Skip to main content

अभिनंदन : कृष्णा पाटील

लेखक संदीप चित्रे यांनी शुक्रवार, 22/05/2009 या दिवशी प्रकाशित केले.
माउंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई -- वय वर्षे १९ फक्त ! एक इतिहास रचला गेलाय !! हार्दिक अभिनंदन !!! --------------------- या निमित्ताने मुलींच्या गिर्यारोहणाला अजून चालना मिळावी या शुभेच्छा. आमचा एक मित्र म्हणतो प्रत्येकाने एकदा तरी गिर्यारोहण करून पहावे -- जगण्यातली एरवी मोठी वाटणारी संकटं म्हणजे साध्या कटकटी वाटायला लागतात ! कृष्णा पाटील यांचे त्रिवार अभिनंदन. कुणी मिपाकर त्यांच्या परिचयाचे असतील तर जरूर शुभेच्छ कळवाव्यात.

वाचने 4125
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

अभिनंदन काही लि॑क आहे का बातमीची?

माउंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाईबद्दल कृष्णा पाटील यांचे हार्दिक अभिनंदन!

एकदम कौतुकास्पद कामगिरी आहे. एक प्रश्न: मराठी मुलगे एव्हरेस्टवर गेले आहेत का? की प्रथमच मराठी झेंडा एव्हरेस्टवर फडकला?

In reply to by विकास

१९९७ मध्ये बहुतेक पुण्याचा सुरेंद्र चव्हाण ( नाव बहुतेक योग्य आहे !!) टेल्को .... एव्हरेस्ट सर करणारा मराठी वीर... _____________________________ आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

In reply to by विकास

कृष्णा पाटिलचे हार्दिक अभिनंदन ! मराठी एवरेस्टवीर यापूर्वी १९९८ मध्ये सुरेंद्र चव्हाण याने एव्हरेस्ट सर करण्याची कामगिरी केली होती. त्यानंतर २००५ मध्ये कॅप्टन आश्‍विनी सडेकर-पवार हिने लष्कराच्या मोहिमेतून एव्हरेस्ट सर केले होते. बातमी वाचा , सकाळमध्ये अजून एक बातमी त्यांच्या पंक्तीत आता कृष्णा विराजमान झाली. वरील माहिती सकाळच्या बातमीतून साभार. -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

कृष्णाचे हार्दिक अभिनंदन! महाराष्ट्राच्या आणि पुण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोचणा-या महाराष्ट्रकन्येला त्रिवार मुजरा! क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** अग्निसखा

पुण्याचे आणी महाराष्ट्राचे नाव उंचावणार्‍या जिगरबाज कन्येचे हार्दिक अभिनंदन. :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

कृष्णा पाटीलचे हार्दिक अभिनंदन. बारा वर्षापूर्वी आमच्या संस्थेने ( शिवशक्ती प्रतिष्ठान, एरंडवणे, पुणे - ४ ) लहान मुलांकरता जी गिर्यारोहणाची शिबीरे घेतली होती त्यामध्ये कृष्णा पाटीलने सहभाग घेतला होता. आमच्या संस्थेला तिचा अभिमान आहे.

कृष्णाचे अभिनंदन आणि कौतुक तिला सहाय्य करणार्‍यांचे आणि तिला पूर्ण पाठिंबा देणार्‍या तिच्या घरच्यांचेही.

कृष्णा पाटीलचे हार्दिक अभिनंदन. सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)

कृष्णा पाटीलचे आणि तिच्या घरच्यांचेही हार्दिक अभिनंदन. तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! --शाल्मली.

कृष्णाचे मनापासून अभिनंदन. कौतुक तिला सहाय्य करणार्‍यांचे आणि तिला पूर्ण पाठिंबा देणार्‍या तिच्या घरच्यांचेही. सहमत. तिच्या घरच्यांचेही अभिनंदन.