Skip to main content

श्वास

लेखक नाद्खुळा यांनी गुरुवार, 04/03/2010 16:29 या दिवशी प्रकाशित केले.
कधी मी उरतो ,कधी मी पुरतो एकमेव मी कधी न भुलतो साथ माझी रे जन्मापासुनी मी संपता जीव ना उरतो कधी उश्वास नधी निश्वास नावं माझी अनेक हृदयाशी मैत्री माझी फक्त श्वास म्हणूनच नेक कधी शरीर, कधी काया जेथे मी तेथे माया क्षणार्धात मी सोडूनी जाता नाती गोती सर्वही वाया काळ मी आज मी सुरवात मी शेवट मी अनादी मी अनंत मी दिव्यासारखा तेवत मी दिव्यासारखा तेवत मी

माय मराठी

लेखक नाद्खुळा यांनी गुरुवार, 04/03/2010 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्राने दुसर्यांसाठी दार कायम उघडून दिली उपद्रवी लोण्ध्यानी मराठी मातीच बिघडून गेली धोतर लेन्ग्याची लाज वाटते आज मराठी माणसाला बर्गर चाच वास येतोय मराठमोळ्या कणसाला मराठी मातीतच खेळायचं असं म्हणत बसलो इथच सांगतो मित्रानो आपलं गणित फसलं अटके पार लावलेला झेंडा जरा आठवा टाच मारून याच मातीतून मराठी, गल्ली गल्लीत पोचवा शिवाजी राजे भोसले (चित्रपट) पाहून ३ तास का होईना मन पेटलं मराठी माणूस जागा झाल्याच क्षणभर तरी वाटलं कल्चर बदललं ,लावणी संपली ,पोवाद्याचाही पॉप झाला मराठीच्या मर्म वरती परसंस्कृतीचा आघात झाला द्या पुन्हा गर्जना SS , तोच मर्द मराठी ललकार दरी खोर्याच्या महाभूमिचे स्वप्

बघता बघता

लेखक नाद्खुळा यांनी गुरुवार, 04/03/2010 16:03 या दिवशी प्रकाशित केले.
बघता बघता दिवस सरतात ,लहानाचे मोठे होतो जीवनाच्या वाटेवर मग सुंदर एक क्षण येतो नवे पर्व ,नवी नाती सगळा नवं नवं असतं कुणीतरी अश्यावेळी सोबत हवं हवं असतं क्षितीजामागे सांजवेळी जग अगदी छान दिसतं स्वप्नातल्या राज्यात मग दोघांचं गाव दिसतं सूर मग जुळून येतात, स्वप्नवत होतो आभास हृदयाला दोघांच्या पुरतो एकच श्वास एका प्लेट मध्ये मग भेळ पुरी तिखट असतानाही गोड लागते ती जवळ असताना ,पाण्याविनाच तहान भागते ती च्या ती मध्ये मग माझ्यातला मी असतो तिच्यातल्या तिला पाहताना, माझा मीच हरवून बसतो
काव्यरस

शब्दार्थ हवा आहे.

लेखक अन्या दातार यांनी गुरुवार, 04/03/2010 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. मला कोणी "वितांशक" या शब्दाचा अर्थ सांगू शकेल का? जमल्यास व्युत्पत्तीसुद्धा द्यावी.

मराठी माणूस म्हणजे अशिक्षित, दारूबाज, आळशी, गावठी ???............... का???

लेखक मंगेशपावसकर यांनी गुरुवार, 04/03/2010 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रहो, आमच्या ऑफिस मध्ये घडलेला एक प्रसंग सांगतो. हल्लीच मी माझे टी. वाय. पूर्ण केले व नोकरीच्या शोधात होतो, एका प्रतिष्ठित कंपनीमध्ये जॉबला हि लागलो, पण ट्रेनिंग च्या वेळी आम्हाला इंग्रजी व्याकरण, गणिती, यु . के एस्सेंट विषय होते. एका फिमेल ट्रेनर चा असा समज होता (अर्थात गैरसमज) कि मराठी मुले वर्नाक बोलतात, तिने तसे बोलून हि दाखवले. सगळ्या उमेदवारांना एक पेसेज दिला व वाचायला सांगितले, आमच्या पैकी माझ्यासकट ब-याच मराठी मुलांनी तो पेसेज ऑफिशियली यु. के . असेंट मध्ये वाचून दाखवला व तिचा गैरसमज दूर केला. पण इतर मुलांनी १-२ जण वगळता कुणाहि अमराठीस तो धड वाचता हि आला नाही .

प्रथम तुला वंदितो

लेखक अर्धवटराव यांनी गुरुवार, 04/03/2010 07:19 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी. आम्हि अर्धवटराव. नावाप्रमाणेच आचार, विचार, उच्चार, आणि इतर बर्‍याच बाबतीत आम्हि अर्धा पेला भरलेला (कि रिकामा... काय ते असेल) आहोत. काहि बाबतीत मात्र आम्हि परिपूर्ण आहोत... पण त्यांचि आम्हाला अर्धवट माहिती आहे. तर सांगायचा मुद्दा हा कि अश्या आमच्या सारख्या मडक्यांचि ठण्ठण् कोणिही ऐकुन घेत नाहि. अश्या उदास अवस्थेत व्रुथा भुमीवर भटकत असता आम्हाला या मिसळेच्या हाटेलाचा पत्ता सापडला. बरेच दिवस हाटेलाबाहेर उभं राहुन आम्हि आत यावं का हा विचार केला. इथे कसली तालेवार मंडळी आहेत. कोणि संगीत कोळुन प्यालय तर कोणि सहित्य. कोणाला राजकारण आवडतय तर कोणाला समाजकारण.

प्रवीण महाजन यांचे निधन

लेखक बाबुराव यांनी बुधवार, 03/03/2010 18:27 या दिवशी प्रकाशित केले.
प्रमोद महाजन यांची हत्या करणारे त्यायचं भाऊ प्रवीण महाजन यायचं आज ठाण्याच्या ज्युपीटर हॉस्पीटलात निधन झालं. त्यायला भावाच्या हत्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षाबी झाली व्हती. प्रमोद महाजनाचा खून करुन त्यायच्या आयुष्यात सुख मातर काय आलं नाय. सारं इथंच भोगावं लागतं म्हणत्यात ते काय खोटं नव्हं राहूल महाजन यायचं लग्न सहा मार्चला व्हणार हाये ते रद्द व्हईन का. कटूता कायम राहती का ? प्रवीण महाजन यायलाबी श्रद्धांजली.

' जाळीदार पान '

लेखक साईली यांनी बुधवार, 03/03/2010 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
हळुवार ज्योत पेटावी तश्या आठवणी हळुवार उजळू लागतात. आणि या उजळणाय्रा आठवणीत लाकडाचे शांतपणे पहुडलेले बाक उभे राहतात. सगळे कसे शिस्तंबद्ध लयीत मांडलेले असतात. आणि अचानक ते भरून जातात चिवचिवाट करणाय्रा पिल्लांनी. मग गोंगाटावर नियंत्रण करायला एक पट्टी वर्गात येते. साहजीकच ही पट्टी एकटी नसते. सर कींवा बाईरुपी माणसाच्या हातात ही पट्टी असते. या शिस्तीचा तेव्हा राग येत असे. पण शिस्तीला जिवनात फार महत्त्व आहे हे फार उशीरा ध्यानात येत. पद्धत चुकिची असेल कदाचित पण हेतू मात्र एकच शिस्तिचा. जन गण मन आणि भारत माझा देश आहे हे आपल्याशी तेव्हाच जुळले जातात.