Skip to main content

सायकल… एक प्रवास, एक विश्व

लेखक Avinash Anushe यांनी रविवार, 25/01/2026 11:47 या दिवशी प्रकाशित केले.
पुणे ग्रँड टूरच्या निमित्ताने पुन्हा एकदा पुण्याच्या आसपासच्या निसर्गरम्य परिसरात झालेला रस्त्यांचा बदल आणि सायकलिंगसाठी निर्माण झालेली अनुकूल परिस्थिती प्रकर्षाने जाणवली. डोंगररांगा, हिरवीगार दऱ्या, तलाव आणि वळणावळणाचे रस्ते यांच्या सान्निध्यात सायकल चालवण्याचा अनुभव खऱ्या अर्थाने वेगळाच असतो. कधीकाळी पुण्याच्या आसपास सायकलिंग करताना मनात नेहमी एक विचार यायचा या सुंदर परिसरात जर दर्जेदार रस्ते आणि सायकलिंगसाठी अधिक सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या, तर पुणेकरांना किती अप्रतिम अनुभव घेता येईल! आज त्या कल्पना प्रत्यक्षात उतरताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर मला माझा सायकलिंगचा प्रवास आठवला.

बांगलादेश

लेखक खटपट्या यांनी रविवार, 25/01/2026 08:18 या दिवशी प्रकाशित केले.
बंगलादेशा ने भारतात सुरक्षेच्या कारणास्तव सामने खेळण्यास नकार दिला म्हणून आता त्यांचा T20 विश्वचषकातला सहभाग जवळजवळ संपुष्टात आला आहे, मुळात बांगलादेशाने भारतात ते सुरक्षित नाही असे म्हणणे म्हणजे एखाद्या वारांगनेने माझे शील तुमच्या घरी आले तर धोक्यात येऊ शकते असे म्हणण्यासारखे आहे, बांगलादेश स्वतःला स्वप्नात अमेरिका, किंवा कॅनडा समजतो की काय? मजा म्हणजे बंगलादेशाच्या खेळाडूंना भारतात सुरक्षित वाटत नसेल तर इतके बांगलादेशी धोका पत्करून भारताची सीमा ओलांडून का येतात? कमीतकमी इथून परत गेलेल्या बांगलादेशी नागरिकांनी तरी त्यांच्या खेळाडूंना सांगावे की बाबांनो भारतात काहीच धोकादायक नाही. तुम्ही खेळ

भूमिगत मेट्रो , नेहरू विज्ञान भवन, नेहरू तारांगण आणि नेहरू केंद्राला भेट

लेखक गोरगावलेकर यांनी शनिवार, 24/01/2026 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
वरळीच्या या ठिकाणांना पूर्वी अनेकदा भेट दिली असली तरी परत एकदा जावेसे वाटत होते . भूमिगत मेट्रोने पहिला प्रवास हे ही मनात होते . या मेट्रोस मुंबई मेट्रो लाईन ३  किंवा अ‍ॅक्वा लाईन म्हणून ओळखले जाते . सरकत्या जिन्याने उतरून छशिमट मेट्रो स्थानकात आलो . खिडकीवर सायन्स सेन्टर स्टेशनचे तिकीट काढले . तिकीट रु . ३ ० /- मात्र . स्टेशन अगदी चकाचक . फलाटावर जाण्याचा मार्ग आणि फलाटावर आज शुकशुकाट .

महामाया निळावंती (ऐसी अक्षरे ३८)

लेखक Bhakti यांनी शनिवार, 24/01/2026 14:25 या दिवशी प्रकाशित केले.
महामाया निळावंती लेखक-सुमेध 1 दोन वर्षांत २५ वी आवृत्ती प्रकाशित झालेली ही मराठी साहित्यातील आताची उत्कृष्ट कादंबरी आहे. जीवनाची लालसा मृत्यूला हरवायला पाहते.

लवचिक 'राज'कारण

लेखक बाजीगर यांनी शनिवार, 24/01/2026 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
आधी रापचीक, आता लवचिक, सत्ते साठी विक, पक्ष निष्ठा || आधी ताताथय्या, काढ एकमेक मैया, आता एक शय्या, विरोधकांशी || सर्व पक्षांची भेळ, ना कुणाचा मेळ, आकड्यांचा खेळ, खुर्ची साठी || पक्षफुटी ची भीती, अनीती हीच रीती, समर्थन शब्द किती, बुडबुडे ||

कुंपण

लेखक रांचो यांनी शुक्रवार, 23/01/2026 18:43 या दिवशी प्रकाशित केले.
खडकवाडीची वस्ती गावाच्या बाहेर नव्हती. ती गावातच होती—पण जिथे रस्ता अचानक अरुंद होतो, तिथे, एका अदृश्य रेषेच्या पलीकडे. इथे सकाळ कोंबड्याच्या आरवण्याने सुरू न होता रिकाम्या हंड्यांच्या आवाजाने होत असे. भांडी एकमेकांवर आपटल्यासारखा आवाज हा पाणी भरण्याचा नव्हे, तर दिवस सुरू झाल्याची खूण देणारा होता. वस्तीकरता एक हौद आणि गावासाठी एक विहीर—अशी पिढ्यान्‌पिढ्यांची रचना होती. ती आता इतकी सवयीची झाली होती की कुणालाच ती प्रश्न वाटत नव्हती. लक्ष्मी रोज पहाटे चारला उठायची. घरात पाणी उरलं नसेल, तर तिला राग येत नसे. राग करण्याची सवयच नव्हती. हंडे आतून धुऊन ठेवायचे.

निष्काम कर्मयोग: आत्ममुक्तीचा मार्ग की शोषणाचा सुसंस्कृत मुखवटा?

लेखक युयुत्सु यांनी शुक्रवार, 23/01/2026 12:12 या दिवशी प्रकाशित केले.
निष्काम कर्मयोग: आत्ममुक्तीचा मार्ग की शोषणाचा सुसंस्कृत मुखवटा? -राजीव उपाध्ये भारतीय तत्त्वज्ञानाच्या परंपरेत काही संकल्पना इतक्या तेजस्वी वाटतात की त्या ऐकतानाच मन आपोआप नम्र होतं. “निष्काम कर्मयोग” ही त्यातलीच एक. फलाची अपेक्षा न ठेवता कर्म करणे, कर्तव्यनिष्ठ राहणे, अहंकार कमी करून समत्वाने जगणे—हे सगळं ऐकायला जितकं सुंदर आहे, तितकंच ते वास्तवात गुंतागुंतीचं आणि कधी कधी धोकादायकही ठरू शकतं. कारण कोणतीही उच्च किंवा आकर्षक कल्पना जेव्हा समाजाच्या असमान रचनेत उतरते, तेव्हा तिचं रूपांतर “आत्मविकासा"तून “सत्तेचं साधन” होण्यात वेळ लागत नाही.

उलाढाल

लेखक अनुस्वार यांनी गुरुवार, 22/01/2026 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
उत्कट, उत्स्फूर्त हे शब्द आणि या भावना आपण विसरत चाललोय का? अनंताची अगाध ओढ असणाऱ्या आपल्या जीवांना सगळं मिळमिळीत का आवडू लागलंय? पाण्याने बोजड झालेले अवाढव्य ढग एकमेकांना घासावेत असं गडगडाटी हास्य कुठे कोसळून कायमचं संपलं? बांध फुटल्यासारखे रडणारे डोळे आता कुठे आहेत? कुठल्या वाळवंटात गडप झाले? चहूकडे फक्त कोरडे डोळे दिसतात - खाली माना घातलेले; लाजेने! वर तरी कुणाकडे पाहतील? सगळ्याच माना खाली असतात. हनुमानाने भक्तीचा पुरावा दाखवायला स्वतःची छाती फाडली होती म्हणतात. इथे स्वतःचा हात स्वतःच्या छातीवर ठेवला तरी ऊर दडपायला होतं. अंत्ययात्राही निघत नाहीत राव आता. प्रेताकडे टक लावून पाहता यायचं.

गझल mashup : insp. Sajan Bendre dedicated to Sumeet Music

लेखक हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर यांनी गुरुवार, 22/01/2026 02:09 या दिवशी प्रकाशित केले.
जायचेच होते दूर तर केलीस सलगी कशासाठी? वाजवलीस अंगावर शहाऱ्यांची हलगी कशासाठी? शेवटचे बोल मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या, नकार देण्याआधी करतेस दिल्लगी कशासाठी? जायचे होते माझ्या लाडीला घेऊन सासरवाडीला, स्वप्नकोंबड्यांवर टाकलीस तू डालगी कशासाठी? फुटक्या तोंडास या, तेरे गली में बघती राठ बाया , दगड व्ह्यायचे सोडून झालीस तू मुलगी कशासाठी? प्रेरणा : https://youtu.be/XfivqjQzu8Y?si=K7ZmBaWFo6e86hDc मूळ थोर लिरिक्ष : बोल मै हलगी बजावू क्या ए माझ्यापेक्षा भारी नाचून दाखवायचं कोण कोण नाचणार ?
काव्यरस

हवी दाद जर का

लेखक नाहिद नालबंद यांनी बुधवार, 21/01/2026 19:11 या दिवशी प्रकाशित केले.
बदललो कधी ना समाजाप्रमाणे सदा वागलो मी मनाच्याप्रमाणे कसा मार्ग चुकला कळेना कुणाला जरी चालले ते गुगलच्याप्रमाणे स्वतःची बनावी इथे खास ओळख कशाला लिहावे कुणाच्याप्रमाणे खरे सांग मित्रा, असा वागला तू कशाला कुणाच्या इशाऱ्याप्रमाणे उगा भावना का दुखाव्या कुणाच्या कला पाहिली जर कलेच्याप्रमाणे लिहाया हवे आणखी चांगले तुज हवी दाद जर का पुण्याच्याप्रमाणे
काव्यरस