Skip to main content

रक्तदान महादान आपला प्रतिसाद खुप महत्वाचा

लेखक jaypal यांनी शुक्रवार, 30/10/2009 19:49 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी आत्तच ओ निगेटीव्ह रक्त हवे असल्यचे वाचले आणि वाटले "जे जे आपणासी ठावे , दुस-यासी सांगावे" १.you can visit here = www.indianblooddonors.com OR get info via sms on ur cell ......... type blood (space) STD code (space) blood group (space) your name & send it to 5676775 क्रुपया खरे की खोटे हे तपासण्यासाठी sms करु नका.

(बलुतं)

लेखक चेतन यांनी शुक्रवार, 30/10/2009 16:39 या दिवशी प्रकाशित केले.
कौतुक शिरोडकरांची बलुतं वाचुन एक हि & ही प्रयत्न टारझन रावांस अर्पण ;) तसा अनेकांनी प्रयत्न केला त्याच्या बालिशपणाला आवर घालण्याचा, फसलेल्या स्थळांचा पराक्रम करणार्‍या दादाला सरळ करण्याचा, षडरिपूंनी चढवलेल्या कल्पनांना विडंबनरुपी विरजण घालण्याचा, पण किडे वळवळणारा आणि हो उद्योग जन्मसिद्ध अधिकार्‍यासारखाच... या प्रवृत्तीचे मूळ शोधण्यासाठी ग्रंथसंपदा चाळण्याची गरज नाही.... दहावीला असंख्य कल्पना पुजुनच जन्माला आलाय तो... गटण्यासारखाच... म्हणून तर .... किडे वळवळणारा आणि हो उद्योग जन्मसिद्ध अधिकार्‍यासारखाच... जसा पहिल्यांदा तसाच आताही.......
काव्यरस

नरेंद्र मोदी यांना स्वाइन फ्लू

लेखक मड्डम यांनी शुक्रवार, 30/10/2009 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
नवी दिल्ली गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना स्वाइन फ्लूची लागण झाल्‍याची शक्यता वर्तविली जात असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्‍यात आले आहे. मोदी बुधवारीच रशियाच्‍या दौ-यावरून परत आले असून तेव्‍हापासून त्यांना सर्दी, तापाची लक्षणे आहेत. नरेंद्र मोदी चार दिवसांचा रशिया दौरा करून बुधवारी रात्री परतले आहेत. तेव्‍हापासूनच त्यांना त्रास जाणवू लागला आहे. गुरुवारी दुपारपर्यंत ते आपल्‍या कार्यालयात होते. मात्र त्‍यानंतर ते घरी निघुन गेल्‍यानंतर त्यांच्या तपासण्‍या करण्‍यात आल्‍या. सध्‍या मोदी यांचे तीन दिवसांपर्यंतचे सर्व कार्यक्रम रद्द करण्‍यात आले आहेत.

कलावंताच्या कौतुकाच्या तर्कशास्त्राचे त्रैराशिक

लेखक शरदिनी यांनी शुक्रवार, 30/10/2009 14:28 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या वाडःमयावडीने काव्यलेखनबिखनथोडंफारअस्तंचालू पोटापाण्यासाठीशिकवताशिकवता मात्र हल्ली मजा येत नाही काही मन्जे काहीच भावत नाही , घुसत नाही काळीजफाडून जिभेतूनकौतुकफव्वारे उमटतनाहीत सारंसारं नैराश्यभरं, ओव्हररेटेड गायनवादननृत्य साहित्यसंगीतकला टीव्हीनाटकसिनेमा टेनिससॉकरक्रिकेट ओ व्ह र रे टे ड मिसिंडियामिस्टर्युनिवर्स वर्ल्डकपनोबेलॉलिम्पिकऑस्कर उगवत्या अन मावळत्या तार्‍याबिर्‍यांची व्यर्थ धडपड सौंदर्याचीअन्सुरांचीपूजाबिजा ओ व्ह र रे टे ड गुळ्गुळीतपुरस्कारकोट्यातलेफ्लॅटबीट निवडणुकाबक्षिसंअध्यक्षपदंसंमेलनं जुळवलेलीघडवलेलीहास्यस्पदसमीकरणं नक्कीच ओ व्ह र रे टे ड ते असो... तर आम्च्याइथे
काव्यरस

इंटेक्स मोबाईल

लेखक मड्डम यांनी शुक्रवार, 30/10/2009 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
मला लॅपटॉपवर मोबाईल जीपीआरएसच्‍या माध्‍यमातून इंटरनेट चालवायचे आहे. मी इंटेक्स IN 3080 मोबाईलचा वापर ब्लू टुथच्‍या माध्‍यमातून मोडेम म्हणून करण्‍याचा प्रयत्न करीत आहे. मात्र त्‍यासाठी सिस्‍टम मला मोडेम इन्‍स्‍टॉलेशन करण्‍याची सूचना देत आहे. कृपया Intex IN 3080 या मोबाईलचे मोडेम सॉफ्टवेअर कुठे मिळेल मार्गदर्शन करावे.

अंतरीच्या कळा

लेखक नेहमी आनंदी यांनी शुक्रवार, 30/10/2009 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
नभी आसवांचे तळे दाटलेले मुक्यानेच डोळ्यात पाणावलेले निघालाच त्या आठवांचा फुलोरा कधी साठताना मनी टोचलेले . असे मीलनाने खुशीच्या महाली तरी अंतरीच्या कळा सोसलेले ,, सुखाची करू कामना मी कितीही नशीबात दुःख असे साचलेले न चिता मनी ना जिवाची खुशाली तुला आज मी प्राण हे वाहलेले प्रसन्ना जीके

राजच्या आडून....

लेखक भोचक यांनी शुक्रवार, 30/10/2009 10:42 या दिवशी प्रकाशित केले.
मागे मी माझ्या 'राज ठाकरे आणि प्रसारमाध्यमे' या लेखात हिंदी भाषक प्रदेशातील माध्यमे आणि लोक राजच्या आंदोलनाकडे आणि तद्अनुषांगिक उद्भवलेल्या प्रश्नांकडे कसे पहातात हे लिहिले होते. आता झी न्यूजचा प्रमुख अँकर पुण्यप्रसून वाजपेयी नई दुनियात प्रसिद्ध झालेल्या या लेखात कसे तारे तोडले आहेत ते वाचा. या मंडळींनी राज ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांच्यावर राजकीय टीका जरूर करावी, त्याला काही हरकत नाही.

शक्ती दे! युक्ती दे! (बुद्धीही दे!!)

लेखक दिनेश५७ यांनी शुक्रवार, 30/10/2009 09:38 या दिवशी प्रकाशित केले.
राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या आरोग्य, वीज, पाणी, महागाई, बेरोजगारांच्या समस्या सोडवण्यासाठी शक्ती व युक्ती मिळावी असे श्री विठ्ठल चरणी साकडे घातले आहे, असे राज्याचे (काळजीवाहू) उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. पंढरपूरमध्ये कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री श्री.भुजबळ व त्यांच्या पत्नी सौ.मीनाताई यांच्या हस्ते गुरुवारी पहाटे शासकीय महापूजा करण्यात आली.

जर - तर

लेखक टुकुल यांनी शुक्रवार, 30/10/2009 09:36 या दिवशी प्रकाशित केले.
काही वर्षापुर्वी दुसर्‍या नोकरीतल्या हापिसात बसुन संगणकाशी जुंपलेलो असताना योगेश नि आवाज दिला, "अरे तुझा फोन आहे" मोबाइल असताना मला हापिसात कोन फोन करेल विचार करत मि फोन उचलला.. "हेलो" "मिल्या, शिवा बोलतोय" "*** तु मोबाइलवर फोन का नाही केलास?" "अरे सहज, बघत होतो कि तु नक्की ऑफिसमधेच असतोस कि इकडे तिकडे टवाळक्या करतोस" "झाली का खात्रि? बोल आता" "चल येतोस का घरी, मि निघत आहे आता" "अरे नाही यार, आज थोडा उशीरच होइल, तु हो पुढे" "चल ठीक आहे.. सॉरी यार" "कशाबद्द्ल?" "काही नाही.. सॉरी " "ये येड**, नीट बोलशील का?" " काही नाही रे, सोड.. बर तुला एक मेल केली आहे..