्याला लागणारे बहुमत हे इतरांवर अवलंबून राहील.
- तसेच महत्वाच्या इतर घटनांसंदर्भात (उ.दा.: संरक्षण, परराष्ट्रीय धोरण यात पण थोडाफार इतरांचा दबाव राहू शकतो आणि तसा तो रहावा असे वाटते).
- पक्षनिहाय स्थिती पाहीली तर भाजपाने नक्कीच मार खाल्ला आहे. गेल्यावेळच्या २१ जागा गमावून काहीतरी मूळापासून चुकत आहे हे सिद्ध करून दिले. - ते काय चुकते त्यावर लिहीता येईल पण हा या लेखाचा उद्देश नाही. म्हणून मोह टाळतो. त्याच पद्धतीने काँग्रेसला ६० जागांचा फायदा मिळाला आहे. त्यातील काही जागा जरी तिरंगी/चौरंगी लढती मुळे मिळाल्या असे म्हणले तरी काही प्रमाणात हे काँग्रेसचे स्वतःचे म्हणून यश आहे असे म्हणायला नक्कीच जागा आहे.
- पण वरील मुद्यातून एक ठळक होणारी गोष्ट म्हणजे देशाचा विचार केला तर काँग्रेस आणि भाजपा असे दोन पक्षात प्रामुख्याने ध्रुवीकरण झाले आहे. अप्रत्यक्ष द्विपक्षीय पद्धती आणि प्रत्यक्ष दोन ब्लॉक्स/आघाड्या असे पुढचे राजकारण घडणार असल्याची ही नांदी वाटते.
- महाराष्ट्राचा विचार केल्यास भाजपाला ४, शिवसेनेस १ तर राष्ट्रवादीस १ जागा असा गेल्यावेळपेक्षा मार खावा लागला आहे. याचा अर्थ वाढ होणे लांब राहीले, झालेली पण खुंटली... आत्मपरीक्षण करून सुधारून जनतेच्या पुढे येण्यासाठी काही महीन्यांचाच कालावधी आहे. शहाणपण आले नाही तर लोकसभेप्रमाणेच विधानसभेत पण मार खाऊन किमान पाच वर्षे "चमत्कारा"ची वाट पहात बसावी लागेल.
- कम्युनिस्ट हरले/मार खाल्ला हा या "लोकशाही २००९" चा सगळ्यात मोठा जय आहे असे वाटते. तसे कम्युनिझममधे लोकशाहीला स्थान नसतेच तर त्याला लोकशाहीत का तडमडायचे असते हा अनुत्तरीत प्रश्नच आहे.
- मात्र विकीने म्हणल्याप्रमाणे कम्युनिझम ही एक विचारधारा आहे. जेंव्हा असमानता वाढते तेंव्हा माथेफिरू मंडळींना ती जवळची वाटते. वास्तवीक त्याला आल्टरनेटीव्ह असा गांधीवाद आणि संघाचा भारतीय एकात्म मानवतावाद (इंटीग्रल ह्युमॅनिझम) आहेत. पण कुठलीच संस्कृती (जी गांधीजी आणि संघ सोडायला तयार नसतात) त्यांना मान्य नसते. याचाच एक परीणाम म्हणून त्यांच्यातील विद्वान हे बुद्धीभेद करण्यात पुढे असतात. दुर्दैवाने, काँग्रेसमधे स्वतःचे बुद्धीवादी/बुद्धीजिवी म्हणावेत असे कोणी नसल्याने काँग्रेसजनांना कॉमी बुद्धीवाद्यांना भाव देत त्यांचा वापर करायला आवडते. कॉमीज् ना पण असे सलोख्याचे संबंध चालतात कारण त्यात ते भाजपाला/संघाला शिव्या देत (ज्या काँग्रेसला हव्या असतात) स्वतःचे संस्कृती नष्ट अथवा इतिहास भ्रष्ट करायचे काम सहज करू शकतात. थोडक्यात जरी डावे गेले असले तरी डावे विचारवंत मधे तडमडून बरेच काही अजूनही बिघडवू शकतात.
- आंधळा मागतो एक डोळा तर देव देतो दिड डोळा अशी काहीशी अवस्था काँग्रेसची झाली आहे. अजून स्वबळ नाही मात्र साम्यवाद्यांवर अवलंबून रहायची वेळ नसल्याने बर्यापैकी स्वातंत्र्य मिळू शकेल अशी आशा आहे. त्याचा परीणाम म्हणून अर्धा का दीड ते माहीत नाही पण हळकुंडाने पिवळे होऊन परत बसणारी घडी लगेच नाही तरी वर्षभरात बिघडू शकते. तितके कुणाचेही साथीदार समर्थ आहेत. (जयललीता आठवते ना? एक मत..आणि रालोआ पॅव्हेलीयन मध्ये).
- भाजपच्या बाबतीत कितीही शिस्त, संस्कार म्हणले तरी ब्लेमगेम चालू होईल असे वाटते. त्यात अडवाणींनी संसदीयनेतेपदाचा राजीनामा आत्तातरी दिला आहे. तो मान्य केला नसला तरी, मला वाटते अडवाणी आता ते ऐकणार नाहीत. (२००४ साली, पण निकाल स्पष्ट होताच वाजपेयी आणि अडवाणींनी राष्ट्रपतींची भेट घेऊन लवकरात लवकर सरकार स्थापून आम्हाला मो़कळे करा अशी विनंती केली होती. जरी काँग्रेस सरकार स्थापण्याच्या मधे अडथळे येत होते आणि त्याचा फायदा ते घेण्याचा फुटकळ प्रयत्न करू शकत असले तरी). आता अरूण जेटली का सुषमा स्वराज नेते होतात ते पहावे लागेल (यातील कोणी लोकसभेत निवडून आले आहे का?) नाहीतर भाजपाला त्यांचा कोणी तरी "सीताराम केसरी" शोधावा लागेल :-)
- थोडक्यात वरील दोन मुद्यांवरून काँग्रेस आणि भाजपाच्या बाबतीत एक इंग्रजी सुविचार आठवला: In prosperity caution, in adversity patience. बर्याचदा राजकारण्यांना यातील कॉशन आणि पेशन्स दोन्ही गोष्टी योग्य वेळेस वापरणे अवघड जाऊ शकते असा इतिहास आहे. (अर्थात तरी भाजपाने २ जागांवरून इतकी मजल मारली आहे हे विसरता येत नाही आणि काँग्रेस संपली म्हणत परत वर आली हे देखील... )
जाता जाता एक १९८५ च्या लोकसभेच्या निवडणूकीनंतर झालेली (आणि मी वाचलेली) गोष्ट सांगतो. या निवडणूकीने पण बरेच इतिहास केले होते: शिख दहशतवादाचे भूत डोक्यावर असताना, पंतप्रधानांची हत्या होऊन देखील सैन्य अलीप्त राहीले आणि जनतेने देखील इंदीराजींच्या पश्चात मतदान करत परत काँग्रेसला निवडून दिले.
तर अशा या १९८५ च्या निवडणू़कीत ३/४ जागा मिळाल्याचा इतिहास करणारे राजीव गांधी संसदेत मधल्यावेळात जात असताना, विरोधी पक्षातील मधू दंडवत्यांना म्हणाले की हे उरलेले (१/४) बाक पण आम्ही पुढच्या निवडणूकीत मिळवू. दंडवते हसले आणि राजीव गांधींच्या पाठीवर थाप टाकत म्हणाले, "अजून लहान आहात..." अर्थात राजकारणात अननुभवी आहात असे म्हणायचे होते. १९८९ साली काय झाले हा इतिहास आहे. आणि त्यानंतर संपूर्ण भारतीय राजकारण कसे बदलत चालले आहे हा देखील वर्तमान इतिहासाचा भागच आहे. मात्र त्यावरून जेंव्हा राजकारणी शिकत नाहीत आणि परत परत तसेच वागतात, तेंव्हा राजकारणातील अनुभव असून देखील दंडवत्यांच्या "अजून लहान आहात" या संज्ञेस आजचे राजकारणी पात्र आहेत असेच म्हणावेसे वाटते.
वाचने
6731
वाचनखूण
प्रतिक्रिया
23
थोड्क्यात
छान आढावा
आढावा आवडला.
In reply to आढावा आवडला. by सहज
मतदान ७०
In reply to आढावा आवडला. by सहज
तात्यांनी
आढावा छान घेतला आहे.
लेख आवडला.
पन
In reply to पन by यन्ना _रास्कला
येनार येनार ....
In reply to येनार येनार .... by कुंदन
शन्का
काही उत्तरे, थोडा आशा-निराशेचा खेळ
- गेल्या ३-४ निवडणूकांचा एकत्रित विचार करता असे दिसते की काही (अल्प)प्रमाणात जनता नक्कीच राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय विचार करत मतदान करत आहे.
- (सत्ताधारी, विरोधक, हरलेल्या, जिंकलेल्या) राजकीय पक्षांना पण चौकटीच्या बाहेर जाऊन विचार करावा लागेल. राजकारणात राजकारण ठेवावे लागेलच पण ते ठेवताना कोतेपणा आणि स्वार्थ जर वाढू लागला तर अंतर्गत लाथाळ्या, जनतेपासून दुरावा, आणि इतर अनेक कारणाने पूर्ण सत्ताभ्रष्ट होऊ शकतो हे समजेल.
- एक उदाहरण म्हणून देतो: मला वाटते ९९ च्या निवडणूकीत गुरूदास कामत हे मुंबईतून हरले. तरी देखील त्यांनी जनसंपर्क सोडला नाही. आणि जेंव्हा निवडणूका आल्या तेंव्हा त्याचा वापर करायला देखील ते मागे पडले नाहीत आणि म्हणून मग ते पडले नाहीत :-) थोडक्यात जनसामान्यांशी संपर्क ठेवणे हे महत्वाचे आहे निवडून गेल्यावर अथवा हरल्यावर देखील...
निराशजनक...- इतका मोठा अतिरेकी हल्ला होवून देखील मतदान कमी होणे (जिंकले कोण हा मुद्दा येथे महत्वाचा नाही), ह्यातून जनता अजूनही तामसी आहे असे वाटते. (उदास म्हणत नाही, कारण यात उदासीनतेपेक्षा तामसिकता जास्त वाटते).
- निवडणूका झाल्यावर जसा वर म्हणल्याप्रमाणे राजकारण्यांना जनसंपर्क करावा लागतो तसेच निवडून गेलेल्यांशी संपर्कात राहून त्यांचे काम चालू आहे का नाही हे समजावून घेण्यासाठी स्थानीक "वॉच डॉग" संस्था तयार करून त्यातून जनतेला जागृक आणि राजकारण्यांवर अंकुश ठेवण्याची प्रथा चालू होणे हे अतिशय महत्वाचे आहे असे वाटते. पण ते होईल असे वाटत नाही, कारण त्यात दिसणारे सामाजीक परीणाम हे लगेच नसून दूरगामी असतात...
असो.मतदान
In reply to मतदान by यन्ना _रास्कला
द्या टाळी!
In reply to मतदान by यन्ना _रास्कला
प्यान कारड कँसल कराव
In reply to प्यान कारड कँसल कराव by कुंदन
जबाब
आढावा
In reply to आढावा by स्वाती दिनेश
असेच म्हणतो !
छान
In reply to छान by ऋषिकेश
म्हणूनच
विकास! २००९
लेख आणि प्रतिसाद
मतदान कमी
In reply to मतदान कमी by विजुभाऊ
हम्म