मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जमा खर्च

विशाल कुलकर्णी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
त्याच्या समाधीवरची फुले समाधीवर उधळलेला गुलाल... सोबत, रंग उडालेले; फिकुटलेले कुंकू, तिच्या कपाळावरले..... तिने ढाळलेली असंख्य कढत कढत आंसवे! त्यावर तिच्या वाट्याला,... सहानुभूतीचे फक्त कोरडे शब्द; त्याच्या हौतात्म्याची किंमत म्हणून.... !! ह्या बलिदानाचा जमाखर्च कधी लागणार? सुकल्या आंसवांशिवाय तिच्या ओच्यात काहीच नाही का पडणार?........ विशाल

वाचने 1349 वाचनखूण प्रतिक्रिया 4

आनंदयात्री 22/05/2009 - 12:05
पहिले कडवे छानच जमलेय .. पकड घेते !!

परिकथेतील राजकुमार 22/05/2009 - 14:28
ह्म्म्म्म्म्म्म एक वेगळ्याच विषयाला हात घालणारी दाहक कविता. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

जागु 22/05/2009 - 14:33
त्याच्या समाधीवरची फुले समाधीवर उधळलेला गुलाल... सोबत, रंग उडालेले; फिकुटलेले कुंकू, तिच्या कपाळावरले..... विशालदा, हे जास्त आवडले.

क्रान्ति 22/05/2009 - 15:53
तिने ढाळलेली असंख्य कढत कढत आंसवे! त्यावर तिच्या वाट्याला,... सहानुभूतीचे फक्त कोरडे शब्द; त्याच्या हौतात्म्याची किंमत म्हणून.... !! सुन्न केलं कवितेनं. अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारी कविता. क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** अग्निसखा