Skip to main content

बाबा कदम कालवश झाले.

लेखक नरेन यांनी बुधवार, 21/10/2009 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
आजचा सकाळ वाचताना बातमि कळाली मराठि साहित्यातील थोर कादम्बरीकार बाबा कदम कालवश झाले आमचि विनम्र आदरान्जली.

दुरितांचे तिमीर जावो

लेखक मूखदूर्बळ यांनी बुधवार, 21/10/2009 15:56 या दिवशी प्रकाशित केले.
काल आमच्या कडे वीज गेली (वीज म्हणजे याना गुप्ता नव्हे) . गेली म्हणजे काय जायचीच होती. आलेली वीज जायचीच. ते लोड शेडींग का काय ते म्हणतात ना त्याचाच परिणाम. वेळ दिवेलागणीची होती हे मूद्दाम सांगायला नको. वीज गेल्यावर नेहेमी सारखाच पोरांचा गोंगाट , तरुणांचा चित्कार असे ध्वनी निघाले. घातलेले फाटके बनीयन काढून मी नेहेमी सारखा चाळीच्या पॅसेज मध्ये जाऊन उभा राहीलो. " अहो निदान अंगात कपडे घाला" आमची सौ " अग अंधारात कोण बघतय मला ? " " तुम्हाला काही समजच नाही. आत्ता लगेच दिवे आले तर ? " " अग आत्ताशी कुठे गेले आहेत. येतील सावकाशीने.

लुटा 'लुत्फ' उर्दू गज़ल-अशयारांचा!

लेखक सुधीर काळे यांनी बुधवार, 21/10/2009 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
एका ’इजिप्शियन’ सभासदाने मला अशी सूचना केली कीं मी दर वेळेला नवीन ’धागा’ सुरु न करता एकच धागा सुरू ठेवावा व तिथेच नवीन-नवीन गझला, शेर (खरं तर शेरचे वचन आहे 'अशयार') यांची वेळो-वेळी भर घालत जावे व तिथेच प्रतिसाद येऊ द्यावेत. यामुळे वाचकांना एकच धाग्यामागे जाणे सोपे पडेल व आपोआप चांगल्या शेरांचे एक झकास संकलनही होईल. ही कल्पना मला आवडली व आता हा धागा लोकांना आवडेल तितके दिवस किंवा याहून जास्त चांगली व्यवहार्य कल्पना सुचेपर्यंत चालू राहील. एकच उणी गोष्ट आहे की हा धागा 'ब्रॉडवे'सारखा लांsssब होईल.

दाम करी काम येड्या....

लेखक ऋषिकेश यांनी बुधवार, 21/10/2009 10:10 या दिवशी प्रकाशित केले.
घटना १: गावचे पाहुणे थोड्यावेळा पूर्वी आले आहेत.. हातपाय धुवून, चहा मारून फ्रेश झाले आहेत आणि गप्पा टप्पा सूरू आहेत.. यजमानः काय मग? काय म्हणते तुमच्याकडली निवडणूक पाहुणे: मुख्यमंत्री आमचाच! यः हो तुम्ही त्यांच्या गावचे ना! त्यांना फाईट कशी आहे? पा: कसली फायीट, इरोधी बावीस आहेत.. येक बी कामाचा नाय.. यजमान नुसतेच हसतात पा: आता बघा कसंय.. सम्द शेटिंग हाये.. सेटिंग म्हटल्यावर आणखी चार कान टवकारले जातात. यजमान चेहर्‍यावर उसनं प्रश्नचिन्ह आणतात पा: आता बघा.. बावीसातला येकबी मराठा न्हायी.. शिवशेनेनं बामण दिलाय.. त्याला काय मतं मिळणार..

स्वप्न

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 21/10/2009 04:42 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्न
(चाल: एखादी शालेय कविता)
स्वप्नामध्ये आज पाहीले सुंदर खासे तळे
बदक पांढरे, हिरवी झाडे, सुंदर पाणी निळे        || ध्रू ||

पावरफुल्ल तोडी

लेखक अन्वय यांनी बुधवार, 21/10/2009 01:03 या दिवशी प्रकाशित केले.
दुसरे महायुद्ध सुरू होण्याआधी (1933) प्रख्यात शास्त्रीय गायक ओंकारनाथ ठाकूर एकदा युरोपमध्ये संगीत दौऱ्यावर गेले होते. याच दौऱ्यात त्यांना इटलीत जाण्याचा योग आला. मुसोलिनी त्यावेळी इटलीचा सर्वेसर्वा होता. त्याला भारतीय शास्त्रीय संगीत ऐकविण्याची ओंकारनाथांची इच्छा झाली. मुसोलिनीच्या सचिवामार्फत त्यांनी मुसोलिनीला गाणं ऐकविण्याची परवानगी मिळविली. पाच मिनिटात गाणं संपवायचे ही अट होती. पंडितजींनी ती मान्य करून मुसोलिनीसमोर तोडी राग गाण्यास सुरवात केली. वेळ संपत आली; पण मुसोलिनीला गायनाने भारावून गेला होता. त्यानं पंडितजींना खुणेने गात राहायला सांगितलं. तोडी सुरूच होता.

माझी दिवाळी

लेखक दिपाली पाटिल यांनी मंगळवार, 20/10/2009 21:49 या दिवशी प्रकाशित केले.
माझी दिवाळी...अगदी सोनियाच्या पावली आली...आणि खुप मजा पण आली... :) बेसनाचा लाडू चकली - बिनसाच्याची...

(चॅनेल खूप आले, आता बघेन म्हणतो)

लेखक अमृतांजन यांनी मंगळवार, 20/10/2009 18:32 या दिवशी प्रकाशित केले.
स्रोत- नेस्टेड चॅनेल खूप आले, आता बघेन म्हणतो रिमोटच्या कळा ह्या थोडा दाबेन म्हणतो दूर दर्शनाला हा मी बघणार नाही फारच आम्हास सर्वांना बोअर केले म्हणतो बावन्न भाग नाही मी चुकविले बरे का ठोक्याला घड्याळ्याच्या तयार असे मी म्हणतो कार्यालयी आज असा मी उगीच का बसलो? "समुद्र किनारे" ते "पाहिन" खास म्हणतो घरात कुणी नसले, की जल्लोश आनंदाचा फॅशनचा बाजार हा आज बघेन म्हणतो ती चॅनले तेव्हाची चालत रात्रभर होती पाहण्यासाठी ते प्रोग्रॅम झोप टाळेल म्हणतो शुद्ध मनाची माझ्या आता वाट लागली आहे वाया गेलेल्या वेळेची किंमत मोजेन म्हणतो
काव्यरस