आताच एका काथ्याकुटाच्या निमित्ताने लालु यादव आणि भारतीय रेल्वेविषयी चर्चा वाचनात आली. भारतीय रेल्वे फायद्यात आणल्यामुळे लालु यादवना बरीच प्रसिद्धी मिळाली असली, तरी बर्याच लोकांमध्ये रेल्वेने नक्कि कोणती धोरणं बदलली आणि कशी ? याविषयी अनभिज्ञता दिसली. म्हणूनच, काही दिवसांपूर्वी वाचनात आलेल्या एका लेखाचा दुवा खाली देत आहे:
http://www.american.com/archive/2009/the-indian-railway-king
हा लेख भारतीय रेल्वेतील गेल्या काही वर्षांतल्या बदलांचा चांगला आढावा घेतो, असं मला वाटतं.
इथे नमूद करण्यासारखी एक गोष्ट म्हणजे, लालु यादवांनी राबवलेली काही धोरणं नितीश कुमारांच्या कारकिर्दीतच ठरवली गेली होती. पण ती राबवली जाउ शकली नव्हती. तसेच, लालु यादवना कितीही विरोध केला तरी रेल्वे मंत्रालयात कारभार हाकण्यासाठी योग्य व्यक्तिची निवड केल्याबद्दल त्यांना श्रेय द्यावचं लागेल!
याविषयी मि.पा. करांची मतं जाणून घ्यायला आवडेल.
मुशाफिर.
अवांतरः जिज्ञासूंनी खालील दुवाही अभ्यासावा: http://siteresources.worldbank.org/INTSARREGTOPTRANSPORT/2045703-113566…
वाचने
3692
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
अनभिज्ञता???
अनभिज्ञता.....
In reply to अनभिज्ञता??? by कुंदन
दुव्याबद्
काही गोष्टी आक्षेपार्ह
छान
- Lalu may have been corrupt, but he was also a laugh riot. (म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे?)
- Even then, Lalu commanded enough of a following among his coalition of “extremely backward castes” (or, in the wonderful semiofficial abbreviation, “EBCs”) and desperately poor Muslims to secure a role for himself in India’s 2004 Congress Party government. (EBC - म्हणजे extremely backward castes का
- economically backward castes?)
- ndian Railways was in trouble: in 2001, a report by the BJP—a government dominated by the Brahmins who are Lalu’s permanent foes—predicted it would hemorrhage cash at a rate of $12 billion annually by 2015. ("डॉमिनेटेड बाय ब्राम्हिन्स" - हा काय प्रकार आहे? ते खरे आहे का हा प्रश्न जरी बाजूस ठेवला तरी याचा संबंध काय?)
बाकी बरीच टिका दिसली:- Inside, the conditions do not inspire confidence. The building is big, disordered, and honeycombed with offices that bear stultifying bureaucratic titles (“Manager, Zonal Railways, Deputy”). The hallways all have torn-up ceilings. Some are so dark that I have to use a pocket flashlight to read names on the doors, and inside the offices the level of technology is shockingly low.
- Those who do work encounter predictable bureaucratic headaches...
वगैरे वगैरे... बाकी एक गोष्ट मला वर वर वाचताना दिसल्याचे आठवत नाही. रेल्वेला नफ्यात आणण्यासाठी ज्या काही गोष्टी लालूंनी केल्या त्यात मालवहातुकीवर प्रत्येक डब्यात किती टन वजन असायचे जे रेल्वेच्या सेफ्टी डीझाईनप्रमाणे ठरते ते त्यांनी वाढवले. का तर त्यामुळे जे जास्त वजन घेऊन भष्ट्राचार करत होते त्याला आळा बसला. आणि जास्तीचे वजन (जे आधी बेकायदेशीर होते, ते) कायदेशीर झाले! त्यातून भरपूर पैसा रेल्वेला मिळालाच. तरी देखील हे कसे वाटते?: पाकीटमारांना पोलीस पकडतात आणि त्यांच्याकडून पैसा घेतात, तेंव्हा पाकीटमारी कायदेशीर करा फक्त त्यात मिळालेल्या पैशावर कर भरला म्हणजे झाले. मग गुन्हेगारी कमी आणि भ्रष्टाचार कमी म्हणायला मोकळे!विकास, आपण
In reply to छान by विकास
धन्यवाद
In reply to विकास, आपण by नितिन थत्ते
श्रेय वर
In reply to धन्यवाद by विकास
वास्तव
In reply to श्रेय वर by नितिन थत्ते
वास्तववाद
In reply to वास्तव by विकास
नाही.
In reply to वास्तववाद by नितिन थत्ते