दिवाळी म्हणले की लहानमुलांना फटाके, नवीन कपडे, फराळाचे पदार्थ याचबरोबर उत्सूकता असते ती किल्ला बनवण्याची. आजच्या फ्लॅट संस्कृतीतही आपल्याकडे मातीचे किल्ले तयार केले जात आहेत हे विशेष.
काही ठिकाणी ( पुणे , मुंबईकडे ) तयार किल्ले विकत घेण्याकडे कल ( काही अपवाद वगळता) वाढायला लागला आहे. जागेची उपलब्धता हे त्यामगचे मुख्य कारण असावे. पण तरीही तयार किल्ले बनवण्यातली मजा काही वेगळीच.दिवाळीत सांगलीला गेलो असता माझ्या भाच्यांनी ( चि. आदित्य ओगले, चि. श्रीराम ओगले) केलेला हा सिंधुदुर्ग किल्ला.