Skip to main content

वैशिष्ट्यपुर्ण तारीख : ०९/०९/०९

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 08/09/2009 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
वैशिष्ट्यपुर्ण तारीख : ०९/०९/०९ * हि तारीख ०९ सप्टेंबर २००९ ला, उद्या येते आहे. हा वर्षाचा २५२ वा दिवस आहे. २५२ च्या आकड्यांतली बेरीज ९ येते आणि ०९/०९/०९ ची बेरीज = ९+९+९=२७=९ ! * ०९/०९/०९ ही तारीख १००१ वर्षातली तसेच शेवटची एकेरी तारीख आहे. * हि तारीख सप्टेंबर च्या बुधवारी येते. ईंग्रजीत सप्टेंबर व बुधवार या स्पेलींगमध्ये (September व Wednesday) ९च अक्षरे आहेत. आधार : अर्थातच, आंतरजाळ

केसरिया बालमा... गट्टे की सब्जी

लेखक JAGOMOHANPYARE यांनी मंगळवार, 08/09/2009 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
गट्टे की सब्जी.. ( साहित्य २ व्यक्तीना पुरेसे आहे. लागणारा वेळ- साधारण ४० मिनिटे) १. गट्टे तयार करणे: साहित्य : एक वाटी बेसन, १/२ चमचा मेथी, १/२ चमचा मीठ, १/२ चमचा लाल तिखट, १/२ चमचा जिरे, २ चमचे टोमॅटो सॉस, लसूण पेस्ट १/२ चमचा, आल्याची पेस्ट १/४ चमचा, १/२ चमचा हळद, पाणी वरील सर्व साहित्य एकत्र करावे. त्यात अगदी थोडेसे पाणी घालून घट्ट मळून एक गोळा करावा. साधारण चकलीच्या पिठापेक्षाही थोडे घट्ट मळावे. नन्तर या गोळ्यापासून १/२ इन्च व्यासाचे साधारण ५ इन्च लाम्बीचे लाम्बट आकार हातावर मळून तयार करावेत. एवढ्या साहित्याचे साधारण ४-५ आकार तयार होतील. पाणी उकळ्ण्यास ठेवावे.

फलज्योतिषाची उपयुक्तता

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी मंगळवार, 08/09/2009 09:01 या दिवशी प्रकाशित केले.
युयुत्सु महाराजांच्या या धाग्यातील पहिल्या दोन परिच्छेदाशी आम्ही सहमत आहोत. फलज्योतिषाची काहि लोकांसाठी असलेली उपयुक्तता आम्हाला मान्य देखील आहे. सर्वच ज्योतिषी हे जातकाच्या मानसिकतेचा गैरफायदा घेतात अस सरसकट मी म्हणू शकत नाही. फलज्योतिष हे विज्ञान नसेना का पण उपयुक्त तर आहे? त्याची उपयुक्तता कोणास व कशी यावर ते अवलंबून आहे.

आशाताईंना ७७व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !!

लेखक sujay यांनी मंगळवार, 08/09/2009 08:44 या दिवशी प्रकाशित केले.
८ सप्टेंबर, आज आपल्या सर्वांच्या लाडक्या आशाताईंचा ७७ वा वाढदिवस, त्यांना मिपा परीवारा तर्फे "वाढदिवसच्या हार्दीक शुभेच्छा" ह्या आवाजावर आपल्या सारख्या रसिकांनी निस्सीम प्रेम केलयं आणी करत राहू. आशाताईंची तब्येत अशीच ठणठणीत राहो व त्या शतायुषि होवोत हिच ईश्वर चरणी प्रार्थना .

'नव'कविता

लेखक ऋषिकेश यांनी मंगळवार, 08/09/2009 01:17 या दिवशी प्रकाशित केले.
नव्या मनुची नवी माणसे, नवहृदयाची नवभाषा नवे रंग हे नवीच आशा, नवक्षितिजे अन नव्या दिशा नवजीवनाच्या रांगोळीत हे, भरून टाकशी रंग नवे सुखदु:खाच्या ठिपक्यांमधली, जागा भरूनी काढू सवे शरद नको अन ग्रीष्म नको हो, वसंत तो झालाच जुना नव्या ऋतुची नवी पालवी, त्यावर अपुल्या पाऊलखूणा गाऊ आपण गीत नवे, तो राग नवा, हा ताल नवा नव्या बंदीशी, नवीन भाषा, अपुला गावा ख्याल नवा अपुले असतील प्रश्न नवे, उत्तरे नवी, अन चुका नव्या नव-वाटेचे नवीन फाटे, ध्येय नवी अन दिशा नव्या वळूनी बघता पाठीमागे, आठवणींचा गोफ दिसे किती भासले सुंदर तरीही, गोफ नसे ते जाल असे हातामध्ये हात देऊनी, चल टाकू पाऊल पुढे नवपर्वाच्या सुरवातीला

मिरजेत दंगल , कारण..

लेखक ओंकार देशमुख यांनी मंगळवार, 08/09/2009 00:51 या दिवशी प्रकाशित केले.
http://pune-marathi-blog.blogspot.com/2009/09/blog-post.html मी १० वीत असताना वडीलांची बदली मीरजेत झाली त्यामुळे तीकडे जाण्याचा योग आला. मुस्लीम बहुसंख्य असलेलं मीरज हे अत्यंत बकाल शहर आहे. लहान रस्ते , मधे फ़िरणारी जनावर , कत्तलखाने , चौका चौकतले दर्गे आणि लहान गल्या असं लहान शहर..म्हणायला इथे एक ब्राम्हण आळी आहे.

समिधा

लेखक क्रान्ति यांनी सोमवार, 07/09/2009 19:23 या दिवशी प्रकाशित केले.
उभ्या जन्मात मी बहुधा तुझ्या यज्ञातली समिधा || कधी मी सावली झाले तुला ग्रीष्मात जपणारी तुझ्या बहरात मी झाले कळी गंधात रमणारी बहरले धुंद मी कितीदा तुझ्या यज्ञातली समिधा || कधी अभिसारिका झाले, प्रिया झाले, सखी झाले रमा नारायणाची, शंकराची पार्वती झाले कधी कृष्णा तुझी राधा तुझ्या यज्ञातली समिधा || तुला पाहून माझ्या अंतरी प्राजक्त दरवळतो कुठेही जा, तुझ्यासाठीच माझा जीव घुटमळतो प्रिया, तू सूर्य मी वसुधा तुझ्या यज्ञातली समिधा ||
काव्यरस

गोष्टी योगायोगाच्या

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 07/09/2009 18:06 या दिवशी प्रकाशित केले.
रत्नागिरीच्या दौऱ्याविषयी गेल्या वेळी लिहिलं होतं. याच प्रवासात आणखी एक गंमत घडली. "मोकळे' होण्यासाठी आम्ही मलकापूरच्या पुढे एका ठिकाणी सहज थांबलो. शेजारीच एक छोटा ओहोळ आणि त्यावर पूल होता. पलीकडे एक छोटीशी टपरी होती. अचानक हर्षदाला आठवलं, "अरे, रत्नागिरीच्या पहिल्या दौऱ्याच्या वेळी आपली एसटी इथेच बंद पडली होती!' मीदेखील आसपास पाहिलं आणि ओळखीच्या खुणा पटल्या. तीच छोटी टपरी, तोच सुनसान रस्ता आणि तेच वळण. लग्नानंतर पहिल्यांदा रत्नागिरीला गेलो, तेव्हाच्या प्रवासात आमची रात्रराणी बंद पडली होती तिथे. पहाटे चारचा सुमार असेल. अंधुकसं फटफटलं होतं. गाडी काही लवकर दुरुस्त होणार नव्हती.

(घजळ )

लेखक चेतन यांनी सोमवार, 07/09/2009 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
यशोधरांची सुंदर गझल http://misalpav.com/node/9264 वाचून मला ही लिहावसं वाटलं :& ~X( ~X( ~X( असे चोंदले, राहिला श्वास नाही घसे शेकले, थांबला त्रास नाही उरी कोंडला, पूर बेभान सारा असो भेसुरा! कोरडा खास नाही मला धाप लागे, उरी दाटल्याने कुणा हाक देईन, आवाज नाही किती क्षोभ नाकातुनी शेंबडाचा मिळाली सर्दी साथ, आराम नाही जसे होतसे प्राण नाकात गोळा जरी पाहिजे, मोकळा श्वास नाही किती झीट झाले, तरी पार नाही उतारे ठरे फोल ईलाज नाही चेतन अवांतर: कधीपासुन ही सर्दी काही पाठ सोडत नाही आहे.
काव्यरस