ह्या काव्याचे हे एक मुक्त स्वरुप-
लालसर झाल्या त्या जागा
जेथे डासा रे तू मला चावला
उडत ये तसाच गुणगुणूनी
आजच तू या संध्याकाळी...
टायर, डबे, घाण अंगणी
त्यात पाणी थोडे ठेवूनी
तुझिया स्वागताची तयारी
जय्यत करोनी ठेविली...
डोक्यावर तेल लावून,
बसले मी ओट्यावरी
गुणगुण तुझी ऐकूनी
कांती माझी आसुसली...
टचकन तुझी सोंड खूपसुनी
पी हे माझे रक्त लवकरी,
सांग मित्र-सग्या-सोयऱ्यांना...
अधीर ही तनू बावरी..
खाजवू ती चाव्यजागा,
मजाच त्याची निराळी
तुझ्या चाव्यांच्या खूणा घेऊनी
सुज्जित बाला दिसे निराळी...
तुझ्या असंख्य डोळ्यातूनी
ऊडून पहा खालती
लाललालती सुजगर्विता
सभोवतालचे जग हासती...
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2581
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
यमक चांगल
मस्तच रे
:-)
व्वा.
ही ही ही...!!
टचकन तुझी
सर्वांना- व
विडंबन
In reply to सर्वांना- व by अमृतांजन
वर्जीनेटर
In reply to विडंबन by टारझन
वर्जीनेटर
In reply to वर्जीनेटर by अमृतांजन