Skip to main content

आठवण

लेखक नेहमी आनंदी यांनी बुधवार, 04/11/2009 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
तुला ते आठवते का सारे? सर्द संध्याकाळी त्या गुंफुनी हात फ़िरलेले तुला ते आठवते का सारे? गर्द चांदण्या आकाशी अन गहिरे ते उसासे तुला ते आठवते का सारे? फुले उमलता प्रितीची मन हळवे झालेले तुला ते आठवते का सारे? पाठमोरा होऊन जाताना पाश सारे तोडलेले तुला ते आठवते का सारे? या देहाच्या धुरातून अश्रु तुझे दाटलेले तुला ते आठवले का सारे? प्रसन्ना जीके १५-१०-०८
काव्यरस

लोटांगण

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 04/11/2009 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
गुरूर ब्रह्मा, गुरूर विष्णू गुरूर देवो सत्यसाईश्वरा धावत आलो दिल्लीवरूनी सरकारा तारा पट्टपुर्थीश्वरा .... विजय जाहला, सत्ता आली 'खाती ' खाती हवी आम्हाला घास मुखीचा निसटू पाहे कृपा असावी पट्टपुर्थीश्वरा ... महान राष्ट्री भाऊबंदकी लोणी हवे सारे आम्हाला सावलीनेच धरला दावा द्या वरदहस्त पट्टपुर्थीश्वरा ... पोहोच तुमची खालवर पुरती हायकमांडही ढाळीते चवर्‍या उद्दंड जाहला जाणता राजा द्या समज त्यासी पट्टपुर्थीश्वरा ... नतमस्तक हो तुमच्यापुढती दास खुर्चीचे पामर आम्ही बुडत्या नौकेस हात द्यावा घ्या दंडवत पट्टपुर्थीश्वरा ... संदर्भ : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्लीवरुन धावत येवुन सत्यसाईबाबांची

बाबर , अकबर , पिअर्स

लेखक आंबोळी यांनी बुधवार, 04/11/2009 10:49 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो, गेले बरेच दिवस पिअर्स साबणाची एक जाहिरात टिव्हीवर दाखवत आहेत. ज्यात "बाबरचा मुलगा हुमायुं... हुमायुंचा ... अकबर" असे वाक्य (कॅची लाईन का काय म्हणतात ते...) आहे. मला इतके दिवसात त्या जाहिरातीचा अर्थ कळालेला नाही. बाबराचा किंवा अकबराचा आणि त्या पिअर्स साबणाचा काय संबंध? बर या कोणी ऐतिहासिक थोर विभुती न्हवेत की ज्यांचे स्मरण करावे वा त्याना आदरांजली द्यावी, त्यांची आठवण रहावी यासाठी हा खटाटोप करायला.

मनसे व सीमावाद धोरण

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 04/11/2009 09:30 या दिवशी प्रकाशित केले.
मनसे व सीमावाद धोरण (डिस्केमर: इतर पक्षांबाबत काही ताशेरे येथे नाहीत पण उगाच वाद नको. इतर पक्षाच्या लोकांनी 'मनसे' ऐवजी त्यांच्या पक्षाचे नाव टाकावे व वाचल्यास हरकत नाही. 'मनसे' ही एक मानवी प्रवृत्ती आहे हे लक्षात घ्या.) (शेवटी सीमावादातले लोकं मराठी आहेत ते महाराष्ट्रात आले पाहीजे. त्यासाठी पक्षविरहीत राजकारण व्हावे ही माझी ईच्छा. पण तसे होणे नाही. मनसेच्या नावातच 'महाराष्ट्र' आहे. म्हणून तो 'सीमावादाला' जवळचा आहे. असो.) मनसे हा मराठी अस्मिता जपण्यासाठी तयार झालेला पक्ष आहे. आतापर्यंतच्या वाटचालीत पक्ष या विचाराला ठिकून राहीलेला आहे.

फॉर हिअर ऑर टू गो!!.. पुस्तक परिक्षण

लेखक प्राजु यांनी बुधवार, 04/11/2009 07:44 या दिवशी प्रकाशित केले.
फ़ॉर हिअर ऑर टू गो!! जनरली कोणत्याही रेस्टॉरंट मध्ये ,खास करून अमेरिकेतल्या बर्गर किंग, वेंडीज, फ़्रेंडलिज अशा उपहार गृहातून हा प्रश्न विचारला जातो. अर्थ साधाच, "इथेच खाणार की घेऊन जाणार?" पण साधारण ४०-४५ वर्षापूर्वी या ना त्या कारणाने देशान्तर करून आलेली मराठी मंडळी.. यांच्याबाबतीत हा प्रश्न तेव्हा ऐरणीवरचा होता. "फ़ॉर हिअर ऑर टू गो??" "इथेच रहायचं की परतायचं?" मिलिंद प्रधान यांनी हे पुस्तक मला पाठवून दिलं आणि झपाटल्यासारखं मी ते वाचून काढलं. लेखिका अपर्णा वेलणकर. बृहन्महाराष्ट्र मंडळानं या पुस्तकाचा प्रकल्प आयोजित केला. काय कारण असावं?

९/११ मधे मारल्या गेलेल्या तरूणाच्या स्मारकावरून वादंग

लेखक हुप्प्या यांनी बुधवार, 04/11/2009 04:23 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.rep-am.com/news/local/447278.txt http://www.wfsb.com/news/21501995/detail.html वरील बातम्या वाचा. थोडक्यात हकीकत अशी. केंट नामक कनेटिकट, अमेरिका येथील एक गाव. तिथला एक तरूण ९/११ च्या हल्ल्यात मारला गेला. त्या गावच्या प्रशासनाने त्या तरूणाचे स्मारक बनवायचे ठरवले. त्याकरिता त्याच्या वडिलांना विचारले की तुमच्या मुलाच्या स्मारकावर काय वाक्य लिहिलेले आवडेल? ते म्हणाले, "असे लिहा, 'जेम्स गेडियल, जन्म ३ फेब्रु.

गाडी रूळावरून सांधे बदलून जाते तेंव्हा..

लेखक बहुगुणी यांनी बुधवार, 04/11/2009 01:53 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरचा लतादीदींवरचा लेख वाचल्यानंतर डोक्यात घुसलेलं 'जो वादा किया वो' आज सकाळी गुणगुणत होतो (बाथरूम मध्ये, दुसरीकडे कुठे आमची हिंमत असायला), आवरून बाहेर गाडीकडे जात असतांना गाण्याच्या शब्दांचं शिटीत रूपांतर झालेलं. गाडी सुरू केली आणि मग पुन्हा (काचा बंद आहेत हे subconsciously लक्षात येऊन!) शिटीवरून पुन्हा शाब्दिक गाण्यावर. फ्रीवेवर गेल्यावर लक्षात आलं की आपण भलतंच गाणं गातोय आता ... 'ये दिल और उनकी निगाहोंके साये...' च्या मारी! हे गाणं कुठून आलं?

सरणार कधी रण?

लेखक शैलेन्द्र यांनी मंगळवार, 03/11/2009 23:18 या दिवशी प्रकाशित केले.
सरणार कधी रण प्रभो तरी, हे कुठवर साहु घाव शिरी.. ह्या ओळी मला नेहमीच एक प्रश्न पाडतात, हे काव्य नक्की पावनखिंडीच्या लढाईबद्दल आहे की जीवनाबद्दल आहे? बाजीप्रभुसारखा वीर अशी कंटाळल्यासारखी भाषा करेल का? 'पावनखिंडीत पाऊल रोवून, शरीर पिंजे तो केले रण... शरणागतीचा अखेर ये क्षण, बोलवशील का आता घरी!' या ओळी लढाईपेक्षाही आयुष्याबद्दल काही सांगतात असे वाटते. मला वाटतं की पावनखिंडीची लढाई हे रुपक वापरुन कुसुमाग्रजांनी जीवनाची लढाई चितारली आहे. मीपावरील जाणकारांनी क्रुपया प्रकाश टाकावा.

दु:ख

लेखक सुवर्णमयी यांनी मंगळवार, 03/11/2009 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
दु:ख स्वतःला वेदना होऊ नये म्हणून प्रयत्न करतात रक्त वाहू नये म्हणून पट्टी बांधतात दु:ख दिसले की त्यावर इलाज करतात सज्जन माणसे! पण लोकांना दु:ख दिसत नाही अथवा बंद डोळ्यामागे जागे असते दु:ख!- इथेच सगळी गोची आहे रक्ताने माखलेले सैनिक आक्रोश करणारी लहान मुले भूकबळी, हुंडाबळी, आत्महत्या करणारा शेतकरी खाटिकाकडे बांधलेली मुकी जनावरे सगळे जेव्हा लोकांसमोर येते तेव्हा शांत झालेले असते सजलेले, सजवलेले , फोटोच्या चौकटीत असते मोहवणारे असते खर आहे- लोक वाईट नसतात, दु:ख चलाख असते!