Skip to main content

कृत्रिम जिवाणू

लेखक मराठे यांनी शुक्रवार, 21/05/2010 01:00 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या मुख्य बातम्यांमधे ह्या बातमीनं माझं लक्ष वेधून घेतलं... थोडं आणखी वाचल्यावर ह्या शोधाने बरीच खळबळ माजवली असल्याचं जाणवलं. डॉ. क्रेग वेन्टर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली जवळ जवळ १५ वर्ष हा प्रयोग चालू होता. ह्याविषयावर शास्त्रीय आणी अशास्त्रीय वर्तुळात बरीच चर्चा चालू आहे. ह्या प्रयोगाच्या जनकांच्या मते ह्या प्रयोगाची तुलना औद्योगीक क्रांतीशी करता येइल.अशा कृत्रिम जिवाणूंचा उपयोग कितितरी वेगवेगळ्या क्षेत्रात होउ शकतो. इंधना पासून ते वातावरणातील कार्बन-डायऑक्साईड शोषून घेण्यापर्यंत... डॉ.

सस्नेह आमंत्रण : गझल सहयोग तर्फे गझल मुशायरा

लेखक अजय जोशी यांनी शुक्रवार, 21/05/2010 00:24 या दिवशी प्रकाशित केले.
अजय अनंत जोशी आणि भूषण कटककर (बेफिकीर) सादर करीत आहेत गझल सहयोग तर्फे गझल मुशायरा.... " ऋतु गंधाळुनी गेले " दिनांक २३ मे २०१०, रविवार रोजी सायंकाळी ६ ते ८ यावेळात... विशाल सह्याद्री सदन, सदाशिव पेठ, अभिनव कला महाविद्यालयाच्यामागे, हॉटेल विश्वची गल्ली, टिळकरोड जवळ, पुणे ३० या ठिकाणी... आपणा सर्वांना सस्नेह आमंत्रण ! " ज्येष्ठ शायर ईलाही जम

निसर्गाचे चिरंजीवित्व आणि आपण

लेखक chintamani1969 यांनी गुरुवार, 20/05/2010 23:25 या दिवशी प्रकाशित केले.
(सर्व प्रथम मी मिपाच्या संपादक मंडळाला आणि सर्व वाचकांना हे सांगू इच्छितो कि सदरील लेखाचा लेखक मी स्वतः नसून कोणीतरी अद्यात व्यक्ती आहे .हा लेख मला किराणा सामानाच्या कागदावर लिहिलेला सापडला तो मला आवडला म्हणून त्या अद्यात लेखकाची क्षमा मागून मी हा लेख आपल्या समोर ठेवत आहे .

यादों की बारात !

लेखक संदीप चित्रे यांनी गुरुवार, 20/05/2010 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
'स्वाती राजेश' ह्यांनी आज सुरू केलेला 'शाळेतील गमती जमती' हा धागा पाहिला आणि शाळकरी जीवनातल्या आठवणींबद्दल मी लिहिलेली एक कविता इथे द्यावं असं वाटलं :) ---------------------------------- काय दिवस होते ना ते शाळकरी वयाचे? पाखरांमागे धावताना फुलपाखरू होण्याचे.... सकाळ, दुपार, संध्याकाळ..वेगवेगळ्या तासांचे आनंद, कंटाळा, मस्ती अशा भाव आणि भावनांचे गणिताच्या पायाचे, कवितेच्या झुल्यांचे जीव-भौतिक-रसायनच्या इति-भूगोल-नाशाचे...

माझ्या मनातले राऊळ

लेखक अरुंधती यांनी गुरुवार, 20/05/2010 21:45 या दिवशी प्रकाशित केले.
(विचारतरंग जसे उमटलेत तसे मांडलेत. कदाचित विस्कळित वाटतील. पण त्यांच्यातील सच्चाई समजून घ्यावी! ) देऊळ म्हटलं की आपल्या किती ठराविक संकल्पना असतात, नाही? जे जे उदात्त, उत्तम असते त्याचेच मूर्त स्वरूप म्हणजे मंदिर - देऊळ. पंचमहाभूतांना मानवी संकल्पनेत बंदिस्त करून त्या द्वारे संपन्न अनुभव व आत्मिक समाधान प्राप्त करण्याचे स्थान मानले जाते देऊळ. पण कितीतरी वेळा आपण अशा अनुभवाला काही छोट्यामोठ्या कारणांनी पारखे होतो. कधी ते कारण गर्दी असते, तर कधी त्या ठिकाणची अस्वच्छता. कधी भक्तीचा बाजार आपल्याला उबग आणतो तर कधी लोकांच्या अंधश्रद्धा! आणि मग ज्या कारणासाठी देवळात गेलो ते कारणच बाजूला पडते.

(कदाचित)

लेखक कानडाऊ योगेशु यांनी गुरुवार, 20/05/2010 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : - कुमार जावडेकरांची सुंदर गझल कदाचित सरेल एवढा प्रहर कदाचित..? #:S असेल बाधली भगर कदाचित..! :S पुन्हा कधीतरी समीप येता.. तुझी चळेलही नजर कदाचित. ;) समोरुनी तुझ्या निघून गेलो. (पुन्हा खोदली मी कबर कदाचित..) करेल शांत या मनास आता.. तुझ्या कुपीतली लिकर कदाचित.. तरी किती मी बजावले मनाला- नसेल खोल ती गटर कदाचित. निघेल एक एवढी लचक अन. बनेल पूर्ववत कमर कदाचित? ----- B)

नाडी नाडी नाडी

लेखक आंबोळी यांनी गुरुवार, 20/05/2010 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल मिपावरती नाडी शब्द आला की नाडीवादी आणि नाडी-काफीर लगेच बाह्या सरसावून पुढे होतात...(बाकीचे पॉपकॉर्न घेउन जवळचे झाड पकडतात.) परवाच कुठल्याश्या धाग्यावर जगातील सगळ्या लोकांच्या नाड्या केंद्रात उपलब्ध आहेत असे कुणीसे लिहिल्याचे वाचून डोक्याची चक्रे फिरायला लागली.... "याचा अर्थ अत्ता पर्यंत मेलेल्या लोकांच्या पण नाड्या असणार......." आणि मग प्रश्नही निर्माण व्हायला लागले..... जे लोक मरणपावलेत त्यांच्या नाड्यांचे हे नाडीकेंद्र वाले लोक काय करतात? कारण एकदा माणूस मेला की त्याच्या नाडीचा काहीच उपयोग नाही. ती नाडी म्हणजे त्या केंद्राला एक प्रकारची अडगळच...

स्त्रीची आजची प्रतिमा - ४: लिझ माईट्नर

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी गुरुवार, 20/05/2010 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
वीणा गवाणकरांमुळे जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर या शेतकरी-संशोधकाची ओळख खूपच लहानपणी झाली. पुस्तकांच्या दुकानात वीणा गवाणकरांचं नाव पाहून एक पुस्तक उचललं आणि भौतिकशास्त्र शिकूनही या महान स्त्रीचं साधं नावही आधी माहित नव्हतं याबद्दल सखेद आश्चर्य वाटलं.

विचारु नका ..!

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 20/05/2010 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
कोण मी मलाच हे विचारू नका आज मी जिवंत कां विचारू नका... मारुनी स्वतःस मी निष्पाप कसा? आसवांचे अर्थ मला विचारू नका... कां असा सुखांचा मार्ग बदलला? वेदनांचा पत्ता मला विचारू नका... तो सुर्य, चंद्र..,तारकाही गळाल्या क्षितीजाचा गाव मला विचारू नका... कोमेजल्या कळ्या चित्रातल्या? कां फिकुटले रंग? विचारू नका ... हरवला भाव सांगा कुणा गवसला? सोडला ठाव, कां? मला विचारू नका.... विशाल