लेखकवि_जययांनी सोमवार, 07/09/2009 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
प्रविण महाजन, श्वेता परुळेकर, आणी आता संजय घाडी, संजना घाडी
'नव' निर्माण होण्यापुर्वीच राजसाहेबांचे नवे नवे खंदे शिलेदार बाहेर पडतायत..
काय वाटत मिपाकरांना?
राजसाहेबांच काही चुकतय?
लेखकविनायक प्रभूयांनी सोमवार, 07/09/2009 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
खुप दिवसांनी रिकामा वेळ मिळाला.
९.३० वाजेपर्यंत झोप काढली.
दादरला जायचे होते.
पण ते दुपारी ३ नंतर.
त्यामुळे आता करायचे काय हा प्रश्न उभा राहीला.
'सर्वसाधारण गृहस्थ 'ही भुमिका निभावुया आज असे वाटले.
हातात झाडु घेतला.
घरातली जळमटे कढली.
जास्त नव्हती.
लगेच आटोपले.
संडास बाथरुम पावडर टाकली.
रद्दी विकुन आलो.
ट्युबलाईट बदली केली.
ब्रशने संडास बाथरुम साफ केले.
जवळ जवळ १० वर्षाने 'नॉर्मल हजबंड' ची कामे करताना बघुन सौ.
लेखकपाऊसवेडीयांनी सोमवार, 07/09/2009 10:52 या दिवशी प्रकाशित केले.
एका रविवारी माझ्या साप पकडण्याची सुरुवात होणार हे एकदाचे ठरले आणि मग त्या रविवार पासून दर रविवारी खूप छानआणि खुंपच वेगेळे म्हणजे जे मला वाटत होते त्यापेक्षा वेगेळे अनुभव आले त्यातलेच मी काही मी तुम्हाला सागणार आहे पहिल्याच दिवशी मी गेले होते तेव्हा मला सापाचा स्पर्श कल्पनेतच होता कारण याआधी मी कधीही सापाला हात लावला नव्हता. पहिल्या दिवशी सगळ्याच लोकांनी लीम्बुतीम्बुची (पक्षी:माझी) मनसोक्त मजा केली. हे कोण नवीन ?? साप पकडायला शिकायचंय का??
लेखकफ्रॅक्चर बंड्यायांनी सोमवार, 07/09/2009 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
जगणार्याला मरणाची ओढ
अन मरणार्याला जगण्याची ओढ
नास्तिक म्हणुन जगलो आयुष्यभर
म्हातारपणी आता मला देवघराची ओढ
नाही साधले काहीच फिकट जगुन
कापसाला आता मात्र वातीची ओढ
आयुष्य गेलो मुडद्यासारखे जगत
अन माझ्या मुडद्यालाही आता जिवणाची ओढ
दु:खेच आली सदैव नशिबी
माझ्या सुखांना सुद्धा दु:खाची ओढ
सहन नाही होत हे जगणे असले
माझ्या मढ्याला मात्र आता सरणाची ओढ
आठवणींचा किती हा पसारा,
का माझ्या वर्तमानाला भुतकाळाची ओढ
भुतकाळातच रुतुन पडलोय
वर्तमानाला मात्र भविष्याची ओढ
गेल्यावर जगातुन काय उरेल मागे
माझ्या मरणाला आता मागे उरण्याची ओढ
लेखकसुधीर काळेयांनी सोमवार, 07/09/2009 07:59 या दिवशी प्रकाशित केले.
हे मी जो पोलाद कारखाना चालवितो त्यातील विनाखंड ओतकाम (Continuous Casting) करणार्या मशीनवरील छायाचित्र आहे. (पाच स्ट्रँड्स असले तरी चित्रात चारच स्ट्रँड्स दिसत आहेत.) अशी आणखी छायाचित्रे पहायला आवडत असेल तर प्रतिक्रिया, पोस्टहापिस किंवा खरडवही द्वारा कळवा. मला उगीच अशा चित्राद्वारे आपल्याला बोअर करायचे नाहीं. पण दुरून पोलाद कारखाने गोंडस दिसतात म्हणून लिहिले आहे.
इलेक्ट्रिक आर्क फर्नेस, लेडल फर्नेस, कंटीन्युअस कास्टिंग व हॉट रोलिंग असे विभाग आहेत.
सुधीर काळे
लेखकश्रीकृष्ण सामंतयांनी सोमवार, 07/09/2009 07:03 या दिवशी प्रकाशित केले.
"मी कुणालाही सर्व दुःख विसरून पुढे चला असं सल्ला देत नाही.कुणालाही तुमच्या वागणुकीत आता बदलाव आणा असं सांगत नाही.किंवा तुमच्या लक्षात येत असेल ते दुःख् दूर ठेवा असंही सांगत नाही.कारण दुःखाला त्याचा समय दिला गेला पाहिजे.
लेखकप्रभाकर पेठकरयांनी सोमवार, 07/09/2009 00:53 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरहो,
नमस्कार. स्वाईन फ्ल्यूच्या प्रादुर्भावाने बंद ठेवावे लागलेले आपले यज्ञकर्म उपहारगृह आज दिनांक ६ सप्टेंबर २००९ रोजी पुन्हा पुर्ववत सुरू करण्यात आले आहे. आपणा सर्वांस नम्र विनंती आहे की आपल्या सोयी नुसार लवकरात लवकर यज्ञकर्मास भेट देऊन चमचमीत पदार्थांची लयलूट करावी.
धन्यवाद.