लालपरी
नवटाक टाकून रावल्याचा रडंवा बाप मुडद्यागत पडायचा. कधीमधी मोकाट सुटलेल्या सांडागत माळरानी तोंड मारायचा पण तरणाबांड रावल्या मात्र तापल्या तव्यावर उताणा पाताणा..
चुलीवर आगीची आन बाजेवर शेजेची वाण होती.
तालुक्याला एष्टी सुरू झाली अन बैलांच नशीब फळफळलं, बाजारी हेलपाटे बंद झाले.
रावल्याच घोडं कुठ पेंड खात होतं कुणास ठाऊक?
मिसळपाव