Skip to main content

(कोडी)

लेखक चेतन यांनी गुरुवार, 19/11/2009 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
क्रांतीताईंची कविता वाचुन आम्ही काही कोडि सोडवण्याचा प्रयत्न केला प्रत्येक याचकाला केली बहाल थाळी नाहीच जाणले की स्वकीये राहिली भुकेली साधे गरीब भय्ये नव्हतेच त्या दिशेला आधार बिहार्‍यांचा माजोरड्या भिकेला तोंडात तोबरा अन् उध्दट देहबोली एकेक संकटाला आमंत्रणे दिली मी मुंबई-मराठीचीही वाट लावली मी नाही एकत्र मराठी, तू घे भाजुन पोळी" मौनात राहण्याने नुकसान फार केले जाणून आपल्यांनी पाठीत वार केले भाषा असुन मराठी, का हिंदी माय बोली या हिंदीप्रेमी लोकांचा स्वार्थ फक्त होता जाता जिथे, तिथे का भांडुन मार खाता ते वाढवीत गेले, नेत्यात तेढ खाली!
काव्यरस

रगडा पॅटीस

लेखक श्रद्धा. यांनी गुरुवार, 19/11/2009 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : पांढरे वाटाणे १/४ किलो , चिंच ५० ग्रॅम, गुळ २०० ग्रॅम, आले - लसुण पेस्ट ६ साधे चमचे, मिरची पेस्ट १ चमचा, बटाटे मध्यम ५ ते ६ , ब्रेड स्लाइस ४, पंजाबी गरम मसाला ४ साधे चमचे, तिखट (कांदा लसणीचे ) चवीप्रमाणे,मीठ चवीप्रमणे,ह्ळ्द, हिंग, तेल,कांदा चिरलेला - २ वाटी, शेव, कोथिंबीर

सुखांत

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी गुरुवार, 19/11/2009 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या आठवड्यात 'सुखांत' या चित्रपटाच्या निर्मितीच्या निमित्ताने एक दयामरण विषयावर चर्चासत्र कोथरुडच्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात आयोजित केले होते. परिसंवादाला जाईपर्यंत हा चित्रपटावर आधारलेला परिसंवाद आहे हे मला माहित नव्हत. डॊ मोहन आगाशे, लोकसत्ताचे निवासी संपादक मुकुंद संगोराम, साप्ताहिक सकाळच्या कार्यकारी संपादिका संध्या टाकसांळे, पुण्यातील नामवंत डॊ शिरिष प्रयाग, चित्रपटाची कथा, पटकथा व संवाद लेखक किरण यज्ञोपवित, अभिनेते अतुल कुलकर्णी, अभिनेती ज्योति चांदेकर, निर्माती अनुया म्हैसकर उपस्थित होते. परिसंवाद उत्तमच झाला.

<खड्ड्या तुझ्या मिठीत रे....... >

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 19/11/2009 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा : सखये तुझ्या मिठीत..... तुज पाहिल्या क्षणी मी , विरलो जरा तिथेच रस्त्यात होतास एकटा, माणसांच्या या दाटीत रे! कोवळ्या उन्हांत जेंव्हा , होतास तू गढूळलेला ओलांडता कोलमडलो , चिखलाच्या मिठीत रे! अन्दाज सखोलीचा आला मला न केंव्हा सगळे तुझ्यात झाले , आडवे किती पटीत रे ! स्कूटर मोटार सायकल ; ऐसा भेदभाव कधी न झाला सारेच आडवे झाले ; खड्ड्या तुझ्या मिठीत रे गांगरलो असा मी , दणका तुझा देण्याला भिक्कार भीजलेला , कुठल्या चिखलवटीत रे? खणले तुला न कोणी ; शान तू या रस्त्याला तूज मुजवले कोणी नाही ; खलित्यांच्या रेटारेटीत रे हार मानिली सार्‍यानी ; तू तसाच राहिला खड्ड्या सारेच रे पडले ,

मराठी आणि भय्या

लेखक अरभाट आणि चिल्लर यांनी गुरुवार, 19/11/2009 06:35 या दिवशी प्रकाशित केले.
गेले बरेच दिवस मी मिपावर मराठी-भय्या ही चर्चा वाचतो आहे. त्यानिमित्ताने काही लिहावेसे वाटले. ऑस्ट्रेलियामधे किन्वा इतर ठिकाणी भारतिय विद्यार्थ्याना मारहाण झाली म्हणून आपण त्यान्चा लगेच निषेध करतो. भारत सरकारने त्या त्या सरकारना याचा जाब विचारावा अस आपण म्हणतो. अमेरिकेत सिलिकॉन व्हलीत बहुसन्ख्य भारतिय असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. पण त्याचबरोबर भय्या किन्वा परप्रान्तियानी मुम्बैमधे येउन जॉब करु नयेत असही आम्हाला वाटत. आपण म्हणतो कि भय्या लोकान्ची लायकी दूध विकण्याची आहे, मग अस असेल तर आपले जॉब ते पळवतील अशी भिती आपल्याला का वाटते? याचा अर्थ आपल्यामधे काहीतरी कमी आहे.

प्रकाशवाटा...

लेखक विमुक्त यांनी बुधवार, 18/11/2009 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
प्रकाशवाटा वाचलं... डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदा आमटे आणि इतर काही सहकाऱ्यांनी बाबा आमटेंच्या मार्गदर्शनाने सुरु केलेल्या हेमलकशातल्या लोकबिरादरी प्रकल्पाबद्दल हे पुस्तक आहे... हेमलकशातल्या लोकबिरादरी प्रकल्पाचा जन्म का आणि कसा झाला... प्रकल्प सुरु केल्यावर आलेल्या अडचणीं वर मात कशी केली... तिथल्या आदिवासींना स्वयंपूर्ण कसं केलं... जंगली प्राण्यांबद्दलचे अनुभव; त्यांच्या साठी सुरु केलेलं अनाथालय... जिवावर बेतलेले प्रसंग...

कोडी

लेखक क्रान्ति यांनी बुधवार, 18/11/2009 20:03 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येक वादळाला केली बहाल होडी तेव्हाच जाणली मी जगण्यामधील गोडी साधे, सपाट रस्ते नव्हतेच या दिशेला आधार सावल्यांचा झाकोळल्या निशेला पायांत शृंखला अन् वाटाहि नागमोडी एकेक संकटाला आमंत्रणे दिली मी वैशाख-काहिलीचीही वाट पाहिली मी अन् बोलले, "वसंता, तू घे उसंत थोडी!" मौनात राहण्याने नुकसान फार केले जाणून आपल्यांनी पाठीत वार केले माया अजून उरली का काळजात थोडी? या जन्मसिद्ध भोगांचे अर्थ काय होते? जावे जिथे, तिथे का गुंत्यात पाय होते? मी सोडवीत गेले, तू घातलीस कोडी!
काव्यरस