Skip to main content

म्हाळसाक्का..२

लेखक प्राजु यांनी शुक्रवार, 04/09/2009 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
म्हाळसाक्का.. भाग १ "मावशे, कोन गं तू?" त्याने तिच्याकडे कृतज्ञतेने पहात विचारले.. "मावशी म्हनालास नव्हं.. मंग मावशीच म्यां." बेफिकीरीने ती म्हणाली. तिचं वागणं बुचकळ्यात टाकणारं आहे असं त्याला वाटून गेलं. *********** तो तिच्याकडं बघतच राहिला. म्हाळसाक्कानं त्याच्या पुढतला वाडगा उचलला आणि मागे निंबोर्‍या जवळ असलेल्या मोरीपाशी नेऊन धुऊन आणला आणि पुन्हा कोंडाळात ठेऊन दिला. तो तिच्या भराभर होणार्‍या हलचालींकडे बघतच राहिला.

(दगड)

लेखक ब्रिटिश यांनी शुक्रवार, 04/09/2009 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
सनक : http://www.misalpav.com/node/9230 डोक चालवल तरी समजत नाय डोल फारुन बगल तरी दिसत नाय वारा दीसतो क ? तरी हाय ना मंग तसाच द्येव बी हाय हे ठोकून सांगनार्‍या म्हाराजांच्या, बुवांच्या आनी भगवी कापडवाल्याच्या मतावर विश्वास टाकुन मी समोरच्या दगडाला डोक टेकुन पाया परलो न माजी न माज्या फॅमीलीची जीम्मेदारी त्या दगडावर ढकलून झोपून झेलो.
काव्यरस

बाबासाहेब ते भैय्यालाल...

लेखक हृषीकेश पतकी यांनी शुक्रवार, 04/09/2009 15:30 या दिवशी प्रकाशित केले.
खालील कविता दि. ४-१२-२००६ रोजी केली आहे... या कवितेतील काही जातीवाचक शब्द कुणाच्याही भावना दु़खावण्याच्या हेतूने वापरले नाहीयेत... महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात नैतिक मूल्यांची होळी होत असताना... मीही तुमच्यासारखाच निद्रिस्त... तेव्हा तुमच्या आमच्यातल्याच चार जीवांना समाज दूर सारत होता | आणि रिकामं डोकं नसलेला प्राणी म्हणून आपली ओळख जपणारा...
काव्यरस

औडिओ कसेट्स मधील ध्वनीमुद्रणाचा कायाकल्प (!)

लेखक वारकरि रशियात यांनी शुक्रवार, 04/09/2009 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
रामराम मंडळी, जवळजवळ दररोज मिपा वर वाचनमात्र असतो, पण आज बर्याच दिवसांनी येथे लिहितो आहे. माझ्या संग्रही काही दुर्मिळ - लाइव्ह ध्वनीमुद्रणे आहेत. (उदा. मालिनीबाईंची सातारा येथील मैफल, गजाननबुवांचे व्हायोलिन इ. तसेच काही अधिकारी व्यक्तींची गीता, भागवत इ. वरील प्रवचने ) पण ही सर्व ध्वनीमुद्रणे जुन्या काळातली असल्याने औडिओ कसेट्स वर आहेत. अनेकवार वाजवून आणि कालमानाने हळूहळू या औडिओ कसेट्स खराब होत जातील. त्यांचे दीर्घकाळ जतन व्हावे व आस्वाद घेता यावा म्हणून अधिक खराब होण्यापूर्वी ही सर्व ध्वनीमुद्रणे सी.डी. वर घ्यावीत असा विचार आहे. मला या तंत्राविषयी काहीच माहिती नाही.

नाडी अनुभव -स्फुट

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी शुक्रवार, 04/09/2009 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
केवळ तुमच्या अंगठयाच्या ठशावरून काढलेल्या नाडीपट्टीत तुमचे नांव, तुमच्या बायकोचे नांव, तुमची कुंडली, तुमचा वर्तमान काळ, भूत, भविष्य सर्व काही कस काय सापडत ब्वॉ? दक्षिण भारतातील हे नाडीग्रंथ महाराष्ट्रातही आले आहेत. २०-२२ ठिकाणी ही नाडीकेंद्रे जोरात चालू आहेत. उपलब्ध माहितीनुसार गेल्या एक वर्षात दक्षिणेकडून आलेली अशी पाच केंद्रे पुण्यात कार्यान्वित झाली आहेत. प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी तेथे भेट दिली असता तेथील माहितीपत्रकानुसार अंगठयाचा ठसा वा पत्रिकेवरुन नाडी पटटी शोधून व्यक्तीचे नांव, आईवडिलांचे नांव, पति/पत्नी, व्यवसाय, भावंड, संतती इ. खुलासा केला जातो.

निर्गेन्द्वो इन आफ्रिका

लेखक ऋषिकेश यांनी शुक्रवार, 04/09/2009 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
काल पुन्हा एक न कळणार्‍या भाषेतला (खरंतर भाषांतला) चित्रपट बघितला आणि पुन्हा एकदा भाषेपलिकडच्या निव्वळ भावनांचा आस्वाद घेता आला. याआधीही अनेकदा झालं आहे आणि याहिवेळी पूर्ण भारावलो आणि घरच्यांना हीच एक कथा दहादा सांगूनहि समाधान झालं नाहि. कोणाला तरी सांगावं असंच वाटत राहिलं म्हणून तडक मिपावर लिहायला बसलो. तर मी काल बघितला २००२ चा ऑस्कर विजेता चित्रपट "निर्गेन्द्वो इन आफ्रिका". वंश, वर्ण, देश, संस्कृती यांच्या सीमा भेदणारा आणि स्वतःबरोबर प्रेक्षकाच्या मनातील कुंपणांनाहि हलवून सोडणारा हा एक चित्रपट.

मी पण पळणार...

लेखक विमुक्त यांनी शुक्रवार, 04/09/2009 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
"डॉक्टर, मला पेनकिलर नका देऊ... मला वेदना सहन करायच्या आहेत..." असं माझ्या मित्राचे बाबा डॉक्टरला सांगत होते. ७१ वर्षांचे आहेत ते. ६ महिन्यापुर्वी पळत असताना पायतपाय अडकून पडले. उठायचा प्रयत्न केला पण डावा पाय टेकवताच येईना. मग कसेबसे स्कूटर चालवत घरी पोचले. दोन दिवस वेदना अजीबात कमी झाल्या नाहीत. डॉक्टर कडे गेल्यावर कळालं की डाव्या पायाचं achilles tendon तुटलयं. डॉक्टरच्या सल्या नुसार ऑपरेशन केलं. त्यांनी ऑपरेशन नंतर पेनकिलर घेतल्या नाहीत. म्हणाले... "पूर्वी युध्दात मावळे जखमी होत असणार... मग उपचाराच्या वेळी ते कुठे पेनकिलर घ्यायचे? बघू तरी किती सहन करु शकतो ते...".

पोवाडा - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा - राज ठाकरेंचा

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 03/09/2009 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
पोवाडा - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा - राज ठाकरेंचा सदर पोवाडा हा चालीत म्हणण्यासाठी काही ठिकाणी काही शब्दांची द्विरुक्ती होवू शकते. (पोवाडा वाचतांना मागे डफ वाजतो आहे अशी कल्पना करा.) स्टाँग डिस्क्लेमर: माननिय बाळासाहेबांचा व राज ठाकरेंचा मी आदर करतो व यात आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही. तत्राप कोणाला कोणतेही आक्षेप असतील तर हा पोवाडा माझा वैयक्तिक समजावा.
काव्यरस

इश्वर .....

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी गुरुवार, 03/09/2009 19:59 या दिवशी प्रकाशित केले.
...इश्वर हा पुस्तकातला.. धर्मग्रंथांतून वर्णन केलेला.. संतमहात्म्यांनी.., महान त्तत्ववेत्यांनी.. ज्याची ग्वाही दिलेली आहे असा.. इश्वर नावाचा शब्द आहे...! इश्वर नव्हे...!! आता त्याच्या अस्तित्वाचे यांनी दिलेले दाखले आपण खरे मानून चालणार असू.. तर मग प्रश्नच संपला.....!!!